कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न farmers problem solved through canal

कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न

कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न
अमित देशपांडे , www.24taas.com, वर्धा

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी मात्र सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखला देत अवघ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याला कालव्याच्या माध्यमातून अडवण्याची कामगिरी यशस्वी झालीय. ही कौतुकास्पद कामगिरी पूर्ती उद्योग समुहाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यशस्वी करुन दाखवलीय. शेतकऱ्यांना कपाशी,सोयाबीन आणि ऊसासाठी 12 महिने पाणी मिळणार आहे.


हा कालवा जिथे आहे तिथे पूर्वी नाला होता त्यामुळे पाऊस आल्यानंतर नाल्याला पूर येत होता.परिणामी शेत-यांच्या शेतात पाणी शिरुन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होत. त्यामुळे या नाल्याचं कालव्यात रुपांतर करुन त्यावर बंधारा बांधण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झालाय.

या कालव्याला 40 लाख रुपये इतका खर्च आला असून शेतकऱ्यांना यापासून भविष्यात कोट्यावधींचं उत्पन्न मिळणार आहे. विधायक कामांसाठी जास्त खर्च येतोच असं नाही मात्र तशी दृष्टी आणि इच्छा असावी लागते. पूर्ती उद्योग समुहाचा उपक्रम राज्यात हाती घेतला आणि आलेल्या पॅकेजचा सदुपयोग झाला तर शेतकऱ्यांचा त्याचा नक्की फायदा होईल.

First Published: Sunday, September 30, 2012, 08:24


comments powered by Disqus