Last Updated: Sunday, July 8, 2012, 13:17
www.24taas.com, कल्याण मुरबाड तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे हाल सुरु आहेत. वीजही नाही आणि पाणीही नाही अशा दयनीय अवस्थेत 750 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत.
मुरबाड तालुक्यात कल्याण-नगर हायवेवर माळशेज घाटाच्या पायथ्याशी शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते १२वी पर्यंत मोफत शिक्षण देणाऱ्या या आश्रमशाळेत परिसरातील वाड्या पाड्यावरील ७५० आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मात्र गेल्या महिन्याभरापासून इथला वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे शाळेत ट्यूबलाईट आणि पंखे असूनही विदयार्थ्यांना अंधारात उकाडा सहन करतच शिक्षणाचे धडे गिरवावे लागतायत. त्यातच रात्री अंधाराचं साम्राज्य असल्याने हिंस्र प्राणी, सर्प यांच्यापासून घटना घडण्याशी शक्यता नाकारता येत नाही.
First Published: Sunday, July 8, 2012, 13:17