Last Updated: Wednesday, August 29, 2012, 23:19
www.24taas.com, मुंबई क्रूरकर्मा अजमल आमिर कसाबच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयानेही मोहर उमटवली आहे. साऱ्या देशाचं लक्ष लागल होतं या निर्णयाकडे. कसाबने केलेला हल्ला हा देशावरील हल्ला होता... कसाबचे कृत्य सहन करण्यासारखे नाही… म्हणून कसाबला फाशीची शिक्षाच देण्यात यावी’ अशा शब्दात पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमीर कसाब याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावला.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला करून मुंबईला तब्बल साठ तास वेठीस धरणाऱ्या कसाबची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलीय. २१ फेब्रुवारी २०११ला मुंबई उच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानिर्णयाविरोधात कसाबने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. फाशीऐवजी जन्मठेपेची देण्यात यावी, अशी मागणी त्याच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावीत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केला असला तरी त्याला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा मार्ग अद्याप खुला आहे. ती याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यास तो सर्वोच्च न्यायालयात दुरुस्ती याचिका दाखल करण्याचा पर्याय त्याच्याकडं आहे. या दोन्ही याचिका फेटाळल्यास त्याला राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आहे. मुंबई हल्ल्य़ाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कसाबची फाशी कायम ठेवली असली तरी या प्रकरणातील आरोपी फहिम अन्सारी आणि सबाऊद्दीन शेख या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. तसंच सर्वोच्च न्यायालयाने कसाबचा फैसला सुनावला असला तरी त्याला प्रत्यक्षात फासावर चढविण्यासाठी किती काळ लागेल हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.
इतिहास कसाबच्या खटल्याचा... २६ नोव्हेंबर २००८ रोजी म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी कसाब आणि त्याच्या साथिदारांनी मुंबईवर हल्ला केला होता. खरं तर त्यांनी भारताविरुद्ध युद्धच पुकारलं होतं. कसाबवर कसा चलला खटला आणि किती काळ लागला या प्रक्रियासाठी यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...
पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमीर कसाब... २६ नोव्हेंबर २००८ला कसाबने आपल्या साथिदारांच्या मदतीने मायानगरी मुंबईवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यातील कसाब हा एकमेव जिवंत आरोप पोलिसांच्या हाती लागला होता. ३० नोव्हेंबरला पोलिसांसमोर कसाबने तोंड उघडलं आणि या हल्ल्यामागचा नापाक इरादा उघड झाला. आपण पाकिस्तानचा रहिवासी असल्याची कबुली कसाबने दिली. मुंबईवर हल्ला करण्यापूर्वी कसाब आणि त्याच्या साथिदारांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आलं होतं तसेच ते एकूण १० जण समुद्रमार्गे मुंबईत दाखल झाले होते. कसाबच्या जबाबातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. मुंबई हल्ल्याची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी सरकारने विशेष न्यायालयाची स्थापना केली आणि १३ जानेवारी २००९मध्ये एम.एल.तहिलयानी यांची विशेष कोर्टाचे न्यायाधिश म्हणून नियुक्ती करण्यात आली. २० फेब्रुवारी २००९ला महानागरदंडाधिकाऱ्यांसमोर कसाबने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पाकिस्तानात घेतलेल्या लष्करी प्रशिक्षणापासून ते मुंबईवर केलेल्या हल्ल्यापर्यंतची इत्यंभूत माहिती त्याने कबुली जबाबात दिली होती. या हल्ल्याप्रकरणी कसाब प्रमाणेच फहिम अन्सारी आणि सबाउद्दीन या दोघांवरही आरोप ठेवण्यात आले होते. २५ फेब्रुवारी २००९ ला सरकारी पक्षाने कसाबसह तिघांविरोधात १५ हजार पानांचं आरोपपत्र न्यायालया समोर सादर केलं आणि त्याच दिवशी अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. १५ एप्रिलला या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. पण त्याचवेळी तांत्रिक कारणामुळे अंजली वाघमारे यांच्याकडून कसाबचं वकीलपत्र काढून घेण्यात आलं होतं आणि अब्बास काझमी यांना कसाबचा वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं. या खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने लावलेले सर्व आरोप कसाबने फेटाळून लावले. ८ मे २००९ ला पहिल्या साक्षिदाराने न्यायाधिशांसमोर साक्ष नोंदवली. २० जुलै २००९ ला न्यायालयाचं कामकाज सुरु असतानाच कसाबने कसाबने कोर्टासमोर आपला गुन्हा कबूल केला. याचदरम्यान मुंबई पोलिसांनी पाकिस्तानातील हफीज सईद आणि जाकीर रहमान लखवीसह २२जणांविरोधात अजामीन वॉरंट जारी केलं. या संपूर्ण खटल्यात ६५३ साक्षिदार कोर्टाने तपासले. तब्बल २७१ दिवस हा खटला चालविला गेला आणि ३० मार्च २०१० रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. ३ मे २०१० ला कोर्टाने कसाबला दोषी ठरवलं. तर सहआरोपी फहिम अन्सारी आणि सबाउद्दीन या दोघांची पुराव्याआभावी निर्दोष मुक्तता केली. अखेर तो दिवस उजाडा जेव्हा विशेश न्यायालयाने कसाबचा फैसला सुनावला. ६ मे ला कोर्टाने कसाबला फाशीची शिक्षा ठोठावली. त्यानंतर १० ऑक्टोबर २०११ला मुंबई उच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं आणि आज ११ महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय.

अमेरिकेवरही झाला होता दहशतवादी हल्ला... ११ सप्टेंबर २००१ला अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता..तो हल्ला अमेरिकेपासून हजारो किलोमीटर अंतरावर बसलेल्या ओसामाबिन लादेन याने घडवून आणला होता. अमेरिका आपल्याला पकडू शकणार नाही अस लादेनला वाटलं होतं. कारण तो अमेरिकेत लपून बसला होता. पण अमेरिकने त्याला शोधून त्याचा खातमा केलाच.
दिनांक 11 सप्टेबंर 2001
ठिकाण – न्यूयॉर्क हा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस होता. कारण याच दिवशी अमेरिकेवर हल्ला झाला होता. एक प्रकारचं ते युद्धच होतं. पण अमेरिकेचा शत्रू मात्र उघडपणे समोर नव्हता. पण त्यांनी केलेला हल्ला मात्र भीषण होता. हा हल्ला अल कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेनं घडवून आणला होता. जगात सर्वशक्तीमान देश म्हणवून मिरवणा-या अमेरिकेवर हल्ला करण्याचं धाडस अल कायदाने केलं होतं. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी विमानांचा वापर केला होता. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. न्यूयॉर्क शहरावर झालेल्या या हल्ल्याचं षडयंत्र न्यूयॉर्क पासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या अफगाणिस्तानात रचण्यात आलं होतं आणि त्या षडयंत्रचा सूत्रधार होता... ओसामा बिन लादेन... अलकायदाचा म्होरक्या लादेननं को कट आखला होता. विमानांचे अपहरण करुन दहशतवाद्यांनी ट्विन टॉवरवर हल्ला चढवत वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या त्या दोन गगनचुंबी इमारती भस्मसात केल्या होत्या. तसेच पॅटेगॉनला सुरक्षा विभागाच्या इमारतीवरही विमान कोसळवण्य़ात दहशतवाद्यांना यश आलं होतं. या हल्ल्यात 2 हजार ९८५ हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानं अमेरिका पुरती हादरुन गेली. पण त्यानंतर तिथल्या राजकारण्यांनी लादेनंचा शोध घेण्यासाठी जी मोहिम राबवली त्यातून त्यांची राजकीय इच्छा शक्ती दिसून आली.
लादेनच्या शोधासाठी अमेरिकेनं मित्र राष्ट्रांच्या मदतीने अफागाणीस्तानात सैन्य धाडलं. या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले पण लादेन काही हाती लागला नाही. कारण तो अफागणीस्तानातून कधीच निसटला होता. २००५मध्ये लादेन पाकिस्तानात असल्याची पक्की खबर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणार सीआयएला मिळाली होती. पण लादेनने नेमका कुठं आश्रय घेतलाय या बाबत त्यांना शंका होती. पुढची सहा वर्ष सीआयएने लादेनच्या ठावठिकाणीची इत्यंभूत माहिती मिळवल्यानंतर त्याला ठार करण्याचा निर्णय़ घेतला. पण ती कामागिरी काही सोपी नव्हती. कारण लादेन पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये लष्करी तळा जवळच्या एका कोठीत लपून बसला होता. पाकिस्तानच्या मदतीने लादेनला पकडण्याची जोखीम अमेरिकेला पत्करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला अंधारात ठेवून लादेनचा खातमा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक ऑपरेशन निश्चित करण्यात आलं आणि त्याचं नाव होतं ऑपरेशन ‘जेरोनिमो’... या ऑपरेशनची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांनाच होती. एका स्पेशल रुममधून राष्ट्राध्यक्ष ओबामा ते ऑपरेशन लाईव्ह पहात होते. अमेरिकेच्या मरिन कमांडो तुकडीवर त्या सगळ्या कारवाईची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे दोन हेलिकॉप्टरमधून त्या तुक़डीतील कमांडो अबोटाबादकडं रवाना झाले आणि त्यांनी १ मे २०११च्या मध्यरात्री लादेनच्या कोठीवर हल्ला चढवून त्याचा खातमा केला. तसेच त्याची ओळख पटून त्या मृतदेह घेऊन ते पुन्हा आपल्या जहाजकड रवाना झाले. अवघ्या चाळीस मिनिटात ते ऑपरेशन पार पडलं. अमेरिकेनं केलेली ही कारवाई अत्यंत धाडसी होती. पण तरिही अमेरिकेनं कारवाई करण्यास मागेपुढे बघीतलं नाही. तसेच पाकिस्तानशी चर्चेच गु-हाळही केलं नाही.
लंडनमधले साखळी बॉम्बस्फोट२००५मध्ये लंडनवरही दहशतवादी हल्ला झाला होता. लंडनमधली प्रसिद्धी भुयारी रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती. कसा केला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी तो तपास हे आता आपण पहाणार आहोत..
दिनांक ७ जुलै २००५
साखळी बॉम्बस्फोटांनी लंडन शहर अक्षरशा हादरुन गेलं होतं. हे बॉम्बस्फोट लिव्हरपूल स्ट्रिट ट्यूब रेल्वे स्टेशन, एजवर स्ट्रिट, किंग्ज क्रॉस ट्यूब रसेल स्टेशन या तीन भुयारी रेल्वे स्टेशनमध्ये झाले होते. तसेच चौथा स्फोट हॅकनी रो़डवर एका डबल डेकर बसमध्ये झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता तर सातशेहून अधिक लोक जखमी झाले होते. त्यामध्ये चार दहशतवाद्यांचाही समावेश होता. या हल्ल्यामागील आरोपींचा शोध घेण्य़ासाठी लंडनच्या तपास यंत्रणेनं सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली. तसेच नागरिकांकडं असलेले फोटो, व्हिडिओ पोलिसांना पाठविण्याचं आवाहन केलं. त्यानंतर स्कॉडलंड यार्ड पोलिसांनी क्लोज सर्किट टीव्हीची काही छायाचित्र जारी केले होते. तसेच त्यांना हसीब हुसैन या बॉ़म्बरचं छायाचित्रही प्रसिद्ध केलं होतं. अलकायदाने दहशतवादी हल्ल्यासाठी वापरत असलेल्या स्फोटकांचा वापर लंडन हल्ल्यासाठी करण्यात आला होता. या प्रकरणी लंडन पोलिसांनी केलेल्या तपासात तीघा जणांची नावं निष्पन्न झाली होती. त्यापैकी शहजाद तन्वर आणि मोहम्मद सिद्दीकी खान हे दोघेजण तीन महिने पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचं उघड झालं होतं. हसीब हुसैन हा जुलै महिन्यात पाकिस्तानत येऊन गेला होता. हसीबने बसमध्ये स्फोट घडवून आणला होता. या प्रकरणात पुढे आणखी पाचजणांना अटक करण्यात आली होती.
First Published: Wednesday, August 29, 2012, 22:48