Last Updated: Tuesday, July 3, 2012, 09:12
www.24taas.com, नागपूर बनावट गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रे तयार करुन त्या माध्यमातून इंजिनीअरींग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणा-या एका रॅकेटचा पर्दाफाश नागपूर पोलिसांनी केलाय.
याप्रकरणी 2 महिलांसह चौघांना अटक करण्यात आलीय. नागपूरच्या गोकूळपेठ इथल्या आर.एस.एकॅडमीनं गोव्यातल्या झेवियर या आंतरराष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठाशी संधान बांधले होते आणि संगनमतानं बारावी नापास झालेल्या किंवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुणपत्रिका तयार करुन दिले जात होते.
नागपुरातल्या काही कॉलेजमध्ये आर.एस एकॅडमीच्या माध्यमातून मार्कलिस्ट मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेचे पथक गोव्याला जाणाराय.
First Published: Tuesday, July 3, 2012, 09:12