कॉलेजची चूक, शिक्षा ८५ हजार विद्यार्थ्यांना ? - Marathi News 24taas.com

कॉलेजची चूक, शिक्षा ८५ हजार विद्यार्थ्यांना ?

www.24taas.com, मुंबई
 
TY.B.COM चा ह्युमन रिसोर्सचा पेपर फुटल्यानं त्या पेपरसाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र कॉलेजच्या चुकीची शिक्षा ८५ हजार विद्यार्थ्यांना का असा सवाल करत सुमारे ४५० विद्यार्थी कोर्टात जाणार आहेत.
 
आज तशी याचिका दाखल करण्यात येणार आहे. परीक्षांमध्ये सातत्यानं होणाऱ्या गोंधळांचा भूर्दंड विद्यार्थ्यांना सोसावा लागतो. मागच्या बुधवारी फुटलेल्या एमएचआरएमची परीक्षा ११ एप्रिलला पुन्हा घेण्यात येणार आहे या परीक्षेला विद्यार्थ्यांकडून विरोध होतोय.
 
ज्या कॉलेजच्या प्राध्यापकांच्या चुकीमुळे हा पेपर फुटला त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचीच फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी या याचिकेत करणार आहेत. तसंच सततच्या पेपरफुटीप्रकऱणी कायद्यात विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी याचिकेत करणार आहेत

First Published: Tuesday, April 3, 2012, 11:46


comments powered by Disqus