विद्यापीठाला चूक मान्य, BNN कॉलेजला दंड - Marathi News 24taas.com

विद्यापीठाला चूक मान्य, BNN कॉलेजला दंड

www.24taas.com, मुंबई
 
पेपर फुटीप्रकरणी अखेर मुंबई विद्यापिठाने आपली चूक मान्य केली आहे. या प्रकरणी भिवंडीच्या बीएनएन (BNN) कॉलेजला १ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर याप्रकरणी दोन सुपरवायजर आणि एका एक्जाम कंडक्टरलाही निलंबित करण्यात आलं आहे.
 
याचा निर्णय विद्यापिठाच्या चौकशी समितिने घेतला. याप्रकरणी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. आता टी. वाय. बी.कॉमचा ह्युमन रिसोर्स हा पेपर ११ एप्रिलला पुन्हा घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुर्वीच्याच परिक्षा केंद्रावर परिक्षा द्यावी लागणार आहे. यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे.
 
मुंबई विद्यापीठाचा  TY. B.COM चा एमएचआरएमचा पेपर फुटल्या प्रकरणी आता या विषयाची ११ एप्रिलला पुन्हा परीक्षा होणार आहे. परीक्षा मंडळानं याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळं ८५ हजार विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागेल. विद्यापीठाला चांगले नेतृत्व हवे आणि परीक्षा व्यवस्थित व्हायला हवी अशी प्रतिक्रिया युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या निर्णयावर दिली आहे. सध्या परीक्षांचे दिवस आहेत. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो हे विद्यापीठानं लक्षात घेऊनच काटेकोर नियोजन करावे अशी अपेक्षा आदित्य यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
 

First Published: Sunday, April 1, 2012, 22:23


comments powered by Disqus