‘सुपर हर्क्युलस’ची वैशिष्ट्ये…C-130J Super Hercules aircraft is equipped with several features

‘सुपर हर्क्युलस’ची वैशिष्ट्ये…

‘सुपर हर्क्युलस’ची वैशिष्ट्ये…
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

भारताचं `सी-१३० जे सुपर हर्क्युलस` हे बलाढ्य मालवाहू विमान जगातील सर्वांत उंचीवरील दौलत बेग ओल्डी तळावर उतरलं आणि चीनला धडकी भरली. या ` सी-१३० जे सुपर हर्क्युलस` विमानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे खराब हवामानात सुद्धा उड्डाण आणि लँडिग करू शकतं.



रणनितीच्या दृष्टीनंही ‘सुपर हर्क्युलस`चं खास महत्त्व आहे.

या विमानाला लँडिंग करण्यासाठी जास्त रनवेची गरज नाही.

कोणत्याही प्रकारच्या हवामानात हे विमान उडू किंवा लँड होऊ शकतं.

२० टन सामान उचलण्याची विमानाची क्षमता आहे.

या विमानातून जवळपास ८० सशस्त्र जवान एकाचवेळी जावू शकतात.

हवाई दलाचं हे सगळ्यात मोठं विमान आहे.

उत्तराखंड प्रलयानंतर मदतीच्या वेळी या विमानानं महत्त्वाची भूमिका बजावली.

`सी-१३० जे सुपर हर्क्युलस`च्या उपस्थितीमुळं आता सीमारेषेवर मोठ्या संख्येनं जवानांना नेता-आणता येणार आहे. शिवाय त्यांना पहिले पेक्षा जास्त प्रमाणात रसदही पुरवता येईल. लद्दाकमध्ये सध्या तैनात असलेल्या जवांनाचं मनोधैर्य वाढविण्यासाठी ‘सुपर हर्क्युलस`ची सीमारेषेजवळील उपस्थिती महत्त्वाची ठरेल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 21, 2013, 10:59


comments powered by Disqus