Last Updated: Tuesday, November 19, 2013, 22:12
www.24taas.com, झी मीडिया, लंडन एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांना ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन’ (UEL) कडून आज (१९ नोव्हेंबर रोजी) डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे.
यूईएल विद्यापीठाचे कुलपती लॉर्ड गुलाम नून यांच्या हस्ते ही मानद पदवी देण्यात येईल. रॉयल डॉक बिझनेस स्कुलच्या पदवीधरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात हा समारंभ पार पडणार आहे.
स्थानिक वेळेनुसार १६.३० वाजता तर भारतीय वेळेनुसार १४.३० वाजता हा सत्कार समारंभ पार पडणार आहे. यावेळी, ‘द वर्ल्ड इज माय फॅमिली’ या ‘झी’ कॉर्पोरेशनच्या जागतिक तत्त्वज्ञानामागची आपली भूमिका सुभाष चंद्रा स्पष्ट करतील.
सुभाष चंद्रा यांच्यासोबतच डॉ. इझुद्दीन आणि लॉर्ड रिक्स यांनाही ‘यूईएल’कडून गौरविण्यात येणार आहे. ‘यूईएल’च्या यूट्यूब चॅनलवर या सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहता येईल. (http://www.youtube.com/videouel).
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 19, 2013, 17:17