शिक्षण मंडळाने खाल्ला विद्यार्थ्यांचा 'खाऊ'! - Marathi News 24taas.com

शिक्षण मंडळाने खाल्ला विद्यार्थ्यांचा 'खाऊ'!

www.24taas.com, ठाणे
 
सहाव्या वेतनामुळे वाढीव शिक्षकांचा पगार देण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांचा मधल्या सुट्टीत मिळणाऱ्या पौष्टिक आहारावर गंडातर आलंय. गेल्या तीन महिन्यांपासून हा पौष्टिक आहार बंद असल्याची खळबळजनक गोष्ट समोर आली आहे. यावर शिक्षण मंडळ मात्र जुजबी उत्तरे देतंय.
 
ठाण्यामध्ये पालिकेच्या एकूण १२७ शाळा आहेत त्यामध्ये जवळपास ३८ हजार विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत खिचडी सोबत चिक्की, बिस्किट, असा पौष्टिक आहार पालिका देते, मात्र सहाव्या वेतनानंतर शिक्षकांचा वाढीव वेतन देण्यासाठी हा आहार गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. विशेष म्हणजे ही माहिती शिक्षणमंडळाच्या सदस्यांनीच दिली आहे.
 
शिक्षकांना वेतन देण्यासाठी नाईलाजास्तव हा पौष्टीक आहार बंद करण्यात आलाय असं उत्तर शिक्षण मंडळ अध्यक्षांनी दिलंय. या वादामुळे शिक्षण-मंडळातला वाद तर चव्हाट्यावर आला आहेच मात्र या वादामुळे गरीब विद्यार्थ्यांचही मोठं नुकसान होतंय.

First Published: Friday, March 30, 2012, 17:31


comments powered by Disqus