Last Updated: Tuesday, January 21, 2014, 21:11
www.24taas.com, मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिकआता एक धक्कादायक बातमी नाशिकमधून... नाशिक महापालिकेच्या शिक्षणाविषयीच्या उदासीन धोरणामुळे महापालिकेच्या स्थापनेपासून ३५ शाळा बंद पडल्याचा स्पेशल रिपोर्ट झी मीडियानं चार दिवसांपूर्वी दाखवली होती...
आता या बंद पडलेल्या शाळेची स्थिती पाहण्यासाठी शाळांना भेट दिली असता विद्येच्या मंदिरात चक्क दारूड्यांच्या अड्डाच जमल्याचं धक्कादायक वास्तव झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झालंय. गोदाघाटाला लागून असणारी ही शाळा विद्यार्थ्यांच्या अभावी स्थलांतरित करण्यात आलीय.
आता त्या जागी नियोजित निवारा शेड करण्याचा महापालिकेचा मानस आहे. मात्र बंद पडलेल्या शाळेची सुरक्षा महापालिकेला राखता येत नसल्यानं मद्यपींचा अड्डा बनलीय. झी मीडियाचे प्रतिनिधी याठिकाणी गेले असता मद्यपीनं शिवीगाळ, धक्काबुक्की करत आतमध्ये येण्यास मज्जाव केला.
अखेर झी मीडियानं कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता विद्येच्या मंदिरातील वास्तव समाजापुढे आणण्यासाठी हा धोका पत्करला. आता सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन याप्रकरणी काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 21, 2014, 21:08