मराठी शाळांसाठी ठिकठिकाणी आंदोलन - Marathi News 24taas.com

मराठी शाळांसाठी ठिकठिकाणी आंदोलन

www.24taas.com, मुंबई
 
राज्यातल्या विविध जिल्ह्यांतील १०० मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी आज मराठी अभ्यास केंद्र आणि शिक्षण हक्क समन्वय समितीमार्फत मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. तब्बल १०० मराठी माध्यामाच्या शाळा मान्यतेच्या प्रतिक्षेत आहेत. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी  मंगळवारी पुण्यातल्या शिक्षण संचालकांना घेराव घातला.
 
राज्यातल्या मराठी शाळांना मान्यता मिळावी, यासाठी शिक्षण हक्क समन्वय समितीच्या शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.
 
नाशिकमध्येही शिक्षण हक्क समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. २००८ पासून सुरू असलेल्या मराठी शाळांना सरकारनं त्वरित मान्यता द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा समितीनं दिलाय. आणि मराठी शाळांच्या मान्यतेसाठी औरंगाबादेत शिक्षण हक्क समन्वय समितीने आंदोलन सुरु केलय.. सरकार मराठी शाळांना मान्यता देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय..

First Published: Wednesday, July 25, 2012, 23:00


comments powered by Disqus