एक माणूस उडणारा ! Flying man

एक माणूस उडणारा !

एक माणूस उडणारा !
www.24taas.com, मुंबई

गोष्ट उडणा-या माणसाची.. पण ही गोष्ट खरीखुरी आहे.. वास्तवातली.. आजच्या टेक्नोलॉजीच्या युगातही विज्ञानाला आव्हान देणारा हा माणूस कोण आहे आणि तो नेमका करतोय तरी हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... याच प्रश्नांच उत्तर शोधणार आहोत..

एक 44 सेकंदाचा व्हिडीओ...इंटरनेटवर बघता बघता सुपर डुपर हिट ठरला..का? कारण या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क हवेत उडताना दिसत होता. लंडनच्या रस्त्यावर धावत असलेल्या एका डबल डेकर बस बरोबर हा बहाद्दर कोणत्याही आधाराशिवाय हवेत उडत होता...स्टंट आणि जादूगारांचे वेगवेगळे प्रयोग तुम्ही यापूर्वीही खुप बघितले असतील पण या सारखा नाही...

नाव डायनमो

वय 30 वर्ष

ठिकाण लंडन

30 वर्षांचा डायनमो लंडनच्या रस्त्यावर एक असा कारनामा केलाय जो आज पर्यंत न कोणी पाहिला असेल आणि ना कोणी ऐकला असेल आणि हा चमत्कार झाला लंडनच्या रस्त्यावर...30 वर्षाचा स्टीवन फ्रायन ज्याला जग डायनमो या नावानं ओळखतं...आपला सर्वात धमाकेदार कारनामा दाखवतोय...

15 फूट उंचीची लाल रंगाची डबल डेकर बसला डायनमो विचित्र पद्धतीनं जोडला गेलाय. डायनमोचा उजवा हात फक्त या डबल डेकरच्या छताला फक्त स्पर्श करताना दिसतोय. बस धावतेय आणि डायनमो बिंधास्तपणे..या धावत्या बसला कोणत्याही सहा-या विना उडतोय.

डायनमोला या धावत्या बसला बरोबर हवेत उडताना पाहिल्यावर लंडनच्या लोकांना विश्वासच बसला नाही. लोग थक्क होऊन हा चमत्कार पाहत होते आणि आपल्या मोबाईलवर डायनमोचा हा चमत्कार टिपत करत होते...

कोणत्याही सहा-या विना एखादा माणूस हवेत कसा उडू शकतो यावर तर लोकांचा विश्वासच बसत नव्हता..पण डायनमोकडे पहाताना एखादं स्वप्नच पहात आहोत असचं त्यांना वाटत होतं...

हवेत लटकलेला हा डायनमो कोणत्याही दबावाखाली नाही तर तो बिंधास्त आहे. दोन्ही पाय मजेत हलवत तो धावत्या बस बरोबर उडतोय..डायनमो हा कारनामा कसा करतोय लोक या विचारात पडलेत. पण डायनमो एखाद्या हॉलीवूड चित्रपटाच्या सुपर हिरो प्रमाणे बिंधास्तपणे उडतोय. इतकच काय तर त्याच्या डावा हातात मोबाईलही आहे आणि आपल्या मोबाईलवर तो लोकांच्या प्रतिक्रियाही शूट करतोय...डायनमोची बस ज्या रस्त्यावरुन धावली त्या रस्तायवर लोकांची तौहा गर्दी झाली...प्रत्येकाला हा एक चमत्कारच वाटला कि एक माणूस हवेत उडतोय...

हजारो लोकांना आश्चर्याचा धक्का देणा-या डायनमोसाठी हा कारनामा करणं अवघड नव्हतं. रस्त्यावर धावणा-या या बस बरोबर उडाल्यानंतर डायनमोचे पाय जमीनीवर उतरले आणि त्याच्या चेह-यावर तोच बिंधास्तपणा होता....

कुठल्याही आधाराशिवाय उडतं राहता येईल का..यावर प्रत्यक्ष विश्वास ठेवणं कठीण आहे. त्याची ती जादू आहे आणि तीच पाहून दुनिया थक्क झालीय. कधी हवेत उडत जातो.. कधी पाण्यावर चालतो. कधी भिंतीवर धावतो. या जादूगाराचे शौकही जगावेगळे आहेत. आणि ते सगळेच विज्ञानाच्या कसोटीलाच आव्हान देतात.


लंडनच्या रस्त्यावर असा नजारा पहिल्यांदाच कधी पाहिला नव्हता.. एक व्यक्ती डबल़डेकर बसला अशी लटकली होती. जणू काही ती हवेतच उडत चाललीय. विश्वास ठेवण शक्य नाही.. पण ही व्य़क्ती रस्त्यावर चालणा-या बससोबत खरोखरच हवेत तरंगत चाललीय.. कुठल्याही आधाराशिवाय.. फक्त डाव्या हाथाने बसला स्पर्श केलाय..

ही हवाई कसरत, हा करिश्मा करणारा तीस वर्षीय स्टीवन फ्राईन आहे. जो जादूगारांच्या दुनियेत डायनमो म्हणून ओळखला जातो.

नाव -स्टीवन फ्राईन

डायनमो नावानं प्रसिद्ध

आगळ्यावेगळ्या स्टंटसाठी विख्यात


किरकोळ देहयष्टीच्या या माणसाला पाहिल्यावर कोणालाही तो अचाट करामती करु शकतो यावर विश्वास ठेवणं तस कठीण आहे. पण डायनमोनं असे काही जादूई स्टंट केलेत की प्रत्येकजण आज अचंबित आहे.

थेम्स नदीवर जादूई करामत

पाण्यावर चालला डायनमो

दोन वर्षापूर्वी डायनमोने लंडनच्या थेम्स नदीच्या पाण्यावर चालण्याचा पराक्रम केलाय. तिथं उपस्थित असणारा प्रत्येक जण अवाक झाला होता. एका संध्याकाळी डायनमो वेस्टमिनिस्टर पुलावरुन चालत थेम्स नदीवर चालत गेला.. आणि सुमारं शंभर पावले त्या पाण्यावर चालत गेला..

डायनमोची जादूगिरी

स्पायडरमॅन बनला डायनमो

अमेरिकेमधील लॉ़स एंजालिसमध्ये एका वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या भिंतीवर डायनमो अगदी बिनधास्तपणे चालला होता. अंधुक प्रकाशात डायनमो भिंतीवर धावतोय.. डायनमोच्या या कारनाम्याने सगळेच दंग राहिलेत.. एखादा माणूस भिंतीवर चालू शकतो यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता..

निसर्गाच्या नियमाविरुद्ध डायनमोनं अपनी जादूगिरीने आव्हान दिलयं.. कधी नदीच्या पाण्यावर चाललाय. तर कधी भिंतीवर धावत सुटलाय. आणि त्याने ते करुन दाखवलय.. ज्याचा कुणी विचारही नाही केलाय.. हवेत उ़डणा-या डायनमोला पाहिल्यावर याची प्रचिती येते. डायनमोनं जादूच्या दुनियेत प्रत्येकाला मागे टाकलय.. यामागचं सत्य काय आहे याचाही उलगडा करणार आहोत...

डायनमो म्हणजेच जगातील सर्वात प्रसिद्ध जादूगरांपैकी एक...त्याच्या निळ्या डोळ्यांच्या मागे कितीतरी रहस्य लपलीयत..त्याच्या जादूची रहस्य..आपल्या जादूनं तो लोकांना कसा आनंद देतो आणि त्याच्या जादूचे सर्वच रहस्य कोण जाणतो..या आणि अशा सारख्या सर्वच प्रश्नांची उत्तरं स्वत: डायनमोमंच दिली आहेत.

इंग्लंडच्या यार्कशाय येथे जन्मलेला स्टीवनला आज संपूर्ण जग डायनमोच्या नावानं ओळखतंय...डायनमोनं आपली जादू आणि अविश्वसनीय कारमान्यांमुळे जगभरात आपले चाहते तयार केलेत. त्याची पहिली टिव्ही सीरिज डायनमो - मॅजेशियन इम्पॉसीबल या कार्यक्रमाने डायनमोला प्रसिद्धीच्या उंचीवर पोहोचवलं. या कार्यक्रमाच्या पहिल्याच सीझनला फक्त ब्रिटेनमध्येच 17 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं.

जगातल्या मोठ्या जादूगारांबरोबर माझंही नाव घेतलं जातय याचा आनंदच आहे. मला नेहमी वाटायचं की मी पाण्यावर चालता यावं..ते माझं स्वप्न होतं. आणि मी ते पूर्ण केलं. मला पोहता येत नव्हत आणि लोक मला पाण्यात ढकलून देत..तेव्हापासून मी ठरवलं की एक दिवस मी पाण्यावर चालून दाखवीन. लोकांच्या चेह-यावरचं आश्चर्य पाहून बरं वाटतं...मी जे काही करतोय ते फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी...

मला बिल्डिंगवरुन उतरताना भिती वाटत होती...मला नेहमीच उंच ठिकाणांची भीती वाटायची. आपल्या याच भितीवर मला मात करायची होती...माझ्या आजोबांनी मला जादू शिकवलीय..पहिल्यांदा जादू पाहिल्यावर मला जो आनंद झाला होता त्याच आनंदासाठी मी काम करतोय...माझ्या आजीला माझ्या जादूची प्रत्येक ट्रीक माहित आहे.

डायनमोची ही ट्रीक पण जबरदस्त आहे ज्यात तो मोबाईलला लहान करुन बाटलीत भरतो आणि बाटलीतच फोन पुन्हा मोठा करतो. मोबाईलची ही ट्रीक म्हणजे आत्तापर्यंत न सुटलेलं कोडंच आहे. आणि डायनमो आपल्या या ट्रीकचं रहस्य मॅजेशियन इम्पॉसीबलच्या तीस-या सीझनमध्ये उलगडणार आहे.

डायनमोची सर्वात मोठी अचिव्हमेंट किंवा त्याची सर्वात मोठी ताकद हिच की त्याला स्टेजची गरज नाही.. आजूबाजूच्या कोणत्याही जागेला तो आपलं स्टेज बनवतो..मग ती उंचच्या उंच इमारत असो, शहराच्या मधून वाहणारी नदी असो वा रस्त्यावर धावणारी एखादी बस असो..प्रश्न हाच की डायनमोच्या या या चमत्कारीक जादू मागचं रहस्य काय? पाण्यावर चालणं असो किंवा बस बरोबर उडणं..

डायनमो स्वत: सांगतो की त्याच्या जादूचं प्रत्येक रहस्य फक्त त्याच्या आजीलाच माहित आहे. पण आम्ही त्याचं प्रत्येक रहस्य जाणलय..जे कोणालाच माहित नाही..तुम्हालाही त्याचं प्रत्येक रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा असेल...स्टिवन फ्रायन उर्फ डायनमो जे काही करतो ते कसं हे जाणून घेऊया. सर्वात आधी उडत्या डायनमोचं रहस्य जाणून घेऊया.

बसवर हाथ ठेऊन उडण्याचं रहस्य

डायनमोनं अगदी सहज स्वत:ला हवेत तरंगत ठेवलं. बसच्या छतावर हाथ अलगद ठेऊन तो हवेत असा काही उभा होता जणू त्याच्या पायाखाली हवा नाही तर जमीनच आहे...पण त्यानं हे केलं कसं.. खरतर या ट्रीकला लेवीटेशन म्हणतात. यात अदृश्य अशा तारांच्या आधारे किंवा लपलेल्या प्लॅटफॉर्मने शरीराला आधार दिला जातो.

डायनमोनं ही ट्रीक दिवसा ढवळ्या केली असली तरी जो हाथ त्यानं बसच्या छतवर ठेवलाय तो खरा नसून त्याचा हाथ त्याच्या कपड्यांच्या आत आहे. आणि बसला लागलेला हात नकली असून तो एखाद्या स्टँडप्रमाणे काम करतोय. बसवर असलेला हात हा जराही हलत नाहीय. याचाच अर्थ तो नकली आहे आणि लोकांच लक्ष त्याकडे जाऊ नये म्हणूजच डायनमो आपल्या पायाची मोठ्या हुशारीनं हालचाह करुन लोकांचं लक्ष वेधतो. आणि लोकांना आश्चर्यचा धक्का देतो.

पाणीवर चालण्याचं रहस्य

जेव्हा डायनमो टेमनज नदीवर चालताना दिसला तेव्हा खरंतर तो नदीच्या पाण्यावर नाही तर पाण्याखाली असलेल्या एका प्लॅटफॉर्मवर चालत होता.

इमारतीवर चालण्याचं रहस्य

लॉस एँजेलिसच्या या इमारतीवर डायनमो असा चालत होता तशी एखादी पाल भिंतीवर चालावी...त्यानं हा चमत्कार असा केला...ही जादू दाखवण्यासाठी त्यानं रात्रीची वेळच घेतली कारण त्याच्या कपड्यांमध्ये लागलेली रश्शी जी त्याला सांभाळत होती ती कोणालाच दिसू नये म्हणून... इमारतीवर डायनमो जरी चालताना दिसत होता तरी त्याचा पूर्ण भार हा एका रश्शीनेच सांभाळला होता... आणि म्हणूनच त्याच्या मागे अंधार आणि त्याच्यावर मोठा प्रकाश टाकण्यात आला होता...

डायनमो आणि त्याच्या जादूचं रहस्य आपण आत्ताच जाणून घेतलं. जादू कितीही मोठी आणि अविश्वसनीय असली तरी प्रत्येक जादू मागे एक ट्रीक असते आणि ट्रीक माहित झाल्यावर त्या जादूची मजाही कमी होते...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 1, 2013, 23:35


comments powered by Disqus