पावसाळ्यात रान भाज्यांची चलती, Demand for vegetables

पावसाळ्यात रान भाज्यांची चलती

पावसाळ्यात रान भाज्यांची चलती
www. 24taas.com, झी मीडिया, मुंबई

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते रान भाज्यांचे... कधीही न दिसणा-या रानमेव्याने पावसाळ्यात मार्केट फुलून जाते... ओळखी-अनोळखीच्या अनेक रानभाज्यांबद्दलचा हा खास वृत्तांत.

कुर्डू, टाकळा, शेवळे, भारंग, तेलपाट, ससेकांद अशा पाहुणेमंडळींनी सध्या भाजीमार्केट फुलून गेलाय.. अनेकांनी तर यातली काही नावं ऐकलीही नसतील... पण हा आहे पावसाळ्यातला रानमेवा... फक्त पावसाच्या पाण्यावर फुलणारा अत्यंस सकस आणि पौष्टीक असा रानमेवा.

या सगळ्या पालेभाज्या पाहून नॉनव्हेजीटेरीयन्स जरा खट्टू होतील पण त्यांच्यासाठीही पावसाळ्यात मार्केटमध्ये खुप चॉईस आहे. खेकडे, चिंबो-या, मळ्याचे मासे अशा भाज्याही पावसाळ्यात मार्केटमध्ये येतात.

ऐन पावसाळ्यात येणा-या या करंदा, अळू, हिरवे बिरडे, आळंबी, कुड्याच्या शेंगा, कुवली, बांबूचे कोंब यांची आवक बाजारात वाढते. कोणत्याही रासायनीक खता-औषधांशीवाय जंगलात रूजत असल्यामुळे हा रानमेवा खूपच चविष्ठ आणि तितकाच पौष्टीक असतो.


या रानमेव्याची रेसीपीही अगदी सोपी आहे शिवाय ज्या आदिवासींकडून तुम्ही या भाज्या खरेदी कराल त्याच तुम्हाला त्याची रेसिपी सांगतील तिही अगदी मोफत... त्यामुळे वर्षातून एकदाच मिळणा-या या रानमेव्याची चव नक्कीच चाखा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 22, 2013, 23:24


comments powered by Disqus