बनावट नोट, खिशाला चाट Fake Notes

बनावट नोट, खिशाला चाट

बनावट नोट, खिशाला चाट
www.24taas.com, मुंबई

बनावट नोटा कुठून आणल्या जातात आणि त्या ओळखयाच्या कशा हे आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत.. मात्र त्यापूर्वी पहाणार आहोत देशात कोणकोणत्या राज्यात बनावट नोटांचा साठा पोलिसांनी जप्त केलाय ते....सुरुवात बंगळुरु शहरातपासून करणार आहोत...बंगळुरु पोलिसांनी नुकताच बनावट नोटांचा साठा जप्त केलाय.

बनावट नोटांची तस्करी करणारी एक टोळी बंगळुरुमधील एका हॉटेलात उतरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बनावट नोटा चलनात आणण्याचा त्यांचा डाव होता...पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी हॉ़टेलावर छापा मारला...या छाप्य़ात त्यांनी ९जणांना जेरबंद केलं...

पोलिसांनी या छाप्यात पाचशे आणि हजाराच्या नोटा जप्त केल्या आहेत..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी २० ते ४० हजार रुपयांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट नोट देत असत.

बंगलुरु पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून बनावट नोटांबरोबरच शस्त्रसाठाही जप्त केला आहे...या बनावट नोटा भारत-बांग्लादेश सीमावर्ती भागातून आणल्याचं प्राथमीक तपासात निष्पन्न झालं आहे..

तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रिनवर ज्या नोटा पहात आहात त्या ख-या असल्याचा तुमचा समज होण्याची शक्यता आहे..कारण या बनावट नोटाच त्या पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत..ख-या नोटांप्रमणे हुबेहुब या नोटा छापण्यात आल्या आहेत..

पोलिसांनी वेळीच छापामारुन या नोटा जप्त केल्यानसत्या तर अवघ्या काही तासात या बनावट नोटा विविध राज्यात चलनात आणण्यासाठी पाठविल्या गेल्या असत्या आणि एकदाका बनावट नोटा चलनात आल्या की त्यांना शोधून काढणं कठीण होवून बसतं..


केवळ बंगळुरुच नाही तर गुजरातमध्येही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा साठा जप्त केलाय..गेल्या अनेक दिवसांपासून ती टोळी बनावट नोटा चलनात आणीत होती... पोलिसांनी त्याच्याकडून २६ लाख ७६ हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत..

बनावट नोटांचा हा साठा गुजरातच्या वेगवेगळ्या परिसरातून जप्त करण्यात आलाय..२६ लाख ७६ हजार रुपयांच्या बनावट नोटा गुजरातमध्ये चलनात आणल्या जाणार होत्या..त्यासाठी एका टोळीने खास तयारी केली होती..पोलिसांनी या प्रकरणी खोलात जाऊन तपास केल्यानंतर एक-एक धक्कादायक माहिती समोर येत गेली...आरोपी बाजारात वस्तू खरेदी करुन बनावट नोटा चलनात आणीत असतं..

बनावट नोटा चलनात आणणारी ही टोळी सुनियोजीतपणे आपलं नेटवर्क चालवीत होती..या टोळीतील लोक गुजरातच्या जूनागड,जामनगर तसेच अन्य परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचं काम करत होते..गुजरात पोलिसांनी या कारवाईत १४ जणांना अटक केलीय..आरोपींकड केलेल्या चौकशीतून अत्यंत महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागलीय..

पोलिसांनी जप्त केलेल्या २६ लाख ७६ हजार रुपयांच्या बनावट नोटांमध्ये पाचशे आणि हजाराच्या नोटांचा समावेश आहे..ही टोळी ४० हजार रुपयांच्या बदल्यात एक लाखाच्या बनावट नोटांची विक्री करत होती...

ख-या नोटांप्रमाणेच या नोटांची बनावट असल्यामुळे सहजासहजी कोणाला शंका येत नाही..


गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राफिक्स इन- बनावट नोटांचा अड्डा पाकिस्तान आणि दुबईमध्ये आहे..पाकिस्तान आणि दुबईतून बनावट नोटा बांग्लादेशात पाठविल्या जातात...आणि त्यानंतर पश्चिम बंगाल मार्गे त्या भारतातील विविध राज्यात चलनात आणण्यासाठी पाठविल्या जातात..


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट नोटा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पाठविण्यासाठी तस्करांकडून मजुरांचा वापर केला जात आहे..तसेच त्यांच्या प्रवासाचं महत्वाचं साधन हे रेल्वे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय...बंगलुरु पाठोपाठ गुरजातमध्येही बंनावट नोटांचा साठा जप्त केल्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाली असून बनावट नोटा चलणात आणणा-या तस्करांवर लगाम लावण्याचं आव्हाण त्यांच्या समोर उभ ठाकलं आहे..

देशाची राजधानी दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत बनावट नोटांचा सूळसूळाट झालाय...त्याचं कारण म्हणजे अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने तस्कर बनावट नोटा भारतात आणतात आणि त्यानंतर त्या आपल्या हस्तकांमार्फत चलनात आणल्या जातात..देशातील वेगवेगळ्या राज्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ज्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत तो आकडा थक्क करणारा आहे..

तुम्ही महाराष्ट्र राहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.. तुमच्या खिशात असलेली नोट बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही..

तुम्हाला घाबरवणं हा आमचा उद्देश नाही तर तुम्हाल सावध करणं हाच यामागचा आमचा हेतू आहे..थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुमच्या कष्टाची कमाई पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..माहितीच्या आधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात महाराष्ट्र,दिल्ली, आंध्रप्रदेश,उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणल्या गेल्याचं उघड झालंय...ग्राफिक्स इन -बनावट नोटांची सर्वाधिक प्रकरणं देशाची राजनाधी दिल्लीत उघड झाले आहेत..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट नोटांचं नेटवर्क हे प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातून चालवंलं जातंय..गुप्तचर विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात येणा-या बनावट नोटांपैकी जवळपास ७० टक्के नोटा या एकट्या बांग्लादेशातून आणल्या जातात..


गेल्या दोन वर्षात जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांमध्ये सर्वाधिक नोटा दिल्लीत जप्त करण्यात आल्या आहेत..ग्राफिक्स इन - दिल्लीत जवळपास तीन कोटी रुपयांच्या बनावट नोटा दोनवर्षात जप्त केल्यात...महाराष्ट्र आणि प.बंगालमध्य़ेही मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

गेल्यावर्षी दिल्लीत जप्त केलेल्या बनावट नोटांचा आकडा थक्क करणारा आहे.. २०११मध्ये दिल्लीत ४ कोटी ९३ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या..त्याचवर्षी महाराष्ट्रात साडेचार कोटी बनावट नोटा जप्त केल्या गेल्या..२०११मध्ये आंध्रप्रदेशात अडीच कोटी रुपयांहून अधिक बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत..ही आकडेवरी पहाता देशात बनावट नोटांची तस्करी किती मोठ्याप्रमाणात केली जातेय हे सहज लक्षात येईल..

आज ज्या प्रमाणात बनावट नोटा जप्त केल्या जात आहेत ते पहाता रोजच्या व्यवहारात नोटा घेतांना त्या पारखून घेतल्या पाहिजेत... वरवर पहाता खरी नोट आणि बनावट नोट यांच्यातला फरक ओळखणं कठीण असतं...पण आता तुम्हालाही बनावट नोट ओळखता येणार आहे.

देशात आजमितीला ६ लाख ४५ हजार ७७० हून अधिक बनावट नोटा चलनात आहेत...म्हणजेच बनावट नोट तुमच्या आमच्या, कोणाच्याही खिशात असण्याची शक्यता नाकारता येत नाही..कारण एकदाका बनावट नोट चलनात आली की ती शोधून काढणं सर्वसामान्य माणसाला सहजा सहजी शक्य होत नाही..

खरंतर बनावट नोटांची ही संख्या याहून अधिक असण्याची शक्यता वर्तली जात आहे..कारण हा आकडा दीड वर्षांपूर्वीचा आहे. रिझर्व बँकेच्या आकडेवारीनुसार २०१० - २०११ या वर्षी चलानत असलेल्या प्रत्येक १० लाख नोटांमध्ये सात नोटा या बनावट होत्या..ग्राफिक्स आऊट- चलनात बनावट नोटांचा सूळसूळाट झाल्यामुळे तुम्हाल तुमच्या कष्टाच्या कमाईवर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते...

बनावट नोटांवर लगाम लावण्यासाठी रिझर्व बँकेकडून प्रयत्न केले जात आहे...बनावट नोटा ओळखण्यासाठी रिझर्व बँकेने वेळोवेळी माहिती प्रसिद्ध केली आहे...आता तर रिझर्व बँकेनं त्यासाठी एक वेबसाईटच सुरु केली आहे..त्या वेबसाईटचं नाव आहे...

या वेवसाईटमध्ये बनावट नोट कशी ओळखायची याची माहिती देण्यात आली आहे.....`ओळखा पैशाची भाषा, कारण पैसाही बोलतोय ` अशी टॅगलाईन असलेल्या या साईटवर 10, 20 ,50, 100, 500 औऱ 1000 रूपयांच्या नोटांची सत्यता ओळखण्यासाठी सचित्र माहिती देण्यात आलीय. त्यातल्या काही गोष्टींवर नजर टाकू या...

१) पाचशे रुपयांच्या ख-या नोटेवर एक छोटीशी डीझाईन दिसते...ही डिझाईन म्हणजे ५०० असे अर्धवट लिहिले आहे..जर ही नोट प्रकाशासमोर धरुन बघीतल्यास ते ५०० असे पूर्ण लिहिले असल्याचं आढळून येईल..

२) नोटेवरचा हा भाग कोरा दिसत असली तरी या जागेवर महात्मा गांधींचे चित्र असून नोट प्रकाशासमोर धरल्यास ते चित्र दिसून येते..

३)एका विशिष्ट प्रकारच्या शाईने नोटेच्या मधोमध ५०० असे लिहिलेले असते.नोट समोर धरल्यास ही शाई हिरवी दिसते आणि विविध कोनांमध्ये ती शाई निळी दिसते


४)जेथे नोटेचा क्रमांक लिहिला आहे तो भाग अल्ट्रा व्हायोलेट लाईटमध्ये धरल्यास तो चमकतो.मात्र हा फरक मानवी डोळ्यांना दिसत नाही



५) नोटेच्या मध्योमध असणारी ही पातळ पट्टी तुटक दिसत असली तरी ती अखंड असते.. नोट प्रकाशात धरल्यास ती अखंड दिसते..तसेच त्यावर आरबीआय , भारत असे लिहिलेले असते..ही पट्टी हिरवा आणि निळा असा रंग बदलते



अशा प्रकारच्या ११ बाबी रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाईटवर सचित्र नमुद केल्या आहेत... य़ा वेबसाईटचा उपयोग करुन बनावट नोटाना चलनात येण्यापासून रोखू शकता...

First Published: Monday, September 17, 2012, 23:27


comments powered by Disqus