पाहाः अकरावीची दुसरी यादी जाहीर - Marathi News 24taas.com

पाहाः अकरावीची दुसरी यादी जाहीर

www.24taas.com, मुंबई
 
आज अकरावीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. अकरावीच्या दुसर्‍या यादीनंतर बड्या, नामांकित कॉलेजबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत नाकारलेल्या ६१ हजार ५१५ प्रवेश अर्ज, दुसर्‍या यादीत बेटरमेंटच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसह प्रवेश यादीत नाव न आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे डोळे आजच्या गुणवत्ता यादीकडे लागले आहेत. नामांकित महाविद्यालयातील अकरावीच्या उपलब्ध जागा पाहता तिसर्‍या म्हणजेच शेवटच्या यादीसाठी जागा शिल्लक राहण्याची शक्यता फारच कमी आहे.
 
विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेसाठी अकरावी ऑनलाईनची दुसरी गुणवत्ता यादी आज सायं ५ वाजता जाहीर झाली आहे. या यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी ५, ६ व ७ जुलै रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यानंतर तिसरी म्हणजेच शेवटची यादी १० जुलै रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत नाकारलेल्या ६१ हजार ५१५ विद्यार्थ्यांच्या अर्जांचा विचारही उद्याच्या यादीत होणार असल्याने उद्यानंतरच प्रवेशाचे चित्र स्पष्ट होणार आहे. या यादीसाठी एकूण ८५ हजार ९७४ जागा उपलब्ध आहेत.

 

अकरावीची दुसरी यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा


 
कट ऑफ एक ते दीड टक्क्यांनीच घसरले


अकरावीच्या पहिल्या यादीच्या तुलनेत दुसर्‍या यादीत एक ते दीड टक्क्यांनीच घट होईल, अशी शक्यता प्राचार्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी शेवटच्या यादीसाठी अकरावीच्या फक्त १० ते १२ जागाच शिल्लक राहिल्या होत्या. पहिल्या यादीत मिळालेला प्रवेश रद्द करून दुसर्‍या यादीतील बेटरमेंटनुसार प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दुसर्‍या यादीनंतरच सर्वच जागा भरण्याची शक्यता आहे.
 
संबंधित बातम्या
 
पाहाः अकरावीची पहिली यादी जाहीर
 
 

First Published: Wednesday, July 4, 2012, 19:28


comments powered by Disqus