www.24taas.com,मुंबई मायानगरी मुंबईचं महत्व आजही कायम आहे. अनेकांसाठी ही स्वप्न नगरीच आहे. पण ही मायानगरी केवळ सर्वसामान्यांसाठीच महत्वाची आहे असं नाही तर ड्रग्ज माफियांसाठीही मुंबई तेव्हडीच महत्वाची असल्याचं उघड झालंय..तस्करांच्या दृष्टीने अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मुंबई ही गोल्डन ट्रॅगंल बनलीय. ड्रग्ज माफियांनी मुंबईवर का लक्ष केंद्रीत केलंय ? त्यांनी तस्करीसाठी कोणत्या नवीन पद्धती शोधून काढल्या आहे ? नशेसाठी कोणत्या औषधांची तस्करी त्यांच्याकडून केली जातेय. का होत आहे, ड्रग्ज हब मुंबई?
- ड्रग्ज माफियांच्या निशाण्यावर मायानगरी मुंबई
- ड्रग्ज तस्करीसाठी मुंबईत टाकलाय तस्करांनी डेरा
- मायानगरीतून परदेशात ड्रग्जची तस्करी
- तस्करीसाठी शोधलाय नवा मार्ग
- नशेसाठी आता औषधांचा वापर
- जगभर पसरलंय ड्रग्ज माफियांचं जाळं
- कशी रोखणार ही तस्करी ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न `ड्रग्ज हब मुंबई`मध्ये करण्याचा हा प्रयत्न आहे.
मायानगरी मुंबई ही परदेशात अमली पदार्थ पाठविण्याचं केंद्र बनली आहे. अमली पदार्थांचे तस्कर केटामाईन, अल्फाझोलम या सारखे पार्टी ड्रग्ज अशियायी देश, दक्षिण अफ्रिका आणि युरोपातील देशात पाठवीत आहेत..मात्र हे ड्रग्ज पाठविण्यासाठी ते मुंबईची निवड करतात. अलिकडच्या काही महिन्यातील कस्टम विभागाने केलेल्या कारवाईवर नजर टाकल्यास ते सहज तुमच्या लक्षात येईल.
1. चेन्नईचा रहिवासी असलेला कुरुपय्या नागनाथला मुंबईच्या अंतरराष्ट्रीय विमानतळावर १२ किलो केटामाईनसह पोलिसांनी नुकतीच अटक केलीय. नशेसाठी वापरण्यात येणारं हे औषध मुंबई मार्गे क्वाललंमपुरला घेऊन जाण्याच्या तो बेतात होता..पण त्याचा डाव विमानतळावरच फसला.
2. अशाच पद्धतीने औषधांची तस्करी करतांना एका नायजेरीयन महिलेला जेरबंद करण्यात आलं होतं..ती महिला मुंबईहून २० किलो एम्फेटामाईन घेऊन इथोपीयाला जाणार होती.
3.गेल्याच महिन्यात मीठ आणि साखरेच्या नावाखाली १२ किलो मेथाक्यूलोन नावाच्या औषधाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय..हे औषध नशेसाठी वापरण्यात येत असून ती व्यक्ती ते औषध लंडनला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता..अलिकडच्या काळात मुंबई हे अमली पदार्थांच्या तस्करीचा गोल्डन ट्रँगंल बनला असल्याचं कस्टम विभागाचं म्हणणं आहे.
गेल्या तीन महिन्यांमध्ये मुंबईत ५० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत..कस्टम विभागाच्या म्हणण्यानुसार देशभरातील अमली पदार्थ तस्कर मुंबईत अमली पदार्थ घेऊन येतात..त्यानंतर त्या अमली पदार्थांची अशियायी, युरोप आणि दक्षीण अफ्रेकेतील विविध देशात तस्करी केली जाते.
कस्टम विभाग,डीआरआय आणि अमली पदार्थ विरोधी विभागाकडून आधूनमधून छापामारुन अमली पदार्थ जप्त केले जातात.मात्र अमली पदार्थांच्या तस्करीचं नेटवर्क नष्ट करण्यात त्यांना अद्यापही यश आलं नाही.अमली पदार्थांची तस्करी करतांना जे लोक पकडले जातात ते य़ा धंद्यातील केवळ प्यादे आहेत.. कायद्यातील त्रूटींचा गैरफायदा घेऊन ते आपली सुटका करुन घेतात.
अमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात मोठी कमाई असल्यामुळे लोक या धंद्याकडं ओढले जातात...मुंबईत काहीच अशक्य नाही हा भ्रम अनेकांनी तस्करीसाठी प्रेरीत करतो..पण कस्मट विभागाने गेल्या महिन्याभरात केलेल्या कारवाईमुळे तस्करांचं कान टवकारले आहे.
पार्टी ड्रग्ज म्हणून वापरण्यात येणा-या औषधांची निर्मिती केल्याचं महाराष्ट्रातही उघड झालं होतं...या औषधांची परदेशात तस्करी केली जातेय आणि त्यातून होणारी कमाई डोळे पांढरी करणारी आहे...काही महिन्यापूर्वीचं सांगलीत असाचं एक प्रकार उघडकीस आला होता.
अफू, गांजा, चरस, हेरॉईन, ब्राऊन शुगर या अमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी असली तरी चोरी छुपे याची जगभर विक्री केली जातेय...पण आता केवळ याच अमली पदार्थांचा वापर नशेसाठी केला जातोय असं नाही..तर अमली पदार्थांच्या तस्करांनी काही औषधांची नशेसाठी विक्री सुरु केलीय..केटामाईन हे त्यापैकीच एक आहे...भूल देण्यासाठी वापरण्यात येणारं हे औषध नशेसाठी वापरलं जातंय.
महाराष्ट्रातील काही औषध उत्पादन करणा-या कंपन्यांमध्ये अशा प्रकारच्या पार्टी ड्रग्जची चोरीछुपे निर्मीती केली जात असल्याचं यापूर्वीच उघड झालं आहे. कर्जात बुडलेल्या कंपन्या अशा प्रकारचे उद्योग करीत असून झटपट पैसा कमावण्याच्या उद्देशातून या पार्टी ड्रग्ज उत्पादन त्यांच्याकडून केलं जातंय...काही औषध उत्पादन करणा-या कंपन्यांकडं अशा प्रकारच्या औषधांचं मर्यादीत प्रमाणात उत्पादन करण्याचा परवाना असतो...पण ते मर्यादेपेक्षा जास्त औषधांचं उत्पादन करतात..आणि पुढे अमली पदार्थांच्या तस्करांनी त्याची गुपचुपपणे चढ्या दराने विक्री केली जाते.
नशेच्या या व्यापारात केवळ डबघाईस आलेल्या औषध उत्पादक कंपन्याच नाही तर काही सुस्थितीत असलेल्या कंपन्याही मागे नाहीत. अलिकडच्या काळात सांगलीतील एका औषध उत्पादक कंपनीवर मारलेल्या छाप्यात ही बाब उघड झाली होती...डीआरआयने या कंपनीच्या वेगवेगळ्या गोदामावर छापे मारुन २५० किलो केटामाईन जप्त केलं होतं..अशा प्रकारच्या कारवायांना लगाम लावण्यासाठी कस्टम आणि डीआरआयने अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
औषध निर्मितीच्या नावाखाली केटामाईन सारख्या औषधांची निर्मीती करुन डबघाई आलेल्या कंपनीचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न काही कंपन्यांकडून केला गेला असून त्यापैकी काही प्रकरणं उघडही झाली आहेत..पण अद्यापही चोरीछुपे अशा प्रकारे औषधांची निर्मिती करणा-यांचा पर्दाफाश होणं बाकी आहे.
काही औषध कंपन्या पैशाच्या लालसेपायी कोणत्या थराला जाऊ शकतात हे आताच आपण बघीतलंय..पण या ड्रग्जची तस्करीही मोठ्या चलाखीने केली जाते...तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल अशा पद्धतीने तस्कर ड्रग्जची तस्करी करतात...ते तस्करीसाठी प्रत्येक वेळी नवनवी शक्कल शोधून काढतात.
कधी सुटकेसच्या छुप्य़ा कप्प्यात ...तर कधी खाद्यपदार्थ्यांच्या सामानातून तस्कर अमली पदार्थांची तस्करी करतात...सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करांकडून प्रत्येकवेळी अशा नवनव्या पद्धतींचा अवलंब केला जातोय....एखादी पद्धत उघड झाली की पुढच्यावेळी तिचा वापर करण्याचं टाळलं जातं...अलिक़डच्या काळात अमली पदार्थांच्या तस्करांनी तस्करीसाठी कुरियरचा वापर सुरु केला आहे...तस्करीसाठी कुरियरच्या वापरात अनेक फायदे आहेत...तस्करीसाठी येणारा खर्च तुलनेत नगण्य असतो आणि कुणाच्या अटक होण्याची शक्यता नसते. कुरियरच्यामध्यमातून अमली पदार्थ पाठविण्यासाठी तस्कर बनावट नाव आणि पत्त्यांचा वापर करतात..गेल्या सहा महिन्यात अशाच पद्धतीने अमली पदार्थ पाठविण्याचा प्रयत्न केला गेला होता...मात्र अमली पदार्थ विरोधी विभागाच्या सतर्कतेमुळे १३ कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.
अमली पदार्थ तस्करांनी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी देवांच्या फोटोंचाही वापर केल्याचं नुकतंच उघड झालंय..पुस्तकाच्या आकाराचे बॉक्स तयार करुन किंवा दागिण्यांच्या बॉक्समधून अमली पदार्थ पाठवले जाण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत..साखर आणि मीठाच्या पाकीटातून केटामाईन आणि अल्फाझोलम सारख्या औषधांची तस्करी करण्याचा प्रकार घ़डला आहे....एव्हडंच नव्हे तर शरीराच्या विविध भागात अमली पदार्थ लपून तस्करी करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत....पोटात अमली पदार्थ लपवून आणण्याचा प्रकार काही महिन्यापूर्वीचं उघड झाला होता...मात्र ही तस्करी जीवावर बेतण्याची शक्यता असते...मात्र या धंद्यात होणारी कमाई मोठी असल्यामुळे लोक तो धोका पत्करायला तयार होतात.
भारतात आजमीतीला केटामाईनची किंमत १० लाख रुपयांच्या घऱात आहे..मात्र हेच केटामाईन जेव्हा परदेशात पोहोचतं तेव्हा त्याची किंमत ४० लाखाच्या घरात जाऊन पोहोचते...त्यामुळेच अमली पदार्थांची तस्करी केली जात असून कस्टम,डीआरआय आणि अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईनंतरही तस्करीचे प्रकार थांबले नाहीत.
अमली पदार्थांच्या तस्करीत मोठा धोका असला तरी तस्करी काही कायमचीच बंद झाली नाही...मोठी रिस्क घेऊन तस्कर ड्रग्जची तस्करी करतात. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे या धंद्यातील मोठी कमाई. त्यामुळेच मुंबईपासून दिल्ली पर्यंत हा धंदा फोफावला आहे.
मायानगरी मुंबईत सुर्य अस्ताला गेला की मोठमोठ्या हॉटेलात आणि पबमध्ये हे चित्र पहायला मिळतं. रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात तरुणाई अक्षरश: बेधूंद होऊन नाचत असते..पण या असंख्य दिव्यांच्या प्रकाशामागेही दडलेला असतो एक काळाकुट्ट अंधार आणि त्याच अंधारात चोरीछुपे चालतो नशेचा बाजार. उच्चभ्रूंच्या अशा पार्ट्यांमधून केटामाईन, इफेड्रीन,इन्फेटामाईन, कोरींगा,बीगा, ट्रॉमा, हेरॉईन हे अमली पदार्थ नशेबाजांना पुरवले जातात....या धंद्यातील उलाढाल अब्जावधी रुपयांच्या घरात आहे...मुंबईपासून दिल्ली पर्यंत हा धंदा फोफावला आहे.अमली पदार्थ तस्करांचं नेटवर्क थेट अमेरिका, कॅनडा, ब्रिटन पर्यंत जाऊन पोहोचलंय.
अलिकडच्या काळात देशात विविध राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे..यावरुन भारतातील ड्रग्ज माफियांच्या नेटवर्कचा तुम्हाला सहज अंदाज लावता येईल..काही महिन्यांपूर्वी अहमदावामध्ये एका ड्रग्ज रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता..अहमदाबादमध्ये जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची अमेरिकेत तस्करी करण्यात येणार होती....पण पोलिसांना वेळीच खबर मिळाल्यामुळे त्यांचा डाव फसला.
परदेशात ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी कडक कायदे असतांनाही त्यावर नियंत्रण मिळवण्यात तिथल्या सुरक्षा यंत्रणांना यश येतांना दिसत नाही.. अर्जेंटिनामध्ये ९५ कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज काही महिन्यापूर्वी जप्त करण्यात आलं होतं.. अंतरराष्ट्रीय बाजारात त्या ड्रग्जची किंमत ३४० लाख डॉलर इतकी होती.. भारतातील हिमाचल प्रदेशातही एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं होतं..दिल्लीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने हिमाचल प्रदेशातील एका औषध कंपनीवर छापा मारला होता..या छाप्यात २२ कोटी रुपये किंमतीचं पार्टी ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.या कंपनीत तयार करण्यात आलेलं पार्टी ड्रग्ज परदेशात पाठविण्यात येणार होतं.
एकीकड ड्रग्ज माफिया जगभर नशेची तस्करी करण्यात जराही कमी पडत नाही तर दुसरीकडं त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जगभरातील तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत...अंडरवर्ल्डने अमली पदार्थाचा धंदा हाती घेतल्यामुळे तपास यंत्रणांनी अंडरवर्ल्ड टोळ्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
भारताने मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषीत केलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आपल्या हस्तकांमार्फत अमली पदार्थांचा धंदा करतोय....दाऊदच्या डी कंपनीने अमली पदार्थाच्या तस्करी साठी अनेक देशात आपलं नेटवर्क तयार केलं असून त्यातून त्यांना मोठी कमाई होतेय..दाऊदच्या या काळ्या धंद्याची एफबीआयनेही दखल घेतली असून दाऊदच्या डी कंपनीची अमेरिकेतील पाळं मुळं खणून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
ड्रग्ज माफियांच नेटवर्क कशा पद्धतीने जगभर पसरलंय हे ब्रेक पूर्वी तुम्ही बघीतलंय...पण ते तस्कर आहेत तरी कोण? असा प्रश्न तुम्हला पडला असले...त्याचं उत्तर दडलं आहे पाकिस्तानात.
कारण पाकिस्तानातच दडलाय भारताने मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषीत केलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम कासकर. पाकीस्तानचा ड्रग माफिया सरदार बट. आणि मॅक्सीको अमेरिका युरोपसारख्या संपूर्ण जगभर ड्रग्जचं नेटवर्क चालवणारा, जगातला सर्वात मोठा माफिया इस्माईल जाबेंडिया गासीया.
ही तीन अशी नावे आहेत की त्यांच्या हातात जगातला संपूर्ण अमली पदार्थांचा धंदा आहे....या धंद्यातून त्यांनी अब्जावधी रुपयांची कमाई होते..या त्रिकूटीतील डॉन दाऊद इब्राहिम कासकरने पाकिस्तानात आश्रय घेतलाय.. तो भूमिगत राहून पाकिस्तानातून अमली पदार्थाच्या धंद्याचं नेटवर्क चालवतोय.
सळसळत्या तरुण रक्तात नशेचं विष पेरण्याचं काम या ड्रग्ज माफियांकडून केलं जातंय. अमली पदार्थांमुळे देशाची तरुण पिढी नशेच्या खाईत ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झालीय. दाऊद प्रमाणेच पाकिस्तानातील सरदार बट हा नशेचा मोठा सौदागर मानला जातोय. जगातील अमली पदार्थांच्या तस्करीत त्याचा मोठा वाटा आहे. सरदार बट पाकिस्तानातून आपंल नेटवर्क चालवतोय. या ड्रग्ज माफिया विषयी जगाला फारशी कल्पना नाही. दाऊद इब्राहीम एव्हडा त्याचा धंदा मोठा नसला तरी भारतासह आफ्रिका, केनिया कंबोडिया या सारख्या देशांमध्ये सरदारच्या तस्करीचं नेटवर्क कार्यरत आहे.
आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये अमल पदार्थ विरोधी कायदे कमकुवत असल्यामुळे सरदार बटचा धंदा चांगलाच फोफावला असल्याचं गुप्तचर यंत्रणांचं म्हणनं आहे. सरदार प्रमाणे पश्चिमेकडील देशांमध्ये मोस्ट वॉण्टेड असेला इस्माईल जांबेडीया गासिया अशाच एक देशात लपून बसला असून तेथूनच तो अमली पदार्थांच्या तस्करीचं नेटवर्क चालवतोय.
इस्माईल हा जगातला सर्वात मोठा ड्रग माफिया असल्याचं बोललं जातंय. इस्माईल मॅस्कीकोच्या आश्रयाला असून त्याने या धंद्याच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती गोळा केली आहे. दाऊद . सरदार बट आणि इस्माईल या तिघांनी जगभरात आपलं नेटवर्क तयार केलं असून त्यामध्यमातून त्यांना कोट्यवधीचं कमाई होतेय. भारतीतील सुरक्षा यंत्रणा ड्रग्जची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करत असतात...ठिकठिकाणी छापे मारुन अमली पदार्थ जप्त केले जातात... मात्र वारंवार कारवाई करुनही ड्रग्ज माफियांच नेटवर्क ध्वस्त करता आलं नाही.
देशभर चोरी छुपे ड्रग्जची विक्री केली जातेय..अशातच औषधांचा नशेसाठी वापर सुरु झाल्यामुळे सगळ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याअसून त्यांनी अशा प्रकारच्या औषधांच्या तस्करीवर लक्ष केंद्रीत केलं आहे...विशेषता मुंबईत ड्रग्ज माफियांनी हब तयार केलं असून मुंबई मार्गे परदेशात ड्रग्ज पाठविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे...त्यामुळे आगामी काळात कस्टम,डीआरआय आणि अमली पदार्थ विरोधी विभागाला डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे.
First Published: Friday, October 12, 2012, 21:25