नात्यांचा पुर्नजन्म...मुलीच्या जन्माने भावाची आजारावर मात, Born Again brother to sister in Pune

नात्यांचा पुर्नजन्म...मुलीच्या जन्माने भावाची आजारावर मात

नात्यांचा पुर्नजन्म...मुलीच्या जन्माने भावाची आजारावर मात
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

आता पुण्यामधून एक वेगळी बातमी. नात्यांवरचा विश्वास आणखी दृढ करणारी. पुण्यातल्या सावंत कुटुंबीयांच्या घरात एका मुलीचा जन्म झाला. ही मुलगी जन्माला आली ती सावंत कुटुंबीयांसाठी सुखाची भरभराट घेऊनच.... तिच्या जन्मानं आनंदीआनंद तर झालाच आणि तिच्या भावालाही जीवदान मिळालं.... पाहुयात नात्यांची सुंदर गुंफण असलेली ही गोष्ट.

पुण्यातल्या राजानंदिनीचा जन्म झाला तोच मुळी तिच्या भावाला जीवदान देण्यासाठी आणि सावंत कुटुंबीयांच्या घरातलं सुख पुन्हा आणण्यासाठी..... पुण्यातल्या सावंत दाम्पत्याच्या पृथ्वीराज आणि राजनंदिनी या मुलांकडे पाहिलं तर साधारण वर्षभरापूर्वी या दोघांवरही मोठी सर्जरी झाली, असं वाटणारही नाही. पृथ्वीराजला वयाच्या तिस-या वर्षी थैलेसिमिया झाला.... या आजारामुळे रक्त देण्यासाठी पृथ्वीराजला वारंवार हॉस्पिटलमध्ये न्यावं लागायचं. त्याचवेळी त्यांची भेट डॉक्टर विजय रामन यांच्याशी झाली. सावंत दाम्पत्याला जर दुसर मुल झालं आणि त्या बाळाचा बोन मॅरो मॅच झाला तरच पृथ्वीराजच्या आजारावर तोडगा निघेल, असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. सुरुवातीला गोंधळात असलेल्या सावंत दाम्पत्यानं डॉक्टरांचा हा सल्ला मानला आणि राजनंदिनीचा जन्म झाला. राजनंदिनी फक्त साडे सात महिन्यांची असताना ऑपरेशन करण्यात आलं....आणि ते यशस्वीही झालं...

आता पृथ्वीराजची प्रकृती चांगली आहे. गेल्या अकरा महिन्यांपासून त्याला रक्त द्याव लागलेलं नाही. डॉक्टरांच्या रुपात देव आणि मुलीच्या रुपात जीवनदायिनी मिळाल्याचं त्यांचे आई बाबा सांगतात.

हे ऑपेरशन झालं त्यावेळी राजनंदिनी ही देशातली सगळ्यात लहान बोन मॅरो डोनर असेल याची पुसटशी कल्पनाही डॉक्टरना नव्हती. मात्र नुकताच भारत स्टेम सेल रजिस्ट्रीचा रेकॉर्ड प्रसिद्ध झाला. त्यावेळी राजनंदिनी ही सर्वात लहान डोनर असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. आता तिचं नाव लिम्का आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राजनंदिनीचं नाव गिनीज बुकमध्ये जाईलही, पण तिच्या जन्मानंतर सावंत कुटुंबीयांचं सुख परत आलंय, तो आनंद कशातचं मोजता येणार नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Friday, February 28, 2014, 08:11


comments powered by Disqus