Last Updated: Thursday, March 1, 2012, 08:15
www.24taas.com, मुंबई 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. यात एकूण १७ लाख ११ हजार २१४ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून ९ लाख ४६ हजार २१८ विद्यार्थी आणि ७ लाख ६४ हजार ९९६ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.
संपूर्ण राज्यात एकूण ३,७३० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या करियरची दिशा ठरवणारं हे महत्त्वाचं वर्ष असल्याने ह्या परीक्षेसाठी विद्यार्थी देखील सज्ज झाले आहेत.
तसेच महाराष्ट्रात परीक्षेच्या काळात होणाऱ्या कॉप्या आणि त्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, शिक्षण मंडळही आता सतर्क झाले आहे. त्यामुळे कॉपी करण्याऱ्या विद्यार्थ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त असल्याने कॉपीविरोधी पथक अनेक ठिकाणी धाडी टाकण्याची शक्यता आहे.
First Published: Thursday, March 1, 2012, 08:15