मृत्यूची उडी,Courage to death

`मृत्यूची उडी`

`मृत्यूची उडी`
www.24taas.com,मुंबई

जिथं आकाशाची हद्द संपते तिथं अंतराळ सुरु होतं आणि तेथूनच फेलिक्स उडी घेणार आहे. त्यामुळेच अवघ्या जगाचं लक्ष त्याच्या उडीकडं लागलंय. ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीने अंतराळातून उडी मारण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतलाय. मग फेलिक्स बॉमगार्टनरचं काय होणार? त्याची ही योजना यशस्वी होणार का? यापूर्वी त्याने अशाच प्रकारे कारनामे केले आहेत का? त्याला या योजनेत कोण मदत करतंय? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, `मृत्यूची उडी`मधून.

खरंतर फेलिक्स मंगळवारीचं अंतराळातून स्वत:ला झोकून देणार होते. पण अचानकपणे हवामानात बदल झाल्यामुळे त्यांना आपली योजना पुढे ढकलावी लागली. न्यू मेक्सिकोतील हवामान सामान्य झाल्यास गुरुवारी फेलिक्स अंतराळातून उडी घेण्याची शक्यता आहे.

एव्हडी सगळी आव्हानं असतानाही ऑस्ट्रेलियातील फेलिक्स बॉमगार्टनर ती मृत्यूची उडी घेण्यास सज्ज झाला आहे..खरं तर तो मंगळवारीच आकाशातून स्वत:ला झोकून देणार होता..पण त्याला आपली योजना पुढे ढकलावी लागली..फेलिक्सने न्यू मेक्सिकोच्या रॉसवेलमध्ये सर्वात उंचींवरुन उडी मारण्याची तयारी केली होती..पण हवेची दिशा त्याची वैरी ठरली आणि त्यामुळेच त्याला आपली योजना पुढे ढकलावी लागली.

हवेची दिशा बदलल्यामुळे फेलिक्सच्या जीवाला धोका संभवण्याची शक्यता निर्माण झाली होती..त्यामुळेच हवामान विभागाने त्याला उडी घेण्यास मनाई केली....पण असं असतानाही फेलिक्स हिंम्मत हरला नाही...त्याचा निश्चय कायम आहे...गुरुवारी हवामान सामान्य झाल्यास फेलिक्स अशक्य ते शक्य करुन दाखवणार आहे.

एका भल्यामोठ्या फुग्याच्या मदतीने फेलिक्स जमिनीपासून जवळपास साडे छत्तीस किलोमीटरच्या उंचीवरुन उडी मारणार आहे...फेलिक्स ज्या ठिकाणाहून उडी मारणार आहे तिथ हवा असणार नाही..तसेच तेथून उडी घेतल्यानंतर अवघ्या ४० सेकंदात फेलिक्सचा जमिनीकडं येण्याचा वेग ताशी आकराशे किलोमीटर पेक्ष अधिक असणार आहे.
आकाशातून उडी मारण्याचं पूर्वीचं रेकॉर्ड ज्या-ज्या लोकांनी मोडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी या जगाचा कायमचाच निरोप घेतलाय आणि फेलिक्सला याची जाणीव आहे.

`मृत्यूची उडी`

मात्र एका बाबतीत फेलिक्स भाग्यवान आहे..त्याला या योजनेसाठी स्वत: किटिंगर मार्गदर्शन करणार आहेत. किटिंगर यांनी जमिनीपासून ३१.३ किलोमीटर इतक्या उंचीवरुन उडी मारण्याचा विक्रम नोंदवला आहे.

गुरुवारी हवामान सामान्य झाल्यास फेलिक्स आकाशातून पृथ्वीकडं झेपावेल...त्यासाठी स्पेशल सूट तयार करण्यात आला आहे..जेव्हा फेलिक्स तो सूट परिधान करुन उडी घेईल तेव्ह आवाजाच्या वेगापेक्षाही त्याचा वेग जास्त असेल.जेव्हा तो जमीनीवर पाय ठेवील तेव्हा नवा विक्रम त्याच्या नावावर नोंदवीला गेलेला असले.

फेलिक्स जमिनीपासून साडे छत्तीस किलोमीटर उंचीवरुन उडी मारणार आहे..पण जेव्हा तो उडी घेईल तेव्हा काय होईल? कारण फेलिक्सला अंतराळातून उडी घ्याची आहे आणि तीही फ्री फॉल. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या जवळ ना पॅराशूट असले ना वेग कमी करण्यासाठी एखादं साधन. अशा परिस्थितीत उडी मारल्यानंतर अवघ्या १५ ते २० सेकंदात फेलिक्सचा शरिराचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असणार आहे..म्हणजेच जवळपास ताशी १२०० किलोमीटरच्या वेगाने फेलिक्स जमीनीकडं येणार आहे..पण हा वेग असतांना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण डोंगरावर २० हजार फूट उंचीवर माणसाला श्वास घेणं कठीण होवून बसतं. कारण तिथ हवा विरळ असते. पण फेलिक्स तब्बल सव्वा लाख फूट उंचीवरुन उडी घेणार आहे. अत्यंत धोकादायक आहे ही य़ोजना.

`मृत्यूची उडी`

एवढ्या उंचीवरुन उडी मारण म्हणजे साक्षात मृत्यूशी झुंजच. पण जिंकण्याचा आत्मविश्वास प्रत्येक संकटाला पार करण्याची हिम्मत पेरतो. फेलिक्सची ही उडी केवळ सव्वा लाख फूट उंचावरची उडी नव्हती तर अनेक संकटाशी सामना करणारी अशीच होती.

स्ट्रॅटोस्फेअरमध्ये दबाव नसल्यासारखी परिस्थिती आहे. अत्यंत वेगाने 63,000 फूट उंचावरुन जमिनीकडं येताना शरीरातील रक्ताभिसरन वेगाने होवू लागतं आणि पुढे त्याचं वाफेत रुपांतर होतं. विज्ञानात या प्रक्रियेला इबोलिज्म म्हणतात.. या धोकादायक प्रक्रियेत माणसाचा अत्यंत भयंकर पद्धतीने मृत्युही होण्याची शक्यता असते.. या प्रक्रियेतून सहिसलामत वाचण्य़ासाठी फेलिक्ससाठी विशेष प्रकारचा सूट तयार करणयात आल आहे. ऑक्सीजन पुरवठ्या सोबतच आणखीही काही उपाययोजना करण्य़ात आल्या होत्य़ा. त्यामुळे अतिउच्च दबावही सहन केला जाऊ शकतो.

वेगाच्या सा-या मर्यादा मोडित काढीत जेव्हा फेलिक्स पृथ्वीकडे झेपावेल त्यावेळी त्याचा वेग हा ताशी अकराशे किलोमीटर इतका प्रचंड असेल.. त्यावेळी त्याच्या शरीराला स्पर्शणा-या हवेचा प्रचंड आवाजही मोठा असले आणि याच हवेमुळे शरीर छिन्नविछिन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण प्रत्येक संकटावर मात करण्याची क्षमता फेलिक्समध्ये आहे.
स्ट्रॅटोस्फेअरमध्येमध्ये ना हवा आहे ना ऑक्सीजन.. सुपरसॉनिक वेगा दरम्यान तापमान 72 डिग्री सेल्सीयस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असते... त्याचवेळी गोठवणा-या हवामानात फेलिक्सची उपकरण बंद पडण्याची शक्यता आहे.. पण नासाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या मदतीमुळे फेलिक्सच्या स्पेशल सूटमध्ये डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय.. ज्यामुळे कुठल्याही दबावाचा सामना करणं शक्य होईल. उणे 71 डिग्रिच्या थंड वातारवणापासून ते 400 डिग्रीच्या उष्णतेपर्यंत कोणत्याही प्रकारचं वातावरण सहन करण्याची क्षमता त्या स्पेशल सूटमध्ये आहे.

`मृत्यूची उडी`

केवळ फेलिक्सच नाही तर त्याच्या संपूर्ण टिमच्याचा आशा त्या विक्रमाकडे लागल्यायत.. एका अशा उंचीवर जाण्याची तयारी, ज्या उंचीपर्यंत कोणी पोहोचू शकलेलं नाही... तीच उंची आणि तोच वेग राखण्यासाठी फेलिक्स आता सज्ज झालाय.


अंतराळातून उडी घेणं म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं आहे..त्यामुळे फेलिक्स सारख्या अत्यंत अनुभवी स्काय डायव्हरचा जीवही पणाला लागला आहे....पण अशक्य ते शक्य करुन दाखविण्याची जी योजना फेलिक्सने आखली आहे त्यासाठी त्याला एका अशा व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळतंय ज्याने ६०च्या दशकात अशाच प्रकारे आकाशातून उडीमारुन विक्रम केला आहे..
16 ऑगस्ट 1960ला अमेरिकेच्या हवाई दलातील पायलट जोसेफ डब्ल्यू किटिंगर यांनी थेट निसर्गालाच आव्हान दिलं होतं..एका भल्यामोठ्या फुग्यात बसून ते जमिनीपासून एक लाख दोन हजार फूट म्हणजेच ३१ किलोमीटर उंचीवर जाऊन पोहोचले...आणि त्यानंतर त्यांनी तेथून उडी घेतली..किटिंगर यांच्या जवळ असलेल्या कॅमे-याने त्या उडीचा प्रत्येक क्षण आपल्या चित्रफितीत कैद केला होता...चार मिनिट ३६ सेकंदात त्यांनी जवळपास ताशी एक हजार किलोमीटर या वेगाने अंतर पार केलं होतं..या दरम्यान त्यांना पृथ्वीच्या तुलनेत २२ पट अधिक गुरुत्वाकर्षण सहन करावं लागलं.

पण हा विक्रम करण्यापूर्वी त्यांना प्रॅक्टिस करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता..एक वेळी तर त्यांचं पॅराशूट नादुरुस्त झालं होतं..हवेच्या प्रचंड दबावामुळे किटिंगर यांचं आपल्या शरीरावर नियंत्रण राहिलं नव्हतं...एका मिनिटात त्यांनी १२० वेळा गिरक्या घेतल्या होत्या..त्यामुळे ते बेशुद्ध झाले होते..पण नशिब बलवत्तर म्हणून जमिनीपासून केवळ एक मैल उंचीवर असतांना त्यांचं राखीव पॅराशूट उघडलं आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

फेलिक्सची उडी ही माणसाच्या इतिसातील सर्वात उंचीवरुन घेतलेली उडी ठरणार आहे..फेलिक्सच्या मोहिमेत सहभागी झालेल्या संशोधकांना फेलिक्सकडून मोठ्या आशा आहेत..कारण या उडीच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा उलगडा होणार असून पृथ्वी तसेच अंतराळाचील मोहिमेत त्याचा उपयोग होणार आहे.
या उडी साठी फेलिक्स जो स्पेशल सूट वापरणार आहे तो अंतराळवीरांच्या स्पेस सूट प्रमाणेच असणार आहे...या सूटमधून फेलिक्सला ऑक्सिजन मिळणार आहे..कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण मिळणार आहे...तसेच या सूटला आधुनिक गिअर असून त्यामध्यमातून ट्रान्ससोनिक रेंजमध्ये ध्वनीवेग पार करण्यास मदत मिळणार आहे..
या मृत्यूच्या उडीतून मिळणा-या माहितीच्या आधारे अंतराळवीरांसाठी विशेष पोषाक तयार करण्यास मदत होणार आहे..स्ट्रॅटोस्फेअरमध्ये दुर्घटना घडल्यास पृथ्वीवर सुरक्षित उतरण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाची माहितीही फेलिक्सच्या उडीच्या माध्यमातून मिळणार आहे

सव्वा लाख फूटावरुन उडी मारण्यासाठी फेलिक्स सज्ज झाले आहेत...पण त्यांनी या अगोदरही अशाच प्रकारचे कारनामे केले आहेत...अंतराळाची उंची मोजण्याची जिद्द असलेल्या फेलिक्सनी यापूर्वी पाताळाची खोलीही मोजली आहे.

४१ वर्षीय फेलिक्सने ऑस्ट्रेलियातील सैन्यात स्पेशल कमांडो म्हणून सेवा केली आहे...पॅरा जंपींगमध्ये त्यांचा हातखंडा आहे. पण जमीनीपासून एक लाख २० हजार फूट उंचीवर त्यांचा हा अनुभव किती कामी येणार हाच खरा प्रश्न आहे....या सगळ्या परिस्थितीची फेलिक्सला जाण असल्यामुळेच शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फेलिक्स विशेष प्रशिक्षण घेत आहेत..या प्रशिक्षणादरम्यान पवन चक्की आणि कमी दबाव असलेल्या चेंबरमध्ये उडी घेण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आहे..अंतराळवीरांना दिलं जाणारं शुन्य गुरुत्वाकर्षण शक्तीचं प्रशिक्षणही फेलिक्सला दिलं जातं आहे..हे सगळं प्रशिक्षण रेड बुल स्ट्रोटोस नावाच्या कंपनीमार्फत दिलं जातं आहे. या योजनेत नासा आणि अमेरिकेच्या हवाई दलातील निवृत्त अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.

First Published: Wednesday, October 10, 2012, 22:31


comments powered by Disqus