दाभोळ वीज प्रकल्प रिलायन्सच्या घशात जाणार?, dabhol power project will go to reliance?

दाभोळ वीज प्रकल्प रिलायन्सच्या घशात जाणार?

दाभोळ वीज प्रकल्प रिलायन्सच्या घशात जाणार?
www.24taas.com, रत्नागिरी

दाभोळचा ‘रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर’चा वीज प्रकल्प रिलायन्स ग्रुपला देण्याच्या हालचालींना वेग आलाय.

१९५० मेगावॅट इतकी क्षमता असलेला हा प्रकल्प कायमच अडचणीत राहिला आहे. आधी एन्रॉननं हा प्रकल्प बुडवला. त्यानंतर ‘आरजीपीपीएल’ नावानं कंपनी स्थापन करण्यात आली. तरीही या प्रकल्पाची साडेसाती संपलेली नाही. २६ जानेवारीपासून प्रकल्पाचा गॅस पुरवठा थांबल्यानं प्रकल्प बंद आहे. सर्वांत मोठा गॅस पुरवठादार असलेल्या रिलायन्सनंच भाव वाढवून मागितले होते. रत्नागिरी पॉवर मात्र भाव वाढवून द्यायला तयार नाही. परिणामी, रिलायन्सनं गॅस पुरवठा थांबवलाय आणि आता ही कंपनी घशात घालण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे.


दुसरीकडे हा प्रकल्प केंद्रानं ताब्यात घ्यावा, असा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रानंही बजेट अधिवेशनात हा प्रकल्प सुरू करण्याची शपथ घेतलीय. मात्र, रिलायन्ससोबत वाटाघाटी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती ‘झी २४ तास’च्या हाती आलीय.

पाहा... का नकोसा झालाय दाभोळ प्रकल्प...
जाणून घेण्यासाठी पुढील लिंक नवीन टॅबमध्ये ओपन करा - http://goo.gl/wmEeC

First Published: Friday, March 29, 2013, 12:29


comments powered by Disqus