आंतरराष्ट्रीय परिसंवाद, युपीजी कॉलेजचा स्तुत्य उपक्रम, Upg College arranged international conference

मुंबईच्या युपीजी कॉलेजची आंतरराष्ट्रीय झेप

मुंबईच्या युपीजी कॉलेजची आंतरराष्ट्रीय झेप
www.24taas.com, मुंबई

उषा प्रविण गांधी मॅनेजमेंट कॉलेजतर्फे २१, २२ फेब्रु २०१३ जागतिक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. वेदांता व्हिजन ट्रस्टचे अश्विन श्रॉफ आणि एक्सेल इंड्रस्ट्रीचे प्रमुख ए. आर. के. पिलाई यांची या परिसंवाद प्रमुख उपस्थिती लाभली होती.

श्रीमती जया राव

श्रीमती जया राव यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरवातीलाच सांगितले की, नफा हे फक्त ध्येय असू नये तर आपण जी जबाबदारी स्वीकारली आहे, किंवा एखादे काम हातात घेतले असता, त्या कामात आनंद कसा मिळू शकेल हे देखील शिकले पाहिजे. आपण जिथे काम करतो तेथे आपल्या कामात अध्यात्मिकता असणं गरजेचं आहे, आणि त्यातील आनंद घेण्यासाठी आपण सक्षम देखील असायला हवं. एखादी व्यक्ती ही फक्त पैसा कमावून यशस्वी होत नाही. तसाच जर मापदंड लावयचा असता तर गांधीजी कधीही सफल झाले नसते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी देखील एक गोष्ट आवर्जुन सांगितली होती. की नफा हाच यशस्वी होण्यातील मोठा अडथळा आहे. तुम्ही आयुष्यात फक्त पैशासाठी धावत राहिलात तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाहीत, पैसा यशस्वी होण्याचा मार्ग नक्की आहे.

सॅम्युअल जॉन्सन ज्याने पहिल्यांदा इंग्रजी शब्दकोश तयार केला, मात्र त्यांच्या प्रकाशनासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. तर मॅडम क्युरी हिने हीच सारे संशोधन स्वत:च्या घरात केले, कारण प्रयोगशाळा उभारून त्यात संशोधन करण्याइतपत तिच्याकडे पैसे नव्हते. आणि तरीही तिला दोन नोबेल पारितोषिक मिळाले. पैशामुळे तुमची इच्छाशक्ती कमी कमी होत जाण्याची दाट शक्यता असते. आणि भारतीयांमध्ये तर खूप जबरदस्त क्षमता आहे. पण स्वार्थी हेतू ठेवल्यास तुम्ही तुमच्या यशापर्यंत कधीही पोहचू शकत नाही. अशाप्रकारे श्रीमती जया यांनी मार्गदर्शन केले.

आर. ए. के. पिल्लई

कामातील अधात्मिकता ही प्रासंगिक आहे. नफा हा उचित असल्यास सार्वजनिक स्तरावर पैशांची वाटणी देखील समान व्हायला हवी. जेणेकरून त्याचा फायदा साऱ्यानाच होईल. आणि याच गोष्टी ह्या तुमच्या कामाच्या आध्यात्मिकता यात येत असतात. शिक्षकांनी देखील फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना बाहेरील जगाची जाणीव करून देणंही तितकचं गरजेचं आहे. मी मात्र खूष आहे. कारण की, युपीजी कॉलेजने हा परिसंवाद आयोजित करून विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून देण्याचा एक स्तुत्य असा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे ए. आर. के पिल्लई यांनी आपले विचार व्यक्त केले.

अश्विन श्रॉफ

आश्विन श्रॉफ यांनी कामामधील आध्यात्मिकता याचे फारच सोप्या भाषेत विश्लेषण करून दिले. अध्यात्मिकता ही तीन तत्वावर अवलंबून असते. योग्य उद्देश, योग्य हेतू आणि योग्य असा सराव यामुळे कामातील अध्यातमिकता सहजपणे साध्य करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. आणि या साध्या गोष्टी अमंलात आणल्यास भावी आयुष्यात तुम्हांला नक्कीच फायदा होईल. असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत कार्यस्थळातील अध्यात्मिकता या विषयाची ओळख करून दिली.



First Published: Tuesday, March 5, 2013, 09:38


comments powered by Disqus