Last Updated: Tuesday, April 30, 2013, 12:13
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सीए आणि एमपीएससी परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षांच्या दिवशीच आल्याने अखेर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
सीए आणि एमकॉमच्या परीक्षा एकाच वेळी २ मे रोजी येत होत्या तर १८ मे रोजी विद्यापीठाची आणि एमपीएससीच्या परीक्षा होत्या. त्यामुळे दोन्ही संस्थांनी परीक्षांची तारीख बदलावी, अशी विनंती विद्यापीठाकडे केली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे प्रभारी परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी स्पष्ट केले.
२ मे रोजी होणारी परीक्षा ५ मेच्या रविवारी घेण्याबाबत विचार सुरू आहे तर १८ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा त्यानंतरच्या सोयीच्या ठरणाऱ्या रविवारी घेण्यात येतील असेही ते म्हणाले. या तारखा ठरल्यानंतर विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येतील असेही ते म्हणाले.
First Published: Tuesday, April 30, 2013, 12:13