www.24taas.com, मुंबईसस्पेंस, एक्शन, ग्लॅमर आणि रोमांस यांच मिश्रण...
जगातील एकमेव व्यक्तिरेखा ज्याची प्रत्येक कथा, सिरीज केवळ हिट नाही तर सुपर हिट आहे...तो केवळ एकाच देशात हिट आहे अस नाही तर जगभर तो सुपर हिट आहे...
त्या व्यक्तिरेखचं नाव आहे...जेम्स बॉण्ड...
जेम्स बॉण्ड पडद्यावर येवून आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत..गेली पाच दशकं जेम्स बॉण्ड सिनेरसिकांच्या मानावर अधिराज्य गाजवतोय...असं काय आहे या व्यक्तिरेखेत..त्यावर एक नजर...
५ ऑक्टोबर १९६२ ते आजतागायत जेम्स बॉण्डने अनेक वेळा आपला चेहरा बदलला आहे..पण अनेक वेळा चेहरा बदलूनही त्याची व्यक्तिरेखा जराही बदलली नाही. गेल्या पाच दशकात जेम्स बॉन्डने सहा वेळा आपला चेहरा बदलला आहे. पण त्याचा चाहता वर्ग मात्र तसूभरही कामी झाला नाही. ५ ऑक्टोबर १९६२ला बॉन्डपट मालिकेतील डॉ.नो हा पहिला सिनेमा पडद्यावर झळकला. या सिनेमात जेम्स बॉन्डची भूमिका ३२ वर्ष वयाच्या शॉन कॉनरी या अभिनेत्याने साकारली होती. पण शॉन कॉनरीची या सिनेमासाठी काही सहजा सहजी निवड झाली नव्हती. जेम्स बॉन्डच्या शोधासाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत अंतिम सहाजणांची निवड झाली होती. त्यामध्ये शॉन कॉनरी एक होता. पुढे शॉन कॉनरी यांनी सलग पाच बॉन्डपटात जेम्स बॉन्डची भूमिका साकारली. बेन फिज या दिग्दर्शकाने शॉन कॉनरीसाठी बाँडपटाच्या निर्मात्याकडं शब्द टाकला होता. कॉनरीचं वैशिष्ट म्हणजे त्यांनी आपल्या सर्व बॉन्डपटात विग वापरला आहे....
‘फ्रॉम रशिया ऊईथ लव्ह’ हा बॉन्डपट मालिकेतील दुसरा सिनेमा होता..या सिनेमासाठी निर्मात्यांनी सिनेमाचं बजेट दुप्पट केलं होतं..तसेच त्याचं चित्रिकरण युरोपात करण्य़ात आलं होतं..या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या सिनेमाच्य़ा तुलनेत या सिनेमात हिंसा अधिक दाखवण्यात आली होती....
अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन .एफ. केनडी यांनी आपल्या आवडत्या पुस्तकांमध्ये ‘फ्रॉम रशिया वुईथ लव्ह’ याचा उल्लेख केल्यामुळे या बॉन्डपटला मोठी प्रसिद्धी मिळाली आणि त्याचा फायदा निर्मात्यांना झाला..या नंतर श़ॉन कॉनरींनी गोल्डफिंगर, थंडरबॉल, यु ओन्ली लिव्ह ट्वाईस या बॉन्डपटात जेम्स बॉन्डची भूमिका साकारली...यु ओन्ली लिव्ह ट्वाईस हा शॉ़न कॉनरींचा शेवटचा बॉन्डपट ठरला..
तो पर्यंत १९६९ उजाडलं होतं.... बॉ़न्डपटाच्या निर्मात्यांनी जॉर्ज लेझेनबाईची बॉन्डच्या भूमीकेसाठी निवड केली...मुळचा ऑस्ट्रेलियन मॉडेल असलेला जॉर्ज ऑन हर मजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस या बॉन्डपटातून झळकला....पण जॉर्जने हा सिनेमा केल्यानंतर बॉन्डपटातून माघार घेतली..
जॉर्ज सोडून गेल्यानंतर निर्मात्यांनी पुन्हा शॉन कॉनरींना गळ घातली... डायमन्ड्स फॉर एव्हर या सिनेमातून ते पुन्हा बॉन्डच्या भूमिकेत पहायला मिळाले...
७०च्या दशकता पुन्हा एकदा बॉन्डपटाच्या निर्मात्यांनी जेम्स बॉन्डच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरु केला..आणि ३५ वर्षीय रॉजर मूर यांची निवड करण्यात आली..लिव्ह एन्ड लेट डाय,द मॅन ऊईथ गोल्डन गन,द स्पाय व्हू लव्हड मी,फॉर युवर आईज ओन्ली अशा सात सिनेमातून रॉजर मूर यांनी जेम्स बॉन्डची भूमिका साकारली. जेम्स बॉ़न्डला प्रसन्न आणि विनोदी छटा देण्याचं काम रॉजर मूर यांनी केलं...
फॉर युवर आईज ओन्ली हा त्यांचा शेवटचा बॉ़न्डपट ठरला..त्यानंतर टिमोथी डाल्टन यांना जेम्स बॉन्डच्या भूमिकेसाठी करारबद्ध करण्यात आलं..द लिव्हिंग डे लाईट,लायसन्स टू किल हे दोन सिनेमा टिमोथीने केले...
त्यानंतर पिअर्स ब्रोसनन हा नवा जेम्स बॉन्ड बनला...गोल्डन आय,टुमारो नेव्हर डायईज,द वर्ल्ड इज नॉट इनफ,डाय अनादर डे या बॉन्डपटातून पिअर्स ब्रोसनने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम केलं..पुढे डॅनिय़ल क्रेग याच्यावर ही जबाबदीर सोपवण्यात आली...कॅसिने रॉयल , क्वाँटम ऑफ सोलस आणि आज प्रदर्शित झालेला स्काय फॉल या सिनेमातून डॅनियलने जेम्स बॉन्ड रुपेरी प़डद्यावर साकारला आहे...
बॉण्डपटाची भुरळ पडण्याचं अनेक वैशिष्ठ आहेत.. बॉण्डपटाची सुरुवात झाली त्या काळाची बॉण्ड हा गरज होती.. आज काळ बनला असला तरी बॉण्डचा वेगवान प्रवास आजच्या पीढीलाही तेवढाच प्रेमात पाड़तोय..
बॉन्ड पटात जेम्स बॉन्डला जेम्स बॉन्ड ठरवणा-यात त्याच्याकडं असलेले अत्याधुनिक साधनांचा मोठा वाटा आहे..जेम्स बॉन्ड कोणत्याही योजनेवर जाण्यापूर्वी त्याला विशिष्ट प्रकारे अत्याधुनिक अस्त्रशस्त्र दिले जातात..आणि त्याच्याच जोरावर तो शस्त्रूवर मात करण्यात यशस्वी ठरतो...असं बॉन्डपटाचं आजवरचं सुत्र आहे..ज्या काळात बॉन्ड पडद्यावर झळकले तो काळ दुस-या युद्धानंतर होता..दुस-या युद्धानंतर जनतेला तिसरं युद्ध नको होतं..त्याच काळात जेम्स बॉ़न्ड पडद्यावर आला..आणि प्रेक्षकांना त्याला डोक्यावर घेतलं...जेम्स बॉन्डची कार प्रसिद्ध आहे..सर्व आधुनिक यंत्रणांनी सज्ज अशी कार बॉन्डच्या सेवेला असते....शस्त्रूचा पाठलाग करण्यासाठी बॉन्ड आपल्या या खास कारचा वापर करतो...बॉन्ड पटाचं वैशिष्ट म्हणजे त्याची कथा कधीच एका देशात घडत नाही..तो आपली योजना पुर्ण करण्यासाठी विविध देशात जातो..आज पर्यंत बॉन्ड़पटातून विविध देशांच दर्शन त्याच्या चाहत्यांना त्यानं घडवलं आहे..बॉन्डपटाचं वैशिष्ट्य म्हणजे बॉ़न्डचा मुकाबला हा नेहमीच एका बड्या खलनायकाशी होतो..असा खलनायक जो जगावर आपली हुकुमत गाजविण्याच बेतात असतो..पण शेवटी जेम्स बॉन्ड त्याचा खातमा करण्यात यशस्वी होतो..बॉन्डपटाची सिग्नेचर ट्यून प्रसिद्ध आहे...ती संपूर्ण चित्रपटात ती ऐकायला मिळते.
जेम्स बॉण्डची कहानी त्या सुंदर अभिनेत्री शिवाय पूर्णचं होवू शकत नाही...ज्यांनी बॉण्डच्या रोमांचकारी सफरीला ग्लॅमरचा तडका दिला आहे. गेल्या पन्नास वर्षात कुणी कुणी बॉण्ड सोबत जीव धोक्यात घातलाय आणि त्याला कुठपर्यंत साथ दिलीय ते आता आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत...
जेम्स बॉण्डचा कुठलाही चित्रपट म्हटला की त्याच्या अवती भोवती दिसणा-या सुंदर ललना ओघाने आल्याच. कधी तो त्या सुंदरींच्या प्रेमात पडतो तर कधी त्या ललना त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. पण तो कधी त्यांच्या मोहपाशात अडकत नाही हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. बॉण्डपटातील नायिकाही जेम्स बॉन्ड प्रमाणेच सिनेमाचं आकर्षण राहिल्या आहेत..बॉण्डचा आगामी चित्रपट कोणता या विषयी जगभरात जेव्हडं कुतुहल असतं तेव्हडं त्यातील नायिका कोण याविषयीही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल असतं.
बॉण्डपटातील नायिका ही काही वेगळीच असते. कधी ती त्याच्यासाठी जीव धोक्यात घालते तर कधी तो जिवावर उदार होवून तिचा जीव वाचवतो. पण बॉन्ड पटात केवळ त्याची हिरॉईनच असते असं नाहीत त्याच्या दुश्मनांनी पाठवलेली विषकन्याही त्याला संपवण्याचा बेतात असते. आजपर्यंत आलेल्या सर्व नायिका या विलक्षण देखण्या, रुपगर्वीता आणि ग्लॅमर लाभलेल्या अशाच आहेत. देखणेपणाला लाभलेले निदर्यीपण हा एकच निकष बॉण्डच्या नायिकाना सगळ्यात वेगळ ठरवून गेला.. कुठल्याही संकटाची पर्वा न करता, जिवावर उदार होतं केलेले स्टंट आणि त्यापेक्षाही घायाळ करणारी नजर ही बॉण्डगर्लची सर्वात मोठी ऍसेट ठरलीय.
1962 साली प्रदर्शित साली डॉ.नो मध्ये उर्सुला एन्ड्रेस ही स्विडीश अभिनेत्री, इऊनिसं गेसेन आणि झेना मार्शल या ब्रिटीश अभिनेत्रींनी बॉण्डच्या नायिका होण्याचा मान मिळवलाय.
फ्रॉर्म रशिया विथ लव्ह या सिनेमात डॅनियल बांयची ही इटालियन अभिनेत्री होती. डॉ.नो मध्ये असणा-या इउनिस गेसन या ही बॉण्डपटात स्थान पटकावलं होतं. मार्टीन बेसविक या ब्रिटीश आणि आलिझा गुल या इस्त्रायली मदनिकेची जादूही सिनेरसिकांवर चालली होती..
गोल्डफिंगर या बॉण्डपटात हॉर्नर ब्लेकमेन या इंग्लिश अभिनेत्रीने आपली नजाकत दाखवली होती.. त्याचबरोबर श्रेर्लीन इटॉन आणि तानिया मालेट या ब्रिटीश हिरोईन्सनी जलवा दाखवला होता..थंडरबॉलमध्ये क्लाऊडीया ऑगर, लुसियाना पाऊलीसी, म़ॉली पेटर्स, मार्टीन बेसविक, मारएसी मित्सुओकोने बॉण्डगर्ल दाखवत स्क्रिन शेअर केली होती..
यु ओन्ली लिव्ह ट्वाईस मध्ये दोन जपानी हिरोईन्स झळकल्या होत्या. मिई हमा आणि अकिको वाकाबायाशी यां जपानी हिरोईन्ससोबत त्साई चिन आणि करीन डोर या ललनाही बॉण्डसोबत स्टंट केलाय...
ऑन हर मेजेस्टी सिक्रेट सर्व्हीस डायना रिग, कॅथरेयिन शेल एन्जेला सॉअलर या अभिनेत्रीने आपला जलवा दाखवत रसिकांना घायाळ केले होते..
डायमंडस आर फॉरएव्हर मध्ये जिल जॉन, त्रिना पार्कस या अमेरिकन हिरोईन्ससोबत डेनिस पेरिईर, लाना वुड लोला लार्सन यांनी मदनिकांनी बॉण्डसोबत सिल्वर स्क्रिनवर हंगामा केला होता..
लाईव्ह एण्ड लेट डायमध्ये जेनी सीमूर, ग्लोरीया हेन्रीने आणि मेंडलिन स्मिथने आपली अदाकारी दाखवली..
द मॅन विथ गोल्डन रुल मध्ये ब्रिट इकलेंड, मॉड एडम्स, करेमन दू सुटाआओ यांच्यासोबत फ्रान्कोसी थेरीनं बॉण्डनायिक बनत अधिराज्य केलं होतं..
द स्पाय हू लव्हड मी मध्ये ब्रार्बरा बांचस फेलिसीटी यॉर्क, सू व़ॉर्नर, कार्लोन मुर्नो, ओल्गा बिसेरानं आपली अदाकारी दाखवली होती.
अशा प्रकारे नोयमी हॅरिस पर्यंतचा हा प्रवास बॉन्ड पटातील नायिकांनी केला आहे...
द बीटल्सबिटल्स या जगप्रसिद्ध बँन्डला पन्नास वर्ष पूर्ण होतायेत. बिटल्स 1960 च्या दशकात संपूर्ण संगितविश्वावर अधिराज्य गाजवलं. तरुणाईला ज्या बँन्डनं मोहिनी घातली असा हा बिटल्स फक्त लंडनपुरता मर्यादित न राहता जगातल्या तरुणाईचा आवाज झाला...
‘बिटल्स’ या एका नावानं 1960 च्या दशकातल्या अवघ्या जगावर गारुड घातलं होतं. बिटल्सच्या या बँन्ड ग्रुपनं आपल्या संगीताच्या तालावर अवघ्या जगाला थिरकायला लावलं..... 1960मध्ये लंडनच्या जॉन, पॉल, जॉर्ज आणि रिंगो या 4 संगीतवेड्या तरुणांनी आपली लाँग प्लेट डिस्क बाजारात आणली. या डिस्कची त्यावेळी फारशी दखल घेतली गेली नाही. मात्र ती फक्त एका संगीतक्रांतीची सुरुवात होती. त्यानंतर बिटल्स बँडनं मानवी जिवनात एक इतिहास घडवला. एकानं लिहलेल्या, दुस-यांनी संगितबद्ध केलेल्या ओळी, तिस-यांनं गाण्याच्या काळात बिटल्सनं स्वतःची गाणी स्वतः लिहली, स्वतः संगीतबगद्ध केली आणि स्वतः गायली देखील...
बिटल्सच्या कारकिर्दीत अकरा रेकॉर्डस् निघाल्या. बिटल्स हे फक्त संगीतचं राहिलं नाही तर तो जगातल्या तरुणाईचा आवाज झाला. जन्माला आली तेव्हापासून दुस-या महायुध्दाच्या मानवी संहार पाहिलेल्या ब्रिटनमधील आणि तेव्हाची जगातील एक पिढी तरुण झाली होती. त्या पिढीला पुन्हा तिसरं महायुध्द नको होते. ही पिढी बिटल्सच्या संगितात रममाण झाली. गोल गळ्याचे जॅकेट्स, लांब केस आणि हातात गिटार घेतलेली तरुणाईच्या तोडीं असलेली बंडखोरीची भाषा स्टेटस सिम्बॉल बनली होती. तरुणाची बदललेली मानसिकता, त्यांची भाषाशैली, आणि जिवनशैली बिटल्समध्ये दिसू लागली. रुढ चालीरितींना तिलांजली देऊन भौतिक जगाकडं तुच्छतेनं पाहणा-या त्या तरुण पिढीनं बिटल्सला डोक्यावर घेतलं. त्या काळी ज्या चळवळी जन्माला आल्या. त्या चळवळींचा आवाज होता बिटल्स... जे प्रचलित होतं ते झुगारुन चौकटीपलिकडचं करण्याचं धाडस करण्याची प्रेरणा बिटल्सनं तरुणाईला दिली. त्यामुळंच अनेक चळवळींवर बिटल्सचा प्रभाव स्पष्टपणं दिसतं होता. लंडन ते शिकागो आणि शिकागो ते मुंबई सर्वत्र बिटल्सचा जयघोष होता. त्याकाळी भारतातल्या रेडिओ सिलोनवर फक्त भारतीय शास्त्रिय संगितच चित्रपट संगीत ऐकवंल जायचं. बिटल्सचा प्रभाव इतका होता की रेडिओ सिलोनवरही बिटल्सचं संगित ऐकवावं लागलं. आणि ते तितकचं लोकप्रियही झालं...
बिटल्सचा भारताशी संबध नव्हता असही नव्हता या ग्रुपची भारताशी नाळ जोडली गेली होती. महर्षी महेश योगी यांच्याकडून या ग्रुपनं अध्यात्मिक दीक्षा घेतली होती. त्यावेळी काही काळ हा ग्रुप भारतात होता. बिटल्सपैकी एक असलेल्य़ा जॉर्जनं सतारवादक पंडित रवीशंकर यांना आपला गुरु मानलं होतं.
1960 च्या दशकात या बँडचे अनेक शो जगभरात झाले. प्रसिद्धीची मोठी माध्यमं नसतानाही बिटल्सच्या शोला लाखो तरुण तरुणींच्या उड्या पडत होत्या. बिटल्सला पन्नास वर्ष झाली असली तरी बिटल्स कालबाह्य झालं नाही.... ते आजही तेवढचं ताजं आहे.... चिरतरुण आहे...
First Published: Saturday, October 6, 2012, 00:02