Last Updated: Friday, July 5, 2013, 11:41
www.24taas.com, झी मीडिया, इजिप्तइजिप्तमधील क्रांती निष्फळ?, दोन वर्षांत दोनदा क्रांती. इजिप्तमध्ये झाला उठाव. लाखो लोक उतरले रस्त्यावर. सर्वांची एकच मागण, प्रेसीडेंट मोर्सी, सोडा खुर्ची. प्रेसीडेंट मोर्सीला सैन्यानं घेतलं ताब्यात. इजिप्तमध्ये पुन्हा बदलला राजा.पुन्हा झाला तख्तपलट. काय आहे इजिप्तमधील सत्ता संघर्ष?
अखेर मोर्सींना आपली खुर्ची सोडावीच लागली...गेल्या काही दिवसांपासून काहिराच्या तहरीर स्क्वेअरवर लाखों लोक राष्ट्रपती मोर्सींना हटवण्यासाठी निदर्शन करत होते.. कधी अहिंसक तर कधी हिंसक मार्गाने...आंदोलनात समाविष्ट झालेल्या लोकांच्या मते मोर्सीही हुकूमशाह झाले होते. इजिप्तच्या जनतेचा आक्रोश... याला कारण मोहम्मद मोर्सीच्या एक वर्षाची कारकीर्द.
भारतातही अवघ्या दोन वर्षापूर्वी असच जनक्रांतीने वादळ निर्माण केलं होतं.. त्यानंतर भारतातलं वादळही शमल आणि इजिप्तमधलही वादळ..पण यानिमीत्तानं आम्ही उत्तर शोधणार आहोत त्या प्रश्नांची.. जनतेनं मोर्सीला का नाकारलं, आणि जनतेच्या अशा कोणत्या मागण्या होत्या ज्या मोर्सी पूर्ण करु शकला नाही आणि का झाला. पुन्हा तहरिर, पुन्हा जनक्रांती.
इजिप्तमध्ये सत्तापलट झालाय़. लष्करानं राष्ट्रपती मोहम्मद मोर्सीना सत्तेवरुन हटवून नजरकैदेत ठेवलयं.. इजिप्तची प्रभारी धुरा मुख्य न्यायाधिश अदली मंसूरना यांना सोपवण्यात आलीय.. नव्या राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत संविधानही रद्दबातल ठरवण्यात आलय.. सैन्यानं राष्ट्रपती मोर्सी यांना अल्टीमेटम दिला होता.. पण मोर्सीचा हटवादी पणाच त्याच्या विनाशाला कारण ठरलाय..
इजिप्त म्हणजेच मिस्त्रमध्ये अखेरीस तेच झाले जे जनतेच्या घोषणांमधून साऱ्या जगातून ऐकलं होत. सेनेनचं अखेर राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांना सत्तेवरुन खाली खेचत बाहेरचा रस्ता दाखवलाय. इजिप्तच्या सैन्य़दलाचे प्रमुख अब्दुल फतेहअल सीसीने राष्ट्रीय वाहिन्यांवर ही घोषणा करताच राजधानी काहीऱ्यायाचा आसमंत फटाक्यांच्या रोषणाईनं उजळून गेला. आनंदाचे भरते आले होते. रस्त्यावर लोक नाचत होते.
इजिप्तच्या सेनेनं राष्ट्रपती मोहमद्द मोर्सींना विरोधकांशी समझोता करा यासाठी अल्टीमेटीम दिला होता. जनक्षोभ उसळत चाललाय यांची लष्कराने वेळोवेळी जाणीवही दिली होती. पण मोर्सी यांना सत्तेची धुंदी चढली होती. लोकांनीच आपल्याला या पदावर बसवलय याचा विसर मोर्सीना पडला. पण लोकांनी मात्र आवाज उठवला आणि याच आवाजामुळे लष्कराने मोर्सीचा नक्षा उतरवला.
मोर्सींची हकालपट्टी करतानाचा लष्कराने काही महत्वाचे निर्णय देखील घेतलेत. सध्या अस्तित्वात असलेले इजिप्तचे संविधान बरखास्त करण्यात आलय. मुख्य न्यायधिशांना अदली मंसूरना हंगामी राष्ट्रपती पदाची शपथ देण्यात आलीय. त्याचप्रमाणे यापुढची राजकिय वाटचाल आखण्याची जबाबदारी अल अजहरच्या शेखकडे सोपवण्यात आलीयअल अजहर ही इजिप्तमधील सर्वात प्रतिष्ठीत संस्था मानली जाते. त्याचप्रमाणे त्याच्यांबरोबर कॉप्टीक चर्चचे प्रमुख आणि विरोधी पक्ष नेके मोहम्मद अल बर्देई यांच्याशी सल्लामसलत करुन पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे.
मोहम्गंद मोर्सी यानी सुरु केलेल्या हुकूमशाही विरोधात लोकांचा प्रचंड तणाव वाढला होता. लोकांनी सुरु केलेल्या आंदोलनाला, मोहम्मद मोर्सीने त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला नामंजुरी दिली होती. लष्करानं तणावग्रस्त भागात बंदोबस्त वाढवला होता.. अवघ्या देशालाच छावणीचे स्वरुप आलं होत. कितीही कडक सुरक्षा वाढवली तरी प्रचंड तणाव वाढत होता आणि अखेरीस सैन्याला मोर्सी यांना पदावरुन हटवावं लागलं.
मोर्सी यांनी हटवल्यानंतर अदली मंसूरकडे सूत्रे सोपवण्यात आलीयत.. वाढता तणाव लक्षात घेता अजूनही संपूर्णपणे लष्कराची कडक सूरक्षा व्यवस्था आहे मुस्लीम ब्रदरहुडच्या टीव्ही चॅनेल मिस्त्र २५चे प्रसारण बंद करण्यात आलय. सरकारी न्यूज एजंसीच्या प्रमुखानाही नजरकैद करण्यात आलय.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पदच्यूत राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी, मुस्लीम ब्रदरहुडचे प्रवक्ता गेहाद अल हदाद, साद कल कतानी यांच्यासह मोर्सीच्या सहका-याना नजरकैदेत ठेवण्यात आलयं.
अमेरिकेनेही या सत्तापलटावर नाराजी व्यक्त करत बराक ओबामा यांनी नाराजी व्यक्त केलीय. होस्नी मुबारक यांच्यावेळी अशीच जनक्रांती होऊन मोर्सीना सूत्र देण्यात आली. पण मोर्सीनी विश्वासघात केला असा जनतेनच आरोप ठेवला. सरकारविरुद्ध उसळलेल्या जनक्षोभानंतरही पुन्हा लोकशाहीवादी सरकार सत्तेवर यावं अशी इजिप्तवासीयांचा आशावाद खूप काही बोलून जातेय हे मात्र नक्की.
मोर्सींची कारर्कीद मोहम्मद मोर्सीनी ३० जून २०१२ला इजिप्तच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि एका वर्षानंतर पुन्हा सत्तेवरुन पायउतार व्हावं लागल. ६० वर्षांचे मोहम्मद मोर्सी नील डेल्टाच्या शरकिया प्रांतातले ...७०च्या दशकात मोर्सींनी काहिरा यूनीवर्सीटीतून इंजीनियरिंगतची पदवी संपादन केली ..आणि पीएचडीसाठी अमेरिकेला गेले... त्यानंतर मोर्सी मुस्लिम ब्रदरहूडमधून गायडेड ब्यूरोमध्ये गेले २००० ते २००५ पर्यंत मोर्सी मुस्लिम ब्रदरहूडच्या संसदीय ब्लॉकमध्ये स्वतंत्ररित्या काम करत होते.. मोर्सी यांना मुस्लिम ब्रदरहूडचं प्रवक्ता बनवण्यात आलं. ११ फेब्रुवारी 2२०११मध्ये जनतेनं होस्नी मुबारक यांनी सत्तेतून खाली उतरवलं...मे २०१२ मध्ये इजिप्तमध्ये निवडणूका झाल्या आणि मोहम्मद मोर्सी यांची राष्ट्रपती पदी निवड करण्यात आली. ३० जून २०१२ ला मोर्सींनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
२२ नोव्हेंबर २०१२
मोर्सी यांनी सर्व सत्ता आपल्या एकाधिकाराखाली आणले...आपल्या निर्णयाचा जूडीशियल रिव्हू करण्याचा अधिकार न्यायालयाला दिला नाही... पार्लामेंटला भंग करण्याचा अधिकारही न्यायालयाला देण्यास मोर्सीनी नकार दिला.
४ डिसेंबर २०१२
संविधान पुन्हा लिहलं जावं यासाठी राष्ट्रपती भवनाबाहेर जवळ जवळ 1 लाख लोकांनी प्रदर्शन केलं. दुस-याच दिवशी आंदोलकावर झालेल्या हल्ल्यात 10 लोकांचा मृत्यू झाला.
२९ डिसेंबर २०१२
परकिय चलनांचे भांडार गेल्या दोन वर्षात अर्धा झालाय अशी घोषणा इजिप्तशियन सेंट्रल बँकनं केली...याचा स्पष्ट अर्थ हाच की देशाची मुद्रा विदेशी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात घसरली होती.
२५ जानेवारी २०१३
होस्नी मुबारकच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी झालेल्या उठावाची पुन्हा एकदा पूनरावृत्ती झाली. मात्र यावेळी उठाव मोहम्मद मुर्सीच्या विरोधात होता.
फेब्रुवारी-मार्च २०१३
जनतेचा रोष देशाच्या अनेक शहरात पोहोचला... आणि संघर्षात अनेकांनी आपले प्राण गमावले.
७ मे २०१३
मोर्सीनी मंत्रिमंडळात बदल केले... कर्ज घेण्यासाठी मोर्सींनी हा बदल केल्याची चर्चा सुरु झाली.
३० जून २०१३
मोर्सींच्या विरोधात लाखों लोक रस्तावर उतरले आणि मोर्सींनी खूर्ची सोडून निवडणूका घ्याव्या अशी मागणी करण्यात आली.
३ जुलै २०१३
अल्टीमेटमची वेळ संपल्यावर सेनेनं मोर्सींना ताब्यात घेतलं आणि संविधान रद्द केलं.
इजिप्तचे राष्ट्रपती मोर्सी यांची वर्ष भराची कारकिर्द यामुळेच मोर्सीच्या आयुष्यात घडला प्रेसीडेंटल पॅलेस पासून ते तुरुंगापर्यंतचा प्रवास.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, July 5, 2013, 11:35