आरबीआयच्या मुख्यालयावर गोळीबार Gun Shot at RBI Headquarter

आरबीआयच्या मुख्यालयावर गोळीबार

आरबीआयच्या मुख्यालयावर गोळीबार
www.24taas.com, मुंबई

मुंबईत आरबीआयच्या मुख्यालयावर गोळीबार झाल्याची घटना आज घडलीय भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परसरात खळबळ माजली आहे.

आरबीआय मुख्यालयावर घुसण्याचा एका बंदुकधारी इसमाचा प्रयत्न सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी हाणून पाडला. एक बंदूकधारी व्यक्ती दुपारच्या सुमारास आरबीआय मुख्यालयाजवळ आली, आणि या व्यक्तीनं आरबीआयच्या मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.


या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पद्मगिरीराव शेखर असं या आरोपीचं नाव असून, त्याला रमाबाई नगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारानं खळबळ उडालीय.

First Published: Tuesday, April 2, 2013, 18:27


comments powered by Disqus