Last Updated: Saturday, June 23, 2012, 22:51
www.24taas.com, मुंबई 
मंत्रालयाच्या चौध्या मजल्याला गुरूवारी आग लागली. या आगीत अनेक मंत्र्यांची कार्यालये भस्मसात झाले. यातून राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे कार्यालयही आगीच्या भक्ष्य बनले. त्यांच्या जळालेल्या कार्यालयाचे EXCLUSIVE फोटो झी 24 तासच्या हाती लागले.
चौथ्या मजल्यावर असलेल्या शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाची कशी वाताहत झाली आहे हे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो...दर्डा यांच्या कार्यालयातल्या लोखंडी खुर्च्याही या भीषण आगीत वितळलेल्या दिसत आहेत.
तसंच या कार्यालयाचा सिलिंगचा कोसळलेला भागही या दिसत आहे. कार्यालयाचं पार्टिशनही जळून खाक झालंय. पूर्ण मजल्याचं एका हॉलमध्येच रुपांतर झालंय. काँक्रिटच्या पीलर आणि बिमशिवाय या कार्यालयात काहीही शिल्लक राहिलेलं नाही.
First Published: Saturday, June 23, 2012, 22:51