सौंदर्य पश्चिम घाटाचं! Beauty of Western Ghats

सौंदर्य पश्चिम घाटाचं!

सौंदर्य पश्चिम घाटाचं!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

जागतीक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण राज्यातील पर्यावरणाचा आढावा घेणार आहोत मात्र जगाने भारतातील ज्या पश्चिम घाटाची दखल घेतली तो पश्चिम घाट आहे तरी कसा ? उंच-उंच डोंगर...घनादट जंगलं.....विविध प्रकारचे प्राणी , आणि पक्षी ...हजारो प्रकारच्या वनस्पती...ही आहे भारतातील महान भौगोलीक पर्वतश्रृंखला...संयुक्त राष्ट्र संघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनं पश्चिम घाटाला दुर्मिळ जागतीक वारसा म्हणून घोषित केलंय...

भारताच्या नकाशावर डावीकडं महाराष्ट्र, गुरजरात आणि गोवापासून खाली कन्याकुमारी पर्यंत जाणारी एक रेषा दिसते..ही रेषा म्हणजे पश्चिम घाट असून १६०० किलोमीटर लांबीचा आणि १०० किलोमीटर रुंदीचा हा परिसर आहे...जैव विविधतेनं संपन्न असलेलाहा परिसर जागतिक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो...हिमालय पर्वत रांगापेक्षाही पश्चिम घाट जूना असून भारतातील २४ कोटी जनतेची तहान भागवण्याचं काम पश्चिम घाट वर्षानुवर्षे करत आली आहे.. पश्चिम घाट परिसर मोठ्या प्रमाणात वन्यजीव संपदा असून १३९ प्रकारचे सस्तन प्राणी,१७९ प्रकारचे उभयचर प्राणी,५०८ जातेचे पक्षी आढळतात..पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे इथ ६ प्रकारचे सस्तन प्राणी ,१६ जातीचे पक्षी आणि ८४ प्रजातीचे उभयचर केवळ याच प्रदेशात आढळतात..त्यामध्ये काही फुलपाखरं आणि सापांच्या जातीचा समावेश आहे..

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांपासून पश्चिम घाटाला सुरुवात होते..त्यामध्ये माथेरान, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर पाचगणी, अंबोली घाट यांचा समावेश आहे..महाराष्ट्रात याला सह्याद्रीची पर्वत रांग म्हणून ओळखलं जातं तर कर्नाटक आणि केरळात त्याला साहया पर्वतम् म्हटलं जातं...

जगातील आठ प्रमुख दुर्मिळ जैव विविधतेनं संपन्न असलेला प्रदेशापैकी पश्चिम घाट एक असून गेल्या काही वर्षात बेसमुर बांधकाम तसेच पर्यावरणाकडं दुर्लक्ष केल्यामुळे हळूहळू पश्चिम घाटाची सौंदर्य कमी होवू लागलंय..पश्चिम घाटात सुरुवातीच्या काळात असलेल्या वनस्पतींचा केवळ सात टक्केचं भाग उरला असून झाडं, झु़डपं आणि प्राण्यांची संख्या कमी होत आहे....

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगापासून सुरु होणारा पश्चिम घाट थेट कन्याकुमारी पर्यंत जावून पोहोचतो..केरळमधील पेरीयर अभरण्यातील हा प्रदेश जैवविविधतेनं संपन्न असून जागतीक पातळीवर त्याला ह़ॉटस्पॉट म्हणून ओळखलं जातं..आज आपण या पेरीयर अभयरण्याची सफर करणार आहोत...

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतराजीपासून सुरु झालेला पश्चिम घाट थेट केरळ पर्यंत पसरला आहे..पश्चिम घाटाने केरळचा भूभागही जैवविविधतेनं संपन्न केलाय..केरळ मधील पेरीयर टायगर रिझर्व अँड ईरवीकोलम नॅशनल पोर्कही याच पश्चिम घाटात वसला आहे...इथलं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असंच आहे..विविध प्राणी आणि पक्षांचं हे आश्रय स्थान आहे...हा नॅशनल पार्क पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे..

आज हा परिसर पेरीयर टायगर रिझर्व पार्क म्हणून ओळळा जात असला तरी १८८७मध्ये इथली परिस्थिती काही वेगळीच होती.. तत्कालीन मद्रास राज्याला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटिश सरकारने केरळचे राजे त्रावणकोर यांच्या संमतीने पश्चिम घाताटल्या पेरीयर नदीवर धरण बांधण्याचा प्रस्ताव मांडला..त्यानंतर १८९५मध्ये मुल्लपेरीयर धरणाची निर्मिती करण्यात आली..जैवविविधतेच्या दृश्टीने हा भूभाग अत्यंत संपन्न होता..मात्र प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार सुरुच होते..वन्यजीवांची शिकार रोखण्यासाठी स्वातंत्र्याननंतर या प्रदेशाला अभयरण्याचा दर्जा देण्यात आला..या प्रदेशात वाघांची संख्या लक्षणीय होती..त्यामुळे हा भूभाग वाघांसाठी संरक्षीत करण्यात आला.. पुढे १९८२ मध्ये पेरीयर राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली..आज केरळ सरकारकडून या परिसरात प्राण्यांच्या संरक्षणासोबतच पर्यटनालाही चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे...हे अभयरण्य असल्यामुळे पर्यटकांच्या मुक्त वावरावर इथं बंदी आहे..मात्र बोट सफारीतून तुम्हाला इथल्या जैव संपत्तीचं दर्शन घेता येतं..

मध्य केरळच्या इडूक्की जिल्ह्यातील टेकडी भागात कार्डमम आणि पंडालम हिल परिसरात हे जंगल पसरलं आहे..या परिसराच्या दुस-या बाजूला तमिळनाडू राज्य आहे..समुद्र सपाटीपासून साडे पाच हजार फुटावंर हे सदाहरित जंगल वसलं आहे..पेरियर आणि पंबा नदीच्या खो-यामुळे हा भूभाग अधिक संपन्न झाला आहे..सुमारे साडे सहा हजार फुटांचं कोट्टमलई शिखरही याच जंगलात आहे..या परिसराला दुहेरी मान्सूनचं वरदान लाभलं असून जून ते डिसेंबर या कालावधीत वरुनराजा मनसोक्त बरसतो...भरपूर पावसामुळे इथली जैवसंपत्ती समृद्ध झाली आहे..साधारणपणे दोन हजार प्रकारच्या वनस्पती या परिसरात असून त्यापैकी ६० वनस्पती इंड्रमिक असल्यामुळे केवळ त्या याच परिसरात आढळतात..पश्चिम घाटाच्या या परिसरात १७० प्रकारचे फर्म ,१६० प्रकारचे ग्रास , १५५ प्रकारचे आर्किडस, १४५ प्रकारचे फूल वनस्पती पहायला मिळतात..या प्रदेशाचं वैशिष्ट म्हणजे इथ आढळणा-या सुमारे चारशे प्रकारच्या वनस्पती या वनऔषधी आहेत... जैव विविधतेने हा प्रदेश संपन्न असून हीच पश्चिम घाटाची ओळख आहे..

पेरीयर अभरण्य हे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षांचं घर आहे..अत्यंत दुर्मिळ असलेल्या प्राणी इथं पहायला मिळतात..फुलपाखरांच्या दिडशेहून अधिक जाती इथं पहायला मिळतात.

केरळ मधील पेरीयर राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारचे प्राणी आहेत..त्यामध्ये ६२ प्रकारच्या सस्तन प्राण्यांचा समावेश आहे.. माकडांच्या चार दुर्मीळ जातीही केवळ इथंचं आढळतात.. पश्चिम घाटातल्या दक्षिण भागात आढळणारा लायन टेल मकाक हा त्यापैकीच एक आहे...कमा होत चाललेलं जंगल आणि शिकार यामुळे हा प्राणी दुर्मिळ होत चालला आहे..आक्रम स्वभावाचा हा प्राणी झाडाच्या शेंड्यावर राहणं पसंत करतो...लायन टेल मकाक प्रमाणेच इथं निलगीरी लंगूरही पहायला मिळतो..निलगीरी पर्वत रांगांमध्ये ही माकडाची प्रजाती आढळून येते..त्यामुळे त्याला निलगिरी लंगूर ही ओळखम मिळाली.

पश्चिम घाटातील या प्रदेशात आणखी एक माकडाची जात आढळून येते आणि ती म्हणजे बोनेट मकाऊ ...या माकडाच्या डोक्यावर भरपूर केस असतात आणि ते टोपी प्रमाणे भासतात.. त्यामुळेच त्यांना बोनेट मकाऊ म्हटलं जातं. बोनेट मकाऊ हे मोठ्या प्रमाणात इथं आढळतात.


पेरीयर राष्ट्रीय उद्यानाची सफारी करतांना पेरयर लेकच्या दोन्ही बाजूला अनेक सस्तनप्राणी नजरेस पडतात..सांबर, चितळ, पिसूरी हरण,निलगिरी थार यांचे कळप पहायला मिळतात..अत्यंत लाजाळू समजला जाणारा गवाही लक्षवेधून घेतो. जंगली डुक्करही इथ पहायला मिळतात.. प्राणां प्रमाणेच विविध प्रकारचे पक्षीही मुक्तपणे विहार करतात. अनेक स्थलांतरीत पक्षांबरोबरचरॉकेट टेल ड्रँगो, व्हिसलिंग थ्रश, मलबार हॉर्नबिल या पक्षांचं तर हे वस्तीस्थान बनलं आहे..खंड्याच्या चार जाती इथं आढळुन येतात..डार्ट , स्नेक बर्ड, बगळा असे विविध पक्षी नजरेस पडतात..अत्यंत विषारी समजल्या जाणा-या किंग कोब्राप्रमाणेच सापांच्या तीस जाती याच परिसरात पहायला मिळतात..कासव आणि लिझार्टही इथ आहेत तसेच माशांच्या ३८ जाती इथं आढळून येतात. पेरीयर राष्ट्रीय उद्यानात तब्बल १६० जातीचं फुलपाखरं असून हे या उद्यानाचं एक वैशिष्ट्य आहे..

हे जंगल अत्यंत घनदाट असल्यामळे कुख्यात विरप्पनेही याच जंगलात आश्रय घेतला होता..विरप्पनच्या काळात शिकारवर लगाम लावणं अवघड झालं होतं..मात्र विरप्पनच्या खातम्यानंतर परिस्थिती बदलली आहे..आदिवासींना जंगल संरक्षण कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आलंय..

पेरीयर अभरण्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असल्यामुळे हा परिसर ब-याच प्रमाणात संरक्षित राहण्यास मदत झाली आहे. पेरीयर प्रमाणेच ईर्वीकुलम राष्ट्रीय उद्यानातही विविध वन्यजीव पहायला मिळतात..ईर्वीकुलमचं वैशिष्ट्य म्हणजे जगात निलगीरी थार ही प्रजाती केवळ याच ठिकाणी पहायला मिळते..आणि ती पहाण्यासाठी जगभरातून पर्यटक इथं येतात

इर्वीकुलम राष्ट्रीय उद्यान ...पश्चिम घाटातील या अभयरण्यातही मोठ्या प्रमाणात वन्यजीव संपदा आहे..जगात केवळ याच ठिकाणी निलगिरी थार आढळतात..त्यामुळे याला वेगळं महत्व आहे..मुन्नर विभागतल्या अन्नामोडी जंगलात हे अभरण्या वसलं असून चहाच्या मळ्यासाठी हे प्रसिद्ध असलेल्या मुन्नारपासून हे केवळ १३ किमीवर आहे...निलगीरी थार ही इंटेमिक प्रजाती असल्यामुळे पृथ्वीवर केवळ याच भागात आढळते..या पार्श्वभूमीवर केरळ सरकारनं संवर्धनासाठी अनेक उपाय योजना केल्या असून त्यामुळेच ही प्रजाती इथं पहायला मिळते...अभयरण्यात जाण्यासाठी पर्यटकांना केवळ तिथल्याच वहानाचा वापर करता येतो..अभरण्यात एक किलोमीटर पर्यंत पर्यंटकांना पायी चालत प्राणी पहाता येतात..अत्यंत लोभस अशी बकरी हिमालयीन थार सारखीच आहे.

राखट रंगाच्या स्टॉकी कोटमुळे ती निसर्गात सहज मिसळून जाते...थारचे नर मादीपेक्षा थोडे मोठे असतात..नर आणि मादीला शिंगे असली तरी नराला १६ इंच लांबी पर्यंत शिंगे असतात.. निसर्ग सौंदर्याने हा परिसर नटलेला असल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं येतात..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 5, 2013, 23:45


comments powered by Disqus