फेसबुकने दिलं एक कोटी ३४ लाखांचे पॅकेज - Marathi News 24taas.com

फेसबुकने दिलं एक कोटी ३४ लाखांचे पॅकेज

www.24taas.com, अलाहाबाद
 
सोशल नेटवर्किंगमधली जागतिक स्तरावरील बलाढ्य कंपनी फेसबुकने एका अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याला एक कोटी ३४ लाख रुपयांचे पॅकेज दिलं आहे. देशात आजवर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एव्हढ्या प्रचंड रकमेचं पॅकेज देण्यात आलं नव्हतं.
 
मोतीलाल नेहरु नॅशनल इन्स्टियुट ऑफ टेक्नोलॉजीचे संचालक पी.चक्रवर्ती यांनी या संस्थेत बी.टेकला शिकणाऱ्याला एका विद्यार्थ्याला फेसबुकडून २७ मार्च रोजी नेमणुक झाल्याचं तसंच वार्षिक एक कोटी ३४ लाख रुपयांच्या पॅकेज देण्यासंबंधीचे पत्र आल्याचं सांगितलं. सुरक्षेच्या कारणावरुन या विद्यार्थ्याचे नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. चक्रवर्तींच्या म्हणण्यानुसार मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये फेसबुककडून आलेल्या मेलद्वारा निवड प्रक्रियेला सुरवात झाली. त्यानंतर दुरध्वनीवरुन मुलाखतीच्या नऊ फेऱ्यानंतर या विद्यार्थ्याची अंतिम निवड करण्यात आली.
 
आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेला हा विद्यार्थी कानपूरहून कालिफोर्नियाला रवाना होईल. चक्रवर्ती पुढे म्हणाले की आतापर्यंत ३० विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट, अमॅझॉन, अडोब यासारख्या नामांकित कंपन्यांकडून वर्षाला दहा लाख रुपयांच्या ऑफर्स आल्या आहेत. पण इतक्या प्रचंड रकमेची ऑफर पहिल्यांदाच प्राप्त झाली आहे. देशातील दोन डझन नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीच्या कोणत्याही विद्यार्थ्याला अशी ऑफर यापूर्वी कधी देण्यात आली नाही.

First Published: Thursday, March 29, 2012, 19:28


comments powered by Disqus