निळ्या बसचा मोफत प्रवास - Marathi News 24taas.com

निळ्या बसचा मोफत प्रवास

www.24taas.com, नाशिक
 
ग्रामीण भागात एस.टी. च्या बसला लाल डब्बा असंही म्हटलं जातं. मात्र आता नाशिकसह राज्यातल्या १२५ तालुक्यात 'मानव विकास योजने' अंर्तगत मुलींना शिक्षणाकडे आर्कषित करण्यासाठी निळ्या रंगाच्या बसची मोफत सेवा सुरू करण्यात आलीये.
 
नाशिकच्या डेपोतली ही निळ्या रंगाची बस त्र्यबंकेश्वर तालुक्यातल्या विद्यार्थीनींसाठी सुरू करण्यात येणार आहे. राज्यातल्या १२५  तालुक्यांमध्येही अशा बस धावतांना दिसणार आहेत... शाळा आणि घर यांच अंतर जास्त असल्यानं अनेक ठिकाणी विशेषत मुलींच्या साक्षरतेच प्रमाण कमी आहे. सुरक्षा आणि प्रवासाच्या सोयी अभावी शिक्षण थांबू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आलीय. प्रत्येक तालुक्यात ५ याप्रमाणे राज्यात ६२५  बस धावणार आहेत.
 
'गाव तिथ शाळा आणि शाळा तिथं बस' ही घोषणा करत ही योजना सुरू करण्यात आलीय. योजना चांगली असली तरी आधीच्या योजनेप्रमाणे बंद पडू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.
 
लालगाड्याच्या गर्दीत या निळ्या गाड्या सावित्रींच्या लेकींचं आकर्षण ठरतील यात शंका नाही. मात्र योजना सुरू करताना असलेला उत्साह प्रशासनानं नंतरही कायम ठेवणं गरजेचं आहे.
 

First Published: Sunday, July 15, 2012, 14:46


comments powered by Disqus