Last Updated: Thursday, July 18, 2013, 22:08
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईवडाळ्यातल सिद्धार्थ विहार हॉस्टेल एकेकाळी दलित चळवळीचं केंद्र होत. आज मात्र हे हॉस्टेल शेवटच्या घटका मोजतंय. इमारत मोडकळीस आलीये, तिथलं वातावरण अस्वछ आहे. अनेक दलित नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकत्यांनी या वसतिगृहातील रूम बळकावल्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उदात्त हेतूनं तळागाळातील लोकांसाठी ही संस्था सुरू केली त्याकडे लक्ष द्यायला आता गटातटात विखुरलेल्या नेत्यांकडे मात्र वेळ नाही...
1964 साली उभ्या राहिलेल्या या इमारतीनं एकेकाळी चळवळीचा सुवर्णकाळ पाहिलाय. अनेक साहित्यिक, राजकारणी आणि अधिका-यांना घडवण्यात या इमारतीचं योगदान राहिलंय... अनेकांना पडत्या काळात तिनं साथ दिलीये. आता मात्र तिची रया गेलीये आणि तिच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही...
या तीन मजली इमारतीत दीडशे खोल्या आहेत. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातून येणा-या गरजू विद्यार्थ्यांचं हे हक्काचं आश्रयस्थान राहिलंय... आता तर इथं राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांनी आपली ऑफिसेस थाटली आहेत. इमारतीला अतिक्रमणांचा विळखा प़डलाय... 90 सालापर्यंत ही इमारत व्यवस्थित होती. मात्र दलित चळवळीत शिरलेल्या गटातटाच्या राजकारणानं पिपल्स एज्युकेशन सोसायटीलाही आपल्या कवेत घेतलं आणि हे वसतीगृह त्याचा बळी ठरलं...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, July 18, 2013, 22:03