Last Updated: Thursday, June 27, 2013, 00:03
www.24taas.com, झी मीडिया,मुंबईउत्तराखंडमध्ये महाप्रलय आल्यानंतर जी परिस्थीती निर्माण झाली ते न भूतो न भविष्यती अशीच होती..हजारो लोक डोंगराळ प्रदेशात अडकले होते..त्यांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्याचं मोठं जिकरीचं काम होतं..कारण निसर्गाचं मोठं आव्हानही होतं....पण लष्कर,नॅशनल डिझास्टर रिसपॉन्स फोर्स आणि आयटीबीपीच्या जवानांनी ते लिलया पेललं...
नुकताच उत्तराखंडमध्ये महाप्रलायला आला....
निसर्गाच्या रौद्ररुपापुढे माणूस हतबल ठरला...
मोठ्याप्रमाणात प्राणहानी झाली...
हजारो भाविक ठिकठिकाणी आडकले....
हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये मृत्यूने तांडव घातलं होतं...
हजारो लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता...
ठिकठिकाणी अडकलेले लोक मदतीसाठी धावा करत होते ...
उशिरा का होईना सरकारला जाग आली आणि बचावकार्य सुरु झालं....
लष्कर,नॅशनल डिझास्टर रिसपॉन्स फोर्स आणि आयटीबीपीच्या जवानांवर बचावकार्याची जबाबदारी सोपवण्यात आली...
प्रतिकुल हवामानात जीवाची परवा न करता हे जवान हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये दाखल झाले... या जिगरबाज जवानांनी हाजारोंना मृत्यूच्याखाईतून सुखरुप बाहेर काढलं...
मंगळवारी नेहमीप्रमाणे बचावकार्य सुरु होतं...
हेलिपॅडवरुन MI-17 V-5 हे वायुसेनेचे हेलिकॉप्टर आकाशात झेपावलं मात्र गौरीकुंडच्या परिसरात ते कोसळलं....या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीस जवान शहिद झाले... निसर्गाचं मोठं आव्हान असतांना लष्कराचे जवान मागे हटले नाहीत... उत्तराखंडच्या विविध भागात आजूनही मोठ्याप्रमाणात लोक आडकले असून त्यांची सूटका करण्याचं काम हे शूर जवान जीवाची परवा न करत आहेत...
उत्तराखंडमध्ये महाप्रलयाने थैमान घातल्यानंतरही नैसर्गिक संकट टळलं नव्हतं..डोंगर, पाऊस, ढगाळ हवामान अशा चोहोबाजूने संकट असतांनाही तिथ अडकलेल्या लोकांना एक आशेचा किरण दिसला...
ते देशाच्या सीमेच रक्षण करतात !
जीवाची परवा न करता वाचवले हजारोंचे प्राण !
उत्तराखंडमध्ये उतरली हेलिकॉप्टर्सची फौज !
पर्वतांवर धोकादायक लँडिंग !
विध्वंसाचे दहा दिवस, हजारोंच्या जीवाचा प्रश्न !
पाऊस आणि ढगांशी त्यांचा सामना !
ते आहेत भारतीय वायुसेनेचे शूर जवान !
उत्तराखंडवर संकट कोसळं होतं...निसर्गाने रौद्ररुप धारण केलं होतं...ढगफूटी झाली...महाप्रलय आला...नद्यांना पूर आला..जणू संकंटांनी उत्तराखंडला चोहोबाजूने वेढाच घातला होता...त्या महाप्रलयाने समोर येईल त्याला वाहून नेलं...चारधाम यात्रेसाठी आलेले हजारो भाविक ठिकठिकाणी आडकले होते..आपले प्राण वाचणार की नाही ? आपल्याला या संकट्तून कोण वाचवणार ? कोण मदतीचा हात देणार ? अशी भीती तिथं अडकलेल्या प्रत्येकालाच वाटत होती...पण त्याचवेळी त्यांना आकाशातून एक आशेचा किरण दिसला...काळ्याकुट्ट ढगांना छेदत भारीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरची फौज उत्तराखंडच्या डोंगराळ प्रदेशात दाखल झाली.. उत्तराखंडमध्ये नद्यांनी थैमान घातलं होतं...सगळं काही पूराने गिळंकृत केलं होतं...हिमलायाच्या पर्वातांनी साथ सोडली होती...ठिकठिकाणी रस्ते खचले होते...केवळ हवाईमार्गचं बचावाचा एकमेव पर्याय समोर दिसत होता...गगनभेदी डोंगर, काळेकुट्ट ढग...मुसळधार पाऊस..कडाडणा-या विजांनी भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्सचा मार्ग रोखला होता...मात्र भारतीय वायुसेनेच्या जवानांचा विश्वास अटळ होता....
एमआय-१७ हे हेलिकॉप्टर भारतीयू वायू सेनेचा कणा म्हणून ओळलं जातं.... वायू दलाचे अत्यंत भरवशाचे, सैनिकांची ने-आण करणारे, लष्करी माल वाहून नेणारे हेलिकॉप्टर म्हणून एमआय-१७ ओळखले जाते. भारतीय सैन्याची श्रीलंकेतील शांती सेना मोहिमा, कारगील युद्ध किंवा अगदी २६-११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नरिमन हाऊसवर कमांडोना उतरवण्याची कारवाई असू दे या हेलिकॉप्टरने प्रत्येकवेळी आपलं महत्व सिद्ध केलंय...
व्ही.ओ.१...मुंबईवरील २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नरीमन हाऊसमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी निर्णायक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला...नरिमन हाऊसच्या गच्चीमध्ये कमांडोंना उतरवण्यात येणार होतं...त्यासाठी एमआय-१७ या हेलिकॉप्टरमधून कमांडोंना नरिमन हाऊसवर उतरवण्यात आलं होतं. या थरारक कारवाईमध्ये कमाडोंना उतरवतांना हेलिकॉप्टर स्थिर ठेवण्याचं मोठं आव्हानं होतं.या कसोटीच्या प्रसंगी एमआय-१७ ने आपली क्षमता सिद्ध केलीय... कारगीलचं युद्ध असो , काश्मिरमधील अतिरेकी कारवायांचा बिमोड असो की उत्तराखंडमध्ये अडकलेल्या हजारो भाविकांच्या सुटकेचं बचावकार्य असो प्रत्येकवेळी वायू दलाने या विश्वासू हेलिकॉप्टरने लष्कराचा विश्वास सार्थ केला आहे..एकाचवेळी ३० ते ३५ व्यक्तिंना किंवा ४ टन वजन वाहून नेण्याची अचाट क्षमता या हेलिकॉप्टरमघ्ये आहे...केवळ जास्त वजन वाहून नेहण्याची क्षमताच या हेलिकॉप्टरमध्ये आहे असं नाही तर ते एका दमात ४५० किमी अंतर पार करतं..भारतीय वायु दलातील हेलिकॉप्टरच्या इतिहासावर नजर टाकल्यास १९६० च्या काळात एमआय -८ या हेलिकॉप्टरचा वायू दलात समावेश करण्यात आला. तर नव्या आवृत्तीचे , नव्या तंत्रज्ञानाचे एमआय-१७ हे १९७० च्या उत्तरार्धात वायू दलात सहभागी झाले. गेली चार दशकाहून अधिक काळ हे हेलिकॉप्टर भारतीय वायू दलाचा कणा बनून राहिले आहे. बदलत्या काळात जुनाट झालेल्या एमआय-१७ ला बाद न करता याच हेलिकॉप्टरवर भारतीय वायू दलाने विश्वास टाकला असून यातूनच त्याच्या क्षमतेचा अंदाज लावता येईल. एमआय-१७ ची नवीन अत्याधुनिक आवृत्ती म्हणजे एमआय १७ व्ही ५ ...या आधुनिक हेलिकॉप्टरचं वैशिष्ट्ये म्हणजे कोणत्याही प्रकारच्या हवामानात ते काम करु शकत..
रशियाबरोबर करार करुन भारत तब्बल १३९ एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टर घेणार आहे. यापैकी ५० पेक्षा जास्त हलिकॉप्टर भारतीय वायुदलात दाखल झाली आहेत. सर्वात अत्याधुनिक असल्यानेच उत्तराखंडामधील मदतीकरता वायू दलाने एमआय-१७ व्ही ५ निवडले. गेल्या काही दिवसांत असंख्य उड्डाणे घेत उत्तराखंडातील पर्वतरांगामध्ये अडकलेल्या हजारो पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्याचं काम या देवदूताने केलंय.त्यामुळेच हे हेलिकॉप्टर केवळ एक मशिन नाही तर त्या भाविकांसाठी देवदूतचं बनलं आहे..
महाप्रलयाने संपूर्ण उत्तराखंडमध्ये हाहाकार उडवलाय..गावाच्या गावं उध्वस्त झाली...या बचाव कार्यात एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यात वीस जवान शहिद झाले..पण त्यानंतरी बचावकार्य काही थांबलं नाही ..
उत्तखंडमध्ये आलेल्या महाप्रलयात मोठ्या प्रमाणात मनुष्यहीनी झाली... या महाप्रलयात ज्यांनी आपले नातेवाईक,आप्तेष्ट गमावले त्यांची सहवेदना आम्हीलाही आहे..लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ज्यांनी मंगळवारी प्राणाची बाजी लावली त्यांनाही आमचा सलाम...हिमालयाच्या पर्वत रांगाचं विशाल आव्हान समोर असतांनाही त्यांनी हजोरा लोकांचे प्राण वाचवले...हेमकुंड आणि बद्रिनाथमध्ये अडकलेल्या लोकांना तेथून सुखरुप बाहेर काढण्यासाठी वायुसेनेनं जोशीमठ परिसरात बेस कॅम्प तयार केलाय..केदारनाथमध्ये अडकलेल्या लोकांना गौरीकुंड आणि गुप्तकाशीत आणलं जातंय..उत्तरकाशी आणि गंगोत्रीसाठी हर्शिल बेस कॅम्प तयार करण्यात आलाय..
या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये वायुसेनेचे हेलिकॉप्टर्सनी महत्वाची भूमिका बजावलीय..कारण तात्काळ प्रतिसाद देण्यात भारतीय़ वायुसेनेचा हतखंडा आहे..
गेल्या दहा दिवसात वायुदलाच्या हेलिकॉप्टर्सनी उत्तराखंडमधील हेमकुंड साहिब, बद्रिनाथ,केदारनाथ,गोरीकुंड,गंगोत्री अशा विविध ठिकाणी अडकलेल्या हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे..या बचाव कार्यात हवाई दलाचे ४५ हेलिकॉप्टर्स डबल शिफ्टमध्ये काम करत आहेत..गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत एनडीआरएफची १३ पथकं आयटीबीपीचे तीन हजार जवान तसेच दहा हजार लष्कराचे जवान सहभागी झाले आहेत..युद्ध असो की नैसर्गिक आपत्ती कोणत्याही बिकट प्रसंगाचा सामना करण्यात हे जवान सक्षम आहेत..
खंर तर डोंगराळ प्रदेशात आणि ढगाळ वातावरणात बचावकार्य करतांना वायुदलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो..
बचावकार्या दरम्यान अनेक भावनिक प्रसंगांना सामोरं जावं लागतं..निसर्गाचं आव्हान समोर असतांनाही हे जवान गेली दहा दिवस दिवसरात्र बचावकार्य करत असून त्यांच्या या कार्याला आमचा सलाम..
संकट कितीही मोठ असलं तरी भारतीय सैन्याचे जवान कधीच मागे हटत नाहीत हे भारतीय सैन्याच्या इतिहासावर नजर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल..उत्तराखंडच्या महाप्रलयानंतरही भारतीय सैन्याच्या जवानांनी ते पुन्हा एकदा सिद्ध केलंय..आजवरच्या या सर्वात मोठ्या बचावकार्यात लष्कर,नॅशनल डिझास्टर रिसपॉन्स फोर्स आणि आयटीबीपीच्या जवानांनी जी कामगिरी केलीय ती अतुलनिय अशीच आहे..
एअरफोर्सचे वीरजवान देशरक्षणासाठी सिमेवर तैनात असतातच.. पण जेव्हा देशात एखादं संकट ओढावतं तेव्हाही हे जवान अतुलनीय शौर्य गाजवतात.. गेल्या दहा दिवसांपासून उत्तराखंड निसर्गाच्या संकटाचा सामना करते आहेत....या महाप्रलयापुढं सगळेच हतबल झाले..
उत्तराखंडमधील निसर्गाच्या या प्रकोपात मृतपावलेल्याचा आकडा सांगणं कठीण आहे...पण या प्रलयात अडलेल्या जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्यासाठी ध़डपड सुरु आहे... आणि ही अत्यंत महत्वाची जबाबदारी पारपाडीत आहेत भारतीय वायुदलाचे वीरजावान.. जलप्रलयात हजारो लोक अद्यापही अडकले आहेत.. हवामान प्रत्येक क्षणाला बदलतंय. रस्ते खचत चालले आहेत. हॅलिकॉप्टर उतरायला हॅलिपॅडही नाही.... पण या सगळ्यांवर मात केलीय ती या जवानांनी आणि त्यांच्यावरच तमाम भारतीयांच्या नजरा लागून आहेत......
निसर्गानं जेव्हा सगळं उध्वस्त करण्याचा निश्चय केला होता त्याच वेळी आभाळातून खाली उतरली भारतीय वायुदलाच्या हॅलिकॉप्टर्सची फौज.. ही फौज हजारो लोकांच्या सुटकेसाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने निसर्गाशी दोनहात करत आहेत...
प्रत्येक संकाटवर मात करत उत्तराखंडमध्ये अडकलेल्या लोकांचा जीव वाचण्याचं काम हे जवान करत आहेत...आतापर्यंत जवळपास १२ हजार लोकांना मृत्यूच्या खाईतून बाहेर काढण्याच काम या शूरविरांनी केलंय..त्यासाठी वेळप्रसंगी त्यांनी जीव धोक्यात घातलाय...त्यामुळेच देशातील सव्वाकोटी जनतेला जलप्रलयात मृत्युमुखी पडलेल्यांच दुख आहे तर वायुदलाच्या वीर जवानांबद्दल अभिमान आहे..
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, June 27, 2013, 00:03