Last Updated: Sunday, September 23, 2012, 08:45
wwww.24taas.comपारंपरिक पीक घेऊन आपल्याच शेतक-यांमध्ये स्पर्धा करण्यापेक्षा अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी आता नव नव्या पीक पद्दतींचा स्वीकार करतायत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील संजय आहेर या शेतकऱ्याने ही कमी पाण्यात बीट पिकाचं उत्पादन घेउन शेतकऱ्यांसमोर पर्यायी पीकांचा आदर्श ठेवलाय
अवर्षणग्रस्त भागातील इथला शेतकरी पावसाअभावी बसून आहे, मात्र संजय आहेर यांनी अवघ्या 10 गुंठ्यात बीट पीक घेण्याचं ठरवलं. पारंपरिक पीक न घेता वेगळ पीक घेण्याचा विचार केला आणि तो यशस्वीही करुन दाखवला. सातत्याने आहे तेच पीक घेत राहण्यापेक्षा नवं पीक घेतलं तर बाजारपेठेत चांगला दर मिळेल हा त्यांचा विश्वास खरा ठरला.
अर्धा किलो बिट पीकाचं बियाणं आणून त्यांनी जुलै मध्ये लागवड केली. तुषार सिंचन पद्धतीमुळे त्यांना कमी पाण्यात हे पीक घेता आलं. कमीत कमी 15 हजार रुपये खर्च करुन त्यांनी अडीच महिन्यात बीट पिकाचं यशस्वी उत्पादन घेतलं.सध्या बाजारपेठेत एका कॅरेटला 100 ते 125 रुपये एवढा दर मिळतो. सध्या ते दररोज आठ ते दहा कॅरेट उत्पादन विक्रीसाठी नेत आहेत. येवला,कोपरगांव,वैजापूर अशा बाजारपेठेत बीटची विक्री समाधानकारकर होत असल्याचंही त्यांनी सांगितलं
शेतक-यांनी एकाच पिकाची लागवड न करता वेगेवेगळ्या भाजीपाला पिकांचा समावेश करायला हवा. यामुळे एकाच पिकाची बाजारपेठेत आवक वाढणार नाही परिणामी शेतमालाचे दर पडणार नाही तसेच लागवडीचं क्षेत्र कमी करुन दर्जेवर भर दिला तर शेतक-यांना याचा नक्कीच फायदा होईल.त्यामुळे संजय आहेरांसारखी परंपरा मोडीत काढणारी वृत्ती शेतक-यांनी जोपासायला हवी.
First Published: Sunday, September 23, 2012, 08:45