तर्राट हवालदार! Drunk Havaldar

नागपूरच्या रस्त्यात, हवालदार तर्राट!

नागपूरच्या रस्त्यात,  हवालदार तर्राट!
www.24taas.com, नागपूर

कर्तव्य बजावताना दारु पिऊन हवालदाराने गोंधळ घातल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या मानेवाडा चौक परिसरात हा सर्व प्रकार नागपूरकरांच्या डोळ्यासमोर घडला. मधुकर सातपुते असं या हवालदाराचे नाव असून तो नागपूर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे.

हा पोलीस हवालदार दारु प्यायला हे जेव्हा नागरिकांच्या लक्षात आलं, तेव्हा नागरिकही संतापले. ही बाब जेव्हा नागरिकांच्या निदर्शनास आली तेव्हा नागरिकांनीही चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळं काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते. नंतर या घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली.

वरिष्ठ अधिकारी जेव्हा घटनास्थळी आले त्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या हवालदाराला त्याच्या पायावर उभेही राहता येत नव्हते. पोलिसांनी हवालदार मधुकर सातपुते याच्या विरोधात अजनी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहे .

First Published: Tuesday, February 5, 2013, 20:51


comments powered by Disqus