एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थी संसद परिषद - Marathi News 24taas.com

एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थी संसद परिषद

 www.24taas.com, पुणे
 
पुण्यातलं एम आय टी महाविद्यालय आयोजीत दुसऱ्या विद्यार्थी संसद परिषदेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. शिक्षण मंत्री राजेश टोपे, पद्माकर वळवी, सिने अभिनेत्री नंदिता दास यांच्या उपस्थितीत या परिषदेचा उद्घाटन समारंभ पार पडला.
 
या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. देशभरातील हजारो विद्यार्थी  या परिषदेसाठी दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया समजावी, विविध विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये विचार मंथन व्हावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. यावेळी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
 

First Published: Wednesday, January 11, 2012, 12:25


comments powered by Disqus