`काळ आला होता, पण...` Child survives from the major accident

`काळ आला होता, पण...`

`काळ आला होता, पण...`
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

‘काळ आला होता पण वेळ नाही’ असं आपण बऱ्याचदा दुसऱ्यांचे अनुभव ऐकतो. पिंपरीतल्या सात महिन्यांच्या शुभमच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल.

आईच्या कुशीत खेळणाऱ्या ७ महिन्यांच्या चिमुरड्या शुभमला त्याच्या वडिलांनी 30 फूट उंचावरुन रेल्वेरुळांवर फेकून दिलं होतं. परंतु शुभमचं नशीब बलवत्तर असल्यानं त्याचा जीव तर वाचलाच, शिवाय खरचटण्यापलिकडे त्याला मोठी जखमही झाली नाही. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाला व्यवस्थित सांभाळत नसल्याच्या कारणावरुन पिंपरीतल्या दत्ता देशमुखचं आपल्या पत्नीशी जोरदार भांडण झालं. त्यानंतर तिच्याकडून शुभमला हिसकावून घेऊन दारुच्या नशेत त्यानं शुभमला उड्डाणपुलावरून खाली फेकलं....

परंतु दैवी कृपेनं त्याचा जीव वाचला. सध्या या चिमुकल्याची प्रकृती ठणठणित असून त्याच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.छोट्या शुभमवर ओढवलेलं संकट आणि त्याची त्यातून झालेली सुटका लक्षात घेता काळ आला होता पण वेळ नव्हती....असचं म्हणावं लागेल....

First Published: Thursday, November 8, 2012, 18:33


comments powered by Disqus