विद्यार्थ्यांची रक्षा, शिक्षा करणाऱ्यांनाच शिक्षा - Marathi News 24taas.com

विद्यार्थ्यांची रक्षा, शिक्षा करणाऱ्यांनाच शिक्षा

www.24taas.com, मुंबई
 
शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक किंवा मानसिक छळाला प्रतिबंध घालण्यासाठी सध्याच्या कायद्यात बदल करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. नव्या कायद्यानुसार, विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देताना, साधी इजा किंवा मानसिक त्रास झाला तर त्रास देणाऱ्याला 1 वर्षांचा कारावास होऊ शकतो.
 
त्यानंतरही विद्यार्थ्यांना त्रास होत राहिला तीन वर्षाच्या कारावासाची तरतूद नव्या कायद्यात आहे. विद्यार्थी गंभीर जखमी झाला तर 5 वर्षांचा कारावास आणि त्यानंतर असे प्रकार सुरू राहिल्यास 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
 
विकृत रॅगिंग आणि त्यामुळे मुलांवर होणारा मानसिक परिणाम, तसंच त्यातून वाडणाऱ्या आत्महत्या या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रॅगिंगसंबंधीचे कायदे अधिक कडक करण्याचा विचार प्रस्तावित केला आहे. रॅगिंगवर प्रतिबंध घालण्यासाठी 2 वर्षांपर्यंतचा कारावास किंवा 10 हजार रूपयांच्या दंड किंवा दोन्हीची तरतूद नव्या कायद्यात प्रस्तावित आहे.

First Published: Friday, May 4, 2012, 16:13


comments powered by Disqus