मनसे उभी राहणार विद्यार्थ्यांच्या मागे... - Marathi News 24taas.com

मनसे उभी राहणार विद्यार्थ्यांच्या मागे...

www.24taas.com, मुंबई
 
केंद्र सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता न घेता अभियांत्रिकी,एम.बी.ए,पॉलिटेक्निक, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट,व्यवस्थापन विषयाचा अभ्यासक्रम सुरू करून लाखो विघार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थाची यादी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेन जाहीर केली आहे.
 
यात महाराष्ट्रातील १२० संस्थाचा समावेश आहे.गेल्यावर्षी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेन ७३ महाविघालयाची यादी जाहीर केली आहे. या बोगस शैक्षणिक संस्थावर राज्याच्या तंत्रशिक्षण संस्थांवर कोणतीच कारवाई केली नाही.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विघार्थी सेनेन तंत्रशिक्षण संचालकाना जाब विचारण्यासाठी घेराव घालत या बोगस शैक्षणिक संस्थावर बंदी घालत,फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
 
यावेळी तंत्रशिक्षण संचालक सु.का.महाजन यांनी बोगस संस्था विरोधात कायदा अधिवेशनात कायदा मंजूर करून बोगस शैक्षणिक संस्थावर फौजदारी गुन्हा दाखल करू अस आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण विघार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना दिल आहे.
 
 
 

First Published: Tuesday, April 10, 2012, 21:36


comments powered by Disqus