Last Updated: Tuesday, September 4, 2012, 22:54
www.24taas.com,मुंबईशहरापासून ते शेताच्या बांदापर्यंत पोहोचलेलं तंत्रज्ञान अर्थात मोबाईल फोन.गरीब असो की श्रीमंत, मोबाईल प्रत्येकाकडं पाहायला मिळतो.पण हाच मोबाईल आज माणसासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तुमचा मोबाईल फोन टॉयलेटपेक्षाही अस्वच्छ आहे. ऐकूण आश्चर्य वाटलं असलं तरी हे सत्य आहे. काय आहे डर्टी मोबाईल, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
मोबाईल.. आज प्रत्येक माणसाची हौस नाही तर गरज बनलाय.. पण हीच गरज आज त्याच्या आजारास कारण ठरतेय.. केवळ रेडिएशन पुरता हा धोका असेल असा जर तुमचा समज असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.. कारण तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल असो धोका तुम्हाला तुमच्या मोबाईलमुळे संभवू शकतो... विश्वास बसत नसेल तर पहा हा स्पेशल रिपोर्ट..
आज मोबाईल फोन म्हणजे जणू माणसाची सावलीच बनला आहे....तुम्ही जिथ-जिथं जाता ...तिथं तिथं तो तुमच्या सोबत असतो...आज मोबाईल शिवाय जीवन अशक्य होवून बसलं आहे....मोबाईल जवळ नसेल तर तुम्ही आम्ही बेचैन होतो... मोबाईल घरी विसरला तर चूकल्या चुकल्या सारखं वाटतं..मोबाईल जवळ असेल तर आवघं जग मुठीत असल्या सारखं वाटतं...मोबाईलचे अनेक फायदे असले तरी त्याच्यापासून होणा-या धोक्यांची अनेकांना आजही कल्पना नाही..
तुमचा मोबाईल फोन आहे अत्यंत अस्वच्छ !
टॉयलेटपेक्षाही अस्वच्छ आहे तुमचा मोबाईल फोन !
जिवणूंचं माहेरघर आहे तुमचा मोबाईल फोन !
होय, हे अगदी खरं आहे. तुमचा मोबाईल फोन अत्यंत अस्वच्छ आहे.टॉयलेट जेव्हडं अस्वच्छ असतं तेव्हडाच तुमचा मोबाईल फोन अस्वच्छ असू शकतो...तुमचा यावर विश्वास बसला नसेल तर तुमच्या या रोजच्या सवयीवर एक नजर टाका.
मोबाईल फोनची रिंग वाजली की कॉल घेण्यास तुम्ही जराही मागे पुढे पहात नाहीत. आपण कुठं आहोत याचा तुम्ही कधी विचार करत नाहीत...तुम्ही हात स्वच्छ करुन टॉयलेटच्या बाहेर पडता पण मोबाईल फोन स्वच्छ करण्या विषयी तुम्ही कधी विचार केलाय.
आपण आपल्या मर्जीनुसार वाटेल तिथ मोबाईल फोन ठेवतो. ती जागा स्वच्छ आहे की अस्वच्छ याचा कधीच विचार करत नाहीत.. अस्वच्छ जागी मोबाईल ठेवल्यामुळे त्याला जिवाणू चिकटतात..पण याचा कोणीच विचार करत नाही.
मोबाईलवर जमा झालेले जिवाणू तुमच्या शरीरात सहज प्रवेश करतात..त्यापासून तुम्हाला विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुमच्या याच सवयींविषयी अमेरिकेच्या ऍरिझोना विद्यापीठाने एक संशोधन केलं आहे...त्या संशोधनातून जी माहिती उघड झाली ती अत्यंत धक्कादायक आहेत.
टॉयलेटपेक्षा अस्वच्छ बनलाय तुमचा मोबाईल. अमेरिकेच्या युनीवर्सिटी ऑफ एरिझोनानं केलेल्या संशोधनानुसार बहुतांशी लोक मोबाईल स्वच्छ करण्यास कंटाळा करतात.. आणि त्यांच्या याच सवयीमुळे मोबाईल हे अनेक आजारांचे माहेरघर बनलाय..त्या संशोधनात मोबाईलवर आढळून असलेल्या जिवाणूंमुळे डायरियासारख्या अनेक आजारांना तुम्हाला सामोर जावं लागण्याची शक्यता आहे.
मोबाईल.. हे केवळ संवाद साधण्याचा साधन बनलं असं नाही तर, इंटरनेट सर्फिंगपासून ते सोशल नेटवर्किंगसाईटवरुन कनेक्ट राहण्याचा राज मार्गचं बनलाय.. मोबाईल एक अशी गरज बनलाय , ज्याचा फार मोठ्या प्रमाणात आणि बेसमुर वापर केला जातोय.. क्षणाक्षणाला जगाशी संवादबद्ध राहण्याचं ते एक महत्वाचं साधन बनलंय.... पण त्याचा वापर करत असतांना जरा सावधान.
अमेरिकेच्या युनिवर्सिटी ऑफ ऍरिझोनाने केलेल्या संशोधनानुसार मोबाईल फोन हे जिवाणूचं माहेर घर बनलय..
बाईट- चार्ल्स गेरबा, माइक्रोबायोलॉजिस्ट, यूनिवर्सिटी ऑफ़ एरिज़ोना (या सर्वशोधांदरम्यानं आम्हाला समजलं की, मोबाईलमध्ये सर्वात जास्त जीवाणू असतात.. कारण मोबाईल आपल्या हाताच्या आणि तोंडाच्या जवळ असतात..)
मोबाईल फोनवर आढळून आले जिवाणू
स्युडोमोनास
स्टेफिलोकॉकस
ऍस्परगिलस
किलिफॉर्म्स
कॉली
बेसिलस
हे तेच जिवाणू , ज्यामुळे डायरियासारख्या गंभीर आजाराला निमंत्रण मिळतं.. हे सारे घातक जिवाणू मोबाईलवर आढळून असल्याच उघड झालय...मोबाईल फोनवर हे जिवाणू आढळून येण्याचं प्रमुख कारण म्हणजे मोबाईलच्या स्वच्छतेकडे केलेलं दुर्लक्ष.
मोबाईल फोन हा अनेक आजारांचं माहेरघर असल्याचं तुम्हाला माहित आहे का ? असा प्रश्न जेव्हा आम्ही मोबाईल वापरणा-या अनेकांना विचारला तेव्हा त्यांना याची जराही कल्पनाही नव्हती. जर आता पर्यंत तुम्हाला मोबाईलच्या या संभाव्य धोक्याची कल्पना नसेल तर आता तरी सावध व्हा.
मोबाईलच्या बेफिकीर वापरामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतंय. मोबाईल हा सतत हातात असतो.. त्याचा वापर करतांना तुम्ही तो कुठंही ठेवतो. हात स्वच्छ आहेत की अस्वच्छ याचा कधीच विचार करत नाहीत...पण हीच सवय तुम्हाला आजारी करण्यासाठी पुरेशी ठरु शकते.
संशोधनाअंती ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ईकोलाय सारखे जिवाणू मोबाईलवर आढळुन आले आहेत. हे निगेटीव्ह जिवाणू असतात. जे मोबाईलचं प्लास्टीक कव्हर, स्क्रीन, बटणातील गॅपमध्ये लपून बसतात..मोबाईल फोन धारक जेव्हा त्या फोनचा वापर करतो तेव्हा ते माणसाच्या संपर्कात येतात आणि मोबाईलधारकाला गंभीर आजाराला सामोरे जावं लागत. धक्कादायक बाब म्हणजे हे जीवाणू मानवी शरिरातील प्रोटीनच्या संरचनेलाच धक्का पोहचवतात आणि त्याचे गंभीर परिणाम मोबाईल फोन धारकाला भोगावे लागू शकतात. ज्यावेळी आपण फोनचा वापर करतो त्यावेळी तोंडाद्वारे आणि हाताद्वारे हे बॅक्ट्रेरिया शरीरात प्रवेश करतात.
ईकोलाय जिवाणू लहान आणि मोठ्या आतड्यांवर आघात करतो... इकोलाय थेट आतड्यावर परिणाम करत असल्यामुळे मोबाईल धारकाला जुलाब, उलटी, सारख्या शारिरिक व्याधींचा सामना करावा लागतो... ईकोलाय मुळे होणा-या व्याधींची यादी इथेच संपत नाही... गंभीर बाब म्हणजे इकोलाय या जिवाणू तुमची किडनीही निकामी करू शकतो.
इकोलाय हा जीवाणू किडनी बरोबरचं मोबाईल फोन धारकाची प्रतिकार क्षमता निकामी करण्याचं काम करतो...इकोलाय शिवाय मोबाईल फोनवर प्रोटीएम, कोलोफॉर्म आणि कॉलरा सारखे जीवघेणे जिवाणू आढळून येत असल्याचं संशोधनादरम्यान उघड झालय.
या सगळ्या जीवघेण्या आजारांपासून स्वतःला वाचवण्याच एकमेव उपाय म्हणजे तुमचा मोबाईल फोन नेहमी स्वच्छ ठेवणं. नाहीतर इकोलाय, प्रोटीएम आणि कॉलरा सारखे जीवघेणे जीवाणू मोबाईल धारकाच्या शरिराचा कधी वेध घेतील हे सांगता येणार नाही.
मोबाईल फोनचा वापर प्रत्येकजण करतोय. पण जेव्हा त्याच्या स्वच्छतेचा विषय येतो तेव्हा कोणीच उत्सुक नसतो..तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या मेकअपकडे, डाएटकडे, खाण्या-पिण्याकडं विशेष लक्ष देणारे टीव्ही कलाकारही मोबाईलच्या स्वच्छते बाबत अनभिज्ञ आहेत.
मोबाईलची वेळीच साफ सफाई न केल्यास त्यावर घातक जिवाणूंच तयार होतात. केवळ मोबाईलच नाही तर लॅपटॉप, कॉम्प्यूचरचा किबोर्ड आणि पेनही रोग पसरवू शकतो..हे आता संशोधनातून समोर आलं आहे. आज मोबाईलचा मोठ्याप्रमाणात वापर होत असल्यामुळे त्याचा निष्काळजीपणे वापर झाल्यास तो धोकादायक ठरु शकतं. निष्काळजीपणे मोबाईल हताळल्यास विविध आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता य़ेत नाही...आणि हे संशोधनाअंती सिद्ध झालं आहे.
मोबाईलमुळे होणा-या धोक्याची कल्पना आता तुम्हाला आलीच असेल त्यामुळे यापूढे तुम्ही तुमच्या मोबाईलची कळजी घ्या. मोबाईलची निगा राखणं अत्यावश्यक बनलं आहे. नकळत मोबाईलकडे झालेले दुर्लक्षामूळे मोबाईल हा जिवाणूंचं घर बनलाय.. पण हे रोखण्यासाठी मोबाईलची स्वच्छता नेमकी कशी करावी असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
एखाद्या वस्तूचा दिवसरात्र वापर केल्यास आणि त्याची निगा राखली गेले नाही तर ती अस्वच्छ होणार याच कोणालाच शंका नाही..अमेरिकेत झालेल्या संशोधनात हीच बाब पुढे आली आहे. मोबाईल स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कापडाने तो स्वच्छ करा.पण सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने मोबाईल साफ केल्यामुळे मोबाईलमध्ये लपून बसलेले जिवाणू काही साफ होत नाहीत..त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा तरी अशा पद्धतीने मोबाईल साफ केला पाहिजे.
इअरबर्डच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल फोन स्वच्छ करु शकता. सॅनेटायजरमध्ये इअरबर्ड बूडवून ते मोबाईलच्या किपॅड आणि ईअरप्लगवरून फिरवा...मोबाईलचा चार्जिंग पॉईंटही स्वच्छ करुन घ्यायला विसरु नका...कारण तिथ जिवाणू लपलेले असतात..तुमच्या मोबाईल फोनला कव्हर असले तर ते काढून तेही आतून स्वच्छ करुन घ्या..त्यामुळे कुठेच जिवाणू लपून राहू शकणार नाहीत.
जेवण करते वेळी मोबाईल दूर ठेवा..गरज भासली तरच दुस-याकडं तुमचा मोबाईल फोन द्या..केवळ मोबाईलच नाही तर तुम्ही स्वत:ला धूळ आणि अस्वच्छतेपासून दूर ठेवा..मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जाणार नाही याचा आजच निश्चय करा.
First Published: Tuesday, September 4, 2012, 22:46