Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:13
www.24taas.com, मुंबई स्टेट बँकेने आपल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज दरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. हे केवळ शैक्षणिक कर्जासाठीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं आता थोडे दिलासादायक झाले आहे.
गरिब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, याकरिता बँक व्याज दरात कपात करण्याचा विचार करत आहे. यावर उपाय म्हणून, केंद्र सरकारने राखीव निधी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांना शैक्षणिक कर्जाच्या नफ्यापैकी काही रक्कम या निधीत टाकावा लागेल. ही रक्कम कर्जासाठी हमी म्हणून वापरली जाईल.
स्टेट बँकेने व्याजदर कपातीचा निर्णय घेतल्यानंतर अन्य बँकाही शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करू शकतात. असेही संकेत आहेत. सध्या बँकेचे दर चार लाखांपर्यंत १३.७५ टक्के, चार ते साडेसात लाखांपर्यंत १४.२५ टक्के आणि त्यावरील रकमेसाठी १२.२५ टक्के इतके आकारले जातात. त्यामुळे शैक्षणिक कर्ज घेणे अनेकांना शक्य नव्हते. आता थोडासा दिलासा मिळाला आहे.
First Published: Thursday, February 16, 2012, 13:13