‘मूड इंडिगो’चा ऑस्ट्रेलियन ‘कार्निवूल’ - Marathi News 24taas.com

‘मूड इंडिगो’चा ऑस्ट्रेलियन ‘कार्निवूल’

झी २४ तास वेब टीम, मुंबई
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच आयआयटीचा यंदाचा वार्षिक सांस्कृतिक समारंभ म्हणजेच ‘मूड इंडिगो’ खूपच रॉकींग ठरणार आहे. कारण, या वर्षी मूड इंडिगो मध्ये परफॉर्म करणार आहे ‘कार्निवूल’ हा ऑस्ट्रेलियन बँड.आयआयटी-मुंबईच्या पवई कँपसमध्ये होणाऱ्या प्रोनाईटला हा बँड परफॉर्म करणार आहे. कार्निवूल या रॉकबँडचे आतापर्यंत 3 अल्बम्स रिलिज झाले आहेत. त्यांचा शेवटचा अल्बम ‘साऊंड अवेक’ 2009 मध्ये रीलीज झाला होता. प्रोग्रेसिव्ह रॉक स्टाईल हा नवीन आणि स्वतंत्र प्रकार आहे. आजच्या सर्वसामान्य तरुण वर्गात याची खूप क्रेझ आहे. हे वर्षं मूड इंडिगोचं ४१ वे वर्षं असून १८ ते २१ डिसेंबर दरम्यान हा फेस्टिव्हल होणार आहे

First Published: Tuesday, October 18, 2011, 10:55


comments powered by Disqus