अ माईटी हार्ट A mighty heart

अ माईटी हार्ट

अ माईटी हार्ट
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी तिने आपल्या दोन्ही स्तनांवर ब्रेस्ट सर्जरी करुन घेतलीय.. डबल मॅसटेकटॉमी पद्धतीत स्तनाचा काही भाग किंवा पूर्णपणे स्तन काढून टाकलं जातो...शास्त्रीय दृष्टीकोनातून स्वत:कडं पहाण्याचा नवी दृष्टी अँजेलीनाने महिलांना दिलीय...

जगातील सर्वात सुंदर स्त्रीयांपैकी एक समजली जाणारी हॉलीवूडचे अभिनेत्री अँजेलीना जोली आज ख-या अर्थाने इंटरनॅशनल स्टार ठरलीय...ब्रेस्ट कॅन्सरच्या दहशतीखाली जगणा-या असंख्य महिलांना अँजेलीनाच्या या धाडसी निर्णयाचा फायदा होणार आहे...हॉलीवूडपटातून धाडसी व्यक्तीरेखा साकारणा-या एंजेलीनाने वैयक्तीक आयुष्यातही आपण धाडसी असल्याचं दाखवून दिलयं...संभावीत ब्रेस्ट कॅन्सर टाळण्य़ासाठी एंजेलीनाने आपल्या दोन्ही स्तनांवर डबल मॅसटेकटॉमी शस्त्रक्रिया केलीय... डबल मॅसटेकटॉमी पद्धतीत स्तनाचा काही भाग किंवा पूर्णपणे स्तन काढून टाकलं जातं...एंजेलीनाला ब्रेस्ट तसेच गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता होती..त्यावर मात करण्यासाठी तिने डबल मॅसटेकटॉमीचा मार्ग अवलंबला...एंजेलीना या विषयी म्हणते....`डॉक्टरांच्या अंदाजानुसार मला स्तनाचा कॅन्सर होण्याची 87 टक्के शक्यता होती तर गर्भाशयचा कॅन्सर होण्याची शक्यता ५० टक्के इतकी होती.त्यावर मात करण्यासाठी तसेच हा धोका कमी करण्यासाठी मी हे पाऊल उचललं`

अँजेलीनावर डबल मॅसटेकटॉमीची प्रक्रिया यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरु झाली आणि एप्रिल महिन्यात ती संपली....एंजेलीनाच्या आईने जवळपास दहावर्ष कॅन्सरशी लढा दिला..वयाच्या ५६व्या वर्षी तिचा कॅन्सरने मृत्यू झाला..एंजेलीनाच्या शररिरातही बीआरसीए 1हा जीन असल्यामुळे तिला ब्रेस्ट तसेच गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढली होती..त्यामुळेच ९ आठवडे चालणा-या डबल मॅसटेकटॉमी करण्याचा निर्णय़ एंजेलीनाने घेतला..याशस्त्रक्रियेमुळे तिचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ८५ टक्क्यावरुन थेट ५टक्क्यांवर आलाय..या उपचारानंतर एंजेलीनाने व्यक्त केलेली भावना मोठी बोलकी आहे....`मी हा निर्णय घेतला आणि यामुळे माझं स्त्रीत्व जराही कमी झालं नाही.माझा लेख वाचणा-या महिलांना त्यांच्याकडं कोणता पर्याय आहे हे समजेल अशी मला आशा आहे.ज्यांच्या कुटुंबात ब्रेस्ट किंवा गर्भाशय कॅन्सरचा इतिहास आहे अशांना जागृत करण्याचा माझा प्रयत्न आहे.अशा महिलांनी जागृत होवून वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा तसेच आपला पर्याय निवडावा. `

एंजेलीनासाठी हा निर्णय घेण काही साधी गोष्ट नव्हती.. अनेक चित्रपटातून कणखर भूमिका साकारणा-या एंजेलीनाने हा धाडसी निर्णय़ घेऊन नवा आदर्श जगभरातील स्त्रियांसमोर निर्माण केला आहे...स्तनाच्या कर्करोगाशी लढतांना आपल्यासमोर असाही पर्याय असू शकतो हा संदेश या निमित्ताने अँजेलीनाने दिला आहे..तिचा हा निर्णय क्रांतीकारच म्हणावा लागेल...हॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री अँजेलीना जोलीने जो निर्णय घेतलाय तो ब्रेस्ट कॅन्सरच्या दहशतीखाली जगणा-या महिलांसाठी दिशादर्शक ठरणार आहे...

आज २१व्या शतकात स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केलं आहे...स्त्रीयांनी आपलं महत्व सिद्ध केलं आहे..स्तन ही स्त्रित्वाची एक ओळख मानली जाते...स्तन म्हणजे मातृत्व...हॉलीवूड अभिनेत्री अँजेलीना जोलीने ब्रेस्ट कॅन्सरवर मात करण्यासाठी दोन्ही स्तनांवर डबल मॅसटेकटॉमी शस्त्रक्रिया केलीय...तिच्या या धाडसी निर्णयामुळे शास्त्रीय दृष्टीकोनातून स्वत:कडं पाहण्याची नवी दृष्टी अँजेलीनाने तमाम महिलावर्गाला दिलीय..अँजेलीनोचा हा निर्णय अत्यंत क्रांतीकार असाच आहे..माझ्या मुलांपासून त्यांची आई मृत्यूने हिरावून घेऊ नये यासाठी हा निर्णय़ घेतल्याचं अँजेलीनाने सांगितलंय..हॉलीवूडची सौंदर्यसाम्राज्ञी म्हणून तिचा उल्लेख केला जातो..

४ जून १९७५साली जन्मलेल्या या अभिनेत्रीने हॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.. तीन गोल्डन ग्लोब,दोन स्क्रीन एक्टर्स गील्ड अवार्ड्स, एक ऑस्कर पुरस्कार तिने पटकावला आहे..

अँजेलीनाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात १९८२मध्ये बालकलाकार म्हणून केली..१९९५मध्ये तिने पहिली बीगबजेट फिल्म हॅकरमधून भुमिका साकारली..१९९९मध्ये गर्ल इंटरप्टेड या चित्रपटासाठी अँजेलीनाला सर्वौत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला..टॉम्ब रायडर हा तिचा चित्रपट प्रचंड गाजला....द क्रेडल ऑफ लाईफच्यामाध्यमातून तिने हॉलीवूडच्या प्रस्थापित अभिनेत्रीमध्ये जागा मिळवली...मिस्टर अँड मिसेस स्मित या एक्शन - कॉमेडीपटातूनं तिचं वेगळं रुप प्रक्षकांना पहायला मिळालं..तर वॉन्टेडच्या माध्यमातून एक्शन अभिनेत्रीचं बिरुद मिळवलं...अ मायटी हार्ट आणि चेंजलिंग या सिनेमातून तिच्या अभिनयाची मोठी प्रशंसा झाली ...अँजेलीना जोलीच्या वैयक्तीक आयुष्यही बरेच चढ उतार आले...अभिनेता जॉनी ली मिलरशी काडीमोड घेतल्यानंतर तिने बीली बॉब थोर्नटनशी विवाह केला...मात्र त्यांचे ते संबंध जास्त काळ टिकले नाही..गेल्या काही वर्षांपासून ती अभिनेता ब्रॅड पीटसोबत रहाते...ही जोडी जगभरातील मीडियाच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहे..अँजेलीना आणि ब्रॅडने तीन मुलं दत्तक घेतली आहेत तर तीन मुलं त्यांची आहेत..

ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणारी केवळ अँजेलीनाच एकमेव सेलिब्रिटी आहे असं नाही..कोण आहेत त्या सेलिब्रिटी त्यावर एक नजर...हॉलीवूडीची आघाडीची अभिनेत्री अँजेलीना जोली...
तिची एक झलक पहाण्यासाठी तिचे चाहते तासनं तास उभे राहतात...ती जिथे जाते तिथे प्रसारमाध्यमांचा तिला गराडा पडतो..जगभरातील तमाम पापाराझी तिचा एक फोटो काढण्यासाठी धडपडत असतात..ती जेव्हा रुपेरी पडद्यावर अवतरते तेव्हा प्रेक्षक थिअटर डोक्यावर घेतात...हॉलीवूडच्या या रुपगर्वतीने कॅन्सर टाळण्यासाठी स्तनांवर डबल मॅसटेकटॉमी शस्त्रक्रिया करुनएका नव्या क्रांतीकारी विचारांची सुरुवातकेली आहे...अँजेलीनाच्या या निर्णयाचं कौतुक तिचा पर्टनर ब्रॅट पीटनेही केलंय..

केवळ अँजेलीनाच ब्रेस्ट कॅन्सरशी सामना करतेय असं नाही आणखी काही सेलिब्रिटी कॅन्सरशी लढा देत आहेत.. ग्रॅमी पुरस्कार विजेती शॅरेल क्रो हिला २००६मध्ये ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं वैद्यकीय तपासणीत उघड झालं होतं..२००५मध्ये ऑस्ट्रेलियन पॉप स्टर कॅलीला कॅन्सर असल्याचं समजल आणि त्यानंतर तिने शस्त्रक्रिया तसेच केमोथेरपीचा मार्ग अवलंबला..२००६मध्ये तिने शोगर्ल कमिंग होम टूरच्यामाध्यमातून आपण कॅन्सरवर मात केलंयच दाखवून दिलं...ऑस्ट्रेलियन गायीका ओलिव्हि न्यूटनलाही कॅन्सरचा सामना करावा लागला होता..तिने अंशता डबल मॅसटेकटॉमी शस्त्रक्रिया केली...तसेच केमोथेरपीचा अवलंब केला....

कॅन्सरवर मात करण्यासाठी अशा अनेक सेलिब्रिटिंनी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचाराचा आधार घेतलाय...आता अँजेलीनाने डबल मॅसटेकटॉमीचा मार्ग स्विकारुन आपण मायटी हार्ट असल्याचं दाखवून दिलंय..

बदलत्या जीवनशैलीने भारताला काही चांगल्या गोष्टी दिल्यात. पण याच जीवनशैलीने काही जर्जर आजारही दिलेत. त्यातलाच एक म्हणजे २० ते ४० वयोगटातल्या महिलांमध्ये वाढलेलं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण...

आताशा भारतातही ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलंय. पूर्वी साधारण:त चाळीशीच्या पुढच्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच प्रमाण होतं. पण आजच्या घडीला भारतात २० ते ४० वयोगटातल्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. भारतात २६ महिलांमागे एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होतो. हे प्रमाण गांभिर्याने विचार करायला लावणारच... याला कारण आहे बदलता आहार, जीवनशैली आणि मानसिक ताण. जास्त मसालेदार पदार्थांच्या सेवनानेही ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता वाढते. मासीक पाळी लाबंविण्यासाठी आणि गर्भधारणा टाळण्यासाठी महिला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचा सर्रास वापर करताना दिसतात. करीअरसाठी कुणाला गर्भधारणा लांबवायची असते. तर कुणाला काही धार्मिक कार्यक्रमासाठी मासिक पाळी लांबवायची असते. त्यासाठी या गोळ्यांचा वापर वाढत चाललाय. रोजच्या सोयीसोबतच या गोळ्या ब्रेस्ट कॅन्सरची समस्याही घेऊन आल्यात. त्यामुळं कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचा वापर टाळणंच योग्य. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. स्तनात न दुखणारी वेडीवाकडी गाठ जाणवते. स्तनाच्या त्वचेचा रंग बदलतो. स्तनाग्रातून स्त्राव बाहेर येतो, स्तानाग्रे आत ओढली जातात. त्याशिवाय काखेत किंवा मानेतही गाठ असण्याची शक्यता असते. ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या महिलेला ताप, अशक्तपणा जाणवतो, वजन कमी होत जातं. अशा प्रकारची कुठलीही लक्षणं दिसल्यास, तातडीने निदान करणं गरजेचं आहे. ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार शक्य आहे. मात्र त्याचं वेळेत निदान होणेही तितकंच गरजेचं आहे. एफएनएसी, बायॉप्सी, मॅमोग्राफी, सीटीस्कॅन, ट्युमर मार्कर या वेगवेगळ्या चाचण्यांमधून ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करता येतं. ब्रेस्ट कॅन्सरचं लवकरात लवकर निदान झाल्यास मृत्यूचं प्रमाणही १६ टक्क्यांनी कमी होते. शस्त्रकर्म, रेडिओथेरपी, केमोथेरपी अशा उपचारपद्धतींनी ब्रेस्ट कॅन्सर बरा होऊ शकतो. पण त्याचे निदान वेळेत व्हायलाच हवे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, May 15, 2013, 23:55


comments powered by Disqus