Last Updated: Thursday, December 15, 2011, 10:28
झी २४ तास वेब टीम, मुंबई वांद्र्याच्या शहानी इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या फी वाढीला विरोध करण्यासाठी फेसबुकचा आधार घेतला आहे.फी वाढीच्या मुद्द्याला आता सोशल नेटवर्किंग वेबसाईच्या माध्यमातून वाचा फोडली. प्रोटेस्ट अगेन्स्ट फी हाईक ईन टीएसईसी... हा विद्यार्थ्यांनी सोशल नेटवर्किंग बेवसाईट वर फी वाढीला केलेला विरोध आहे. बांद्राच्या शहानी इंजिनिअरींग कॉलेजने अचानक फी वाढ केल्याने विद्यार्थी संतापलेत. कॉलेजने 23 हजारांनी केलेली ही फी वाढ भरण्यासाठी फक्त पाच दिवसांची मुदत दिली. कॉलेजच्या या मनमानी कारभाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी हा विरोध सुरु केला.
कॉलेजने आधीच विद्यार्थ्यांकडुन 89 हजार फी वर्षाच्या सुरुवातीलाच भरायला लावली होती, शिवाय आता आणखी 23 हजारांचा भुर्दंड लादला आहे... फी वाढ करुन ही तितक्या दर्जाच्या सुविधा कॉलेज देत नाही असा सुर विद्यार्थ्यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर मांडला. काहींनी फी भरायचीच नाही असं मत मांडलं. कॉलेजची नोटीस, फी, पावती अशा सर्व बाबी विद्यार्थ्यांनी मांडत कॉलेजचा पंचनामा केलाय. अवघ्या काही दिवसांत साडेसातशे सदस्य या वॉलचे झाले आहेत.
First Published: Thursday, December 15, 2011, 10:28