डान्स, डान्स, डान्स.. Dance, Dance, Dance...

डान्स, डान्स, डान्स..

डान्स, डान्स, डान्स..
www.24taas.com, मुंबई

एखाद्या गाण्यावर ठेका धरला म्हणजे आपल्याला डान्स येतोच अस जस नसतं ना तसच कुठूनही कर्णमधुर संगीत कानी पडल की शास्त्रशुद्धच डोलावं अशीही काही सक्ती नसते.. नृत्य या कलाप्रकाराला खरतर कुणाच्याच मर्यादा नाहीत. .उलट प्रांतीक नृत्याबद्दल अवघ्या जगाला आदरच असतो.. प्रत्येक जणाच्या आदरानं त्या राष्ट्राचाही सन्मान होतो.. अगदी आत्ताच्या गंगम स्टाईलनेही ही गोष्ट अधोरेखित झालीय.. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या निमित्तानं नृत्याची आणि वैश्विक नात्यांची ही घट्ट गुंफण...

नृत्य.. डान्स.. आज प्रत्येक भारतीयाच्या नाही तर जगातल्या प्रत्येकाशी मनाचं वैश्विक नातं जोडणारा हा कलाप्रकार.. होय एकीकडे तेल, सिमावाद, धर्म अशा नानाविध प्रकारांनं जगात फक्त विरोधाच्या भिंती उभ्या राहत असताना, जगभरातल्या डान्स प्रकारांनी मात्र देश-परदेशातही प्रत्येक सजग मनात आपली मुळं घट्ट रोवलीय.. जगभरातल्या नृत्य प्रकारांबद्दल किती आणि बोलावं.. शब्द थिटं पडतील अस पदलालीत्य.. भुरळ या शब्दालाही क्षणक्षर मोह पडावा असा नृत्यआविष्कार आणि श्रवणीयपणाही मंत्रमुग्ध व्हावा असं मनमोहक संगीत..जागतिक नृ्त्याविष्काराचा आढावा घेतला की शब्दांच्या मर्यादा आणि कलेचा बेफामपणा ठायी ठायी दिसतो.. तासातासाला काय तर क्षणाक्षणाला संगित जगणा-या आणि नृत्यावर थिरकणा-या या कलावंतासाठी खर तर प्रत्येक क्षण हा नृत्यासाठी समर्पित असतो.. पण या तमाम नृत्यकलावंतासाठी २९ एप्रिल हा दिवस विशेष असतो.. कारण अवघं जग २९ एप्रिल हा दिवस म्हणून मोठ्या अभिमानानं साजरा करतो.. २९ एप्रिलला नृत्य दिवस साजरा करण्यामांगही एक विशेष कारण आहे.. जीन - जॉर्जेस नोव्हेर यांचा २९ एप्रिल १७२७ हा जन्मदिवस.. जीन - जोर्जेस नोव्हेर हे नाव जगभरात ओळखलं जातं ते बॅले नृत्याचे आद्य संस्थापक.... त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून अवघ्या विश्वानं हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्याला समर्पित केलाय..

युनेस्कोची एक सह संघटना असलेली आयटीआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था याचं आयोजन करतं.. ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक संघटना १९८२ पासून दरवर्षी २९ एप्रिलला आतंरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा करतंय. या दिवशी संबधित वर्षातील नर्तकाला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते. सर्वोत्कृष्ट नर्तकाची निवड आयटीआयची आतंरराष्ट्रीय नृत्य समिती करते. त्या वर्षीचा लक्षवेधी नृत्यप्रकार आणि त्याच्यासाठी सन्मानित झालेला नृत्यकलावंत यांचा हा वैश्विक गौरव असतो.. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक असलेला ही नृत्यकला राष्ट्राच्या सीमा ओलांडून प्रत्येक प्रांतात आपली घट्ट वेसण बाधंत चाललीय हे मात्र नक्की...

२९ एप्रिल म्हणजेच आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या निमीत्तानं जगभरातल्या महत्वाच्या नृत्याविष्काराचा आपण आढावा घेणार आहोत..या सगळ्यात बॉलडान्सची मोहमयी दुनिया काही औरच असते.. वॉल्टझ डान्स, फॉक्सटॉर्ट, चाचाचा रुबा सांबा यासारखे बॉल डान्स जेवढे देखणे आहेत तेवढेच देखणे आहेत क्लब डान्समधील साल्सा, मेरंगे हे नृत्याविष्कार.. पाहुयात यांचा दिलखेचक अंदाज...

पाश्चिमात्य देशांच्या नृत्याविष्कारात सर्वात अग्रक्रमानं नाव येतात ती बॉलरुम डान्स या अंतर्गत येणा-या नृत्यप्रकारांची... मंद संगित आणि त्याच दिमाखदार लयीत देहाच्या होणा-या हालचाली हे या नृत्यांचे महत्वाचे वैशिष्ठ्य...

यातील सुरुवातीचा प्रकार म्हणजे वॉल्टझ डान्स.. एका मंचावर प्रकाशझोतात दिसणारे हे डान्सकपल... संगिताच्या तालावर झुलणारा हा नृत्याविष्कार एका वेगळ्याच दुनियेत नेऊन दर्शकांना सोडतो..

फॉक्सट्रॉर्ट हाही त्याच पद्धतीतला हा आविष्कार... हळूहळू गती पकडत जाणा-या या नृत्याविष्कारांने जगभरातल्या डान्सर्सवर आपली छाप सोडलीय..

असाच काहीसा पण जरा वेगवान डान्सचा प्रकार म्हणजे चाचाचा... क्युबन प्रकारातल्या या डान्सची जादू सत्तरच्या दशकापासून ते आजतागायत कायम आहे.. वेगवान पद्धतीत थिरकत जाणारा हा देह ही या प्रकाराची खासियत..

अर्जेंटिना आणि उरुग्वेची आंतरराष्ट्रीय नृत्यदेणगी म्हणजे टॅंगो नृत्याविष्कार..टॅंगो हा प्रकार टॅंगो क्रिओलो म्हणूनही ओळखला जातो.. रोमोटीसिझमची उत्तम अनुभूती या नृत्याविष्कारातून जगाला मिळते..

रुंबा- सांबा - एक वेगळी शैली आणि दिमाखात टाकली जाणारी पदलालित्याची रचना या मुळे रुंबा सांबा हा प्रकारही लक्षणीय मानला जातो... संगीताच्या ठेक्यावर दिमाखात रुंबा आणि सांबा या दोहोंचे विलक्षण मिश्रण आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच मोहवते.

साल्सा - स्टाईलिश आणि परफेक्शनिश्ट - साल्सा हा जगभरात गाजला गेलेला नृत्याविष्कार.. डान्स कपलबरोबरच प्रेक्षकांनाही देहभान विसरवणारा हा नृत्याविष्कार.. स्टाईलिश आणि परफेक्शनिष्टचा संगम असणारा हा साल्सा प्रकार आजही जगावर आपली भुरळ पाडतोय..

डान्स, डान्स, डान्स..

डान्स पार्टनरमधील एकमेकांशी समन्वय आणि देखणेपणाची झलक देणारा हा नृत्याविष्कार म्हणजे मेंरगें.. आकर्षक नृत्याविष्कार आणि उत्फुल आसमंत असा समन्वय या नृत्याविष्कारात झळकत असतो..

बॉलरुमच्या या अनेकाविध नृत्यप्रकारात वेगळेपणा असला तरी प्रत्येक प्रकारात जगण्याचा उत्साह आणि आनंद झळकत असतो.. पावलापावलातून... देहादेहातून...

जगभरातल्या नृत्याचा वारसा अनुभवताना आणि विशद करताना या सगळ्या नृत्याला प्रांताची आणि स्थानिक भौगोलिक रचनेची ही पार्श्वभुमी नसते. .रखरखीत वाळवंटात संपन्नता दिसते ती बेली डान्सची.. थिरकणा-या देहाची नजाकत ही बेली डान्समध्ये जशी दिसते तशीच ती संपन्न असणा-या वसाहतवादाची संस्कृती सांगणा-या बॅली डान्समध्येही तेवढेची उठून दिसते..

देहाला झोकून जाणं आणि त्यात नृत्याचा आविष्कार साकारणं म्हणजे काय हे पाहायच असेल आतंरराष्ट्रीय नृत्यातला बेली डान्स हा प्रकार मुद्दाम पाहावा... मध्य पुर्वोत्तर राष्ट्रांमधला प्रचलित असणारा हा बेली डान्स आज सा-या जगाला खुणावतोय. रक्स शऱीकी या अरेबियन नावानी ओळखला जाणारा हा नृत्यप्रकार ओरीएंटल डान्स, इजिप्तीशीयन डान्स. अरेबिक डान्स अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.. अरेबियन देशांशी सुंसगत अशी वेशभुषा आणि कमरेच्या दिलखेचक अंदानी सजलेल्या या नृत्यप्रकाराने अवघ्या जगाला मोहीनी घातलीय.. हात, कंबर आणि नजर यांची नजरबंदी असणारा बेली डान्स पाहणा-या प्रत्येकाला आपलंस करुन टाकतोय....

बेली डान्स प्रमाणेच शरीरावरची हुकूमत आणि देहाचा उन्मुक्त आविष्कार म्हणजे बेले डान्स... युरोप खंडात आणि विशेषतहा लंडन आणि अमेरिकेच्या मंचावर थिरकणा-या पावलांनी सजलेला हा बॅले डान्स.. वेगवेगळ्या आविष्कारात सजलेल्या या नृत्यप्रकारात सामुहिक नृत्याचं एक अनोख दर्शन घडतं.. केवळ टाचांवर देह सावरण आणि सावरणा-या देहातून नृत्यांचं मनमोहक आणि चित्ताकर्षक दर्शन घडवणा-या या बॅले डान्सची जादू काही औरच असते..

नृत्य हा युवतींचा आणि कमनीय देहाचा आविष्कार ही समज खोटी ठरवली ती पाश्चिमात्या देशांच्या एक नृत्यप्रकारांनी.. उन्मुक्त संगीताच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली आणि जन्म झाला हिप हॉप क्लचरचा.. हिप हॉप, स्ट्रिट डान्स , फ्रि डान्स.. आणि ब्रेक डान्स..अशा या सगळ्या प्रकारांवर एक फास्ट नजर...

अवघ्या जगावर गारुड घालणा-या नृत्यप्रकारात एक महत्वाचं नाव म्हणजे हिप हॉप डान्स.. या डान्सचा आत्मा आणि खरी ओळख ही याच्या नावातच दडलीय.. देहाला एक ठेका देणारं हिप हॉप संगित, त्याच्यासाठी जगत असणारे आणि त्यातच आयुष्य झोकून देणारे हिप हॉप क्लचर यातून हिप हॉपचा प्रभाव वाढत गेला. सत्तरच्या दशकात हिप हॉप डान्सचा ख-या अर्थानं प्रचार आणि प्रसार झाला. या प्रकारात प्रामुख्यान ब्रेकीग , लॉकींग आणि पॉपींग या स्टाईलचा मुक्तपणे वापर असतो.. शास्त्र नसलेला तरी वेगळ्याचा शास्त्राचा हा नृत्याविष्कार म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. १९८० आणि त्यानंतरच्या काळात आलेल्या फिल्मस, टेलिव्हीजन शो, या सगळ्यामध्ये हिप हॉपचा प्रभाव जाणवला.. आणि पाहता पाहता आज हा प्रकार जगाच्या गळ्यातला ताईत बनला..

हिप हॉप सारखा नृत्याविष्कार म्हणजे स्ट्रिट डान्स.. स्ट्रिट डान्सला फ्रि स्टाईल असही म्हटल जातं.. ८० च्या दशकात उन्मुक्त जाणारं संगित आणि लाईटस इफेक्टचा मोह यामुळे फ्रिस्टाईल डान्सने तरुणाईला वेड लावल होत. दोन ग्रुपमध्ये होत जाणारी बॅटलने डान्सरच्याच नाही तर प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला..

या सारखाच पण शरीराची विलक्षण करामत दाखवण्यास संधी असणारा आणि भारतातही झटकन रुजलेला आतंरराष्ट्रीय नृत्यप्रकार म्हणजे ब्रेक डान्स.. पाश्चिमात्य असणा-या या नृत्य प्रकाराने ८०च्या अखेरीस भारतीय सिनेसृष्टीवरही विलक्षण प्रभाव टाकला होता..

जगभरातल्या डान्सचा अनोखा कलाविष्कार पाहताना पदलालित्य हे अनेक नृत्यप्रकारातून वेगवेगळ्या प्रकारातून समोर येत राहतो.. पण या सा-या प्रकारातही पायांचा नाद एकायचा असेल आणि पायाच्या ठेक्याच संगीत एकायच असेल तर टॅप डान्सला पर्याय नाही...

टॅप डान्स.. पायांचा दिमाखदार आविष्कार काय हे जर पाहायचं असेल तर टॅप डान्स जरुर पहावा.. दिमाखदार आणि शानदार पद्धतीने येणारे नर्तक आणि संगीताच्या ठेक्यावर नाचणारे नर्तक असा प्रकार सर्वच नृत्यप्रकारात असतो.. पण यात थोडा वेगळा प्रकार असतो... पायाच्या ठोक्यातून येणारा आवाज आणि त्यातून साधला जाणारा नृत्याविष्कार ही या नृत्यप्रकाराची खासीयत..

सुरुवातीच्या काळात पाश्चिमात्यांची मक्तेदारी असणारा हा प्रकार आता जगभर वाहवा मिळवतोय.. १८०० च्या मध्यकाळात या नृत्यप्रकाराला सुरुवात झाली... सुरुवातीला या डान्स प्रकार म्हणून ओळख नव्हती.. पण ज्युबा डान्सला पायाच्या ठेक्यांची जोड मिळवत यानं आपलं स्वताचं अस्तित्व निर्माण केल.. निष्णात नर्तक आणि त्यांचे लयबद्ध पायाचे ठोके आणि त्यातला सुरावटीचा आवाज हे सारं केवळ अविस्मरणीय असचं असतं..

First Published: Monday, April 29, 2013, 23:50


comments powered by Disqus