जेलमध्ये गँगवॉर! Gangwar in Jail

जेलमध्ये गँगवॉर!

जेलमध्ये गँगवॉर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोप गँगस्टर अबू सालेमवर गुरुवारी तळोजा तुरुंगात गोळीबार करण्यात आला.. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणा-या तुरुंगात गोळीबाराची घटना घडल्यामुळे तुरुंगातील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय..

गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात एकच खळबळ उडाली..१९९३ मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेमवर देवेंद्र जगताप नावाच्या कच्च्या कैद्याने गोळीबार केला ..अबू सालेमच्या हाताल गोळी लागल्यामुळे तो किरकोळ जखमी झाला...

या घटनेनंतर सालेमला उपचारासाठी महापालिका रुग्णालय़ात दाखल करण्यात आलंय...सालेमवर गोळीबार करणारा देवेंद्र जगताप हा एडव्होकेट शाहिद आझमीच्या खून प्रकरणातील आरोपी असून तो भरत नेपाळी टोळीसाठी काम करतोय... सालेमवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजीत असून याप्रकरणी आपण कोर्टात दाद मागणार असल्याचं सालेमच्या वकीलाने सांगितलंय..

अबू सालेमवर झालेल्या गोळीबारामागे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकील आणि मुस्तफा डोसाचा हात असल्याचं बोललं जातेय..तसेच खुद्द सालेमनेच स्वतावर हा हल्ला घडवून आणला तर नाही ना ? याचही चौकशी पोलिसांकडून केली जातेय..

तळोजा तुरुंगात अत्यंत कडेकोट बंदोबस्त असून सर्वात सुरक्षित मानलं जातंय..मात्र अशा सुरक्षित तुरुंगात कच्या कैद्याने गोळीबार केल्यामुळे तळोजा तुरुंगाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय..

कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमवर तळोजा तुरूंगात अगदी जवळून गोळीबार झाला. मात्र गोळी त्याचा हाताला लागली..तुरुंगात कडेकोट बंदोबस्त असतांना हा गोळीबार झालाच कसा.? असा प्रश्न आता निर्माण झालाय. सालेमने स्वत: तर या हल्ल्याचा कट घडवून आणला नाही ना असा संशयही व्यक्त केला जातोय..

गँगस्टर अबू सालेमवर तळोजा तुरुंगात गोळीबाराची घटना घडल्यानंतर या हल्ल्यामागचा मास्टर माईंड कोण? याची चर्चा सुरु झालीय..कुख्य़ात डॉन दाऊदचा हस्तक छोटा शकीलने आपल्याला अबू सालेमची सुपारी दिल्याचं देवेंद्र जगतापने पोलिसांना सांगितलंय...
सालेमवर ज्या पद्धतीने हा गोळीबार झालाय तो पहाता पोलिसांचा संशय आणखीनच बळवलाय... देवेंद्र जगतापने अबू सलेमवर अगदी जवळून गोळीबार केला..मात्र ती गोळी सालेमच्या हाताला लागली त्यामुळे पोलीसांनी सर्वबाजूने तपास सुरु केलाय..

पोर्तुगालमध्ये परतण्यासाठीचर सालेमने हा कट रचला नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जातेय...कारण अबू सालेमला पोर्तुगालमधून गुन्हेगारी हस्तांतर प्रक्रियेनुसार भारतात आणण्यात आलंय..त्यामध्ये अनेक अटी घालण्यात आल्या असून सालेमच्या जीवाला भारतात धोका असल्याचं कारण पुढे करुन त्याला पुन्हा पोर्तुगालमध्ये पाठवण्याची मागणी केली जावू शकते..विशष म्हणजे सालेमच्या गुन्हेगारी हस्तांतरणालाच त्याच्या वकीलाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय..

तुरुंगात राहून टोळी चालवणं शक्य नसल्यामुळे सालेमने तुरुंगाबाहेर पडण्यासाठी स्वतावरच हा हल्ला घडवून आणला नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जाते...या प्रकरणी नवी मुंबईच्या क्राईम ब्रँचने तपास सुरु केला असून तपासानंतर सगळं काही स्पष्ट होईल...

अबू सालेमवर तुरुंगातील हा काही पहिला हल्ला नाही..मुस्तफा डोसाने अर्थररोड तुरुंगात त्याच्यावर हल्ला केला होता..दाऊदच्या डी कंपनीतील मुस्तफा डोसा हे एक मोठं नाव आहे...

1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाचं नाव आयपीएल फिक्सिंग प्रकरणातही आलं होतं...कारण फिक्सिंग प्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आलेले सहा सट्टेबाज हे डोसासबतच आर्थर रोड तुरुंगाच्या बॅरेक नंबर 10 मध्ये होते. मुस्तफाशी त्यांची चांगली मैत्री असल्याचं स्पष्ट झालय... मुस्तफाशी वैर घेणा-याला मुस्तफा कधीच सोडत नाही हे जगजाहिर आहे...मुस्तफाच्या गुन्हेगारी कारवायावर नजर टाकल्यास ते सहज लक्ष्यात येईल... दाऊदच्या डी कंपनीशी वैर असलेला गुन्हेगार जेव्हा जेव्हा आर्थर रोड तुरुंगात दाखल झाला तेव्हा तेव्हा मुस्तफानं त्याच्यावर जीवघेणा हल्ला केलाय. 2010मध्ये दाऊद टोळीशी फारक घेतलेला अबू सालेम आर्थर रोड तुरुंगात आला तेव्हाही मुस्तफाशी त्याची चकमक झाली होती.....मुस्तफाने अबू सालेमवर अर्थररोड तुरुंगात हल्ला केला होता.. जेवणासाठी वापरण्यात येणा-या काटे चमच्याचा शस्त्र म्हणून वापर करुन मुस्तफाने सालेमच्या चेह-या वार केले होते. सालेम या हल्ल्यातून कसाबसा बचावला.. आर्थर रोड तुरुंगात हल्ल्याची ही काही एकच घटना नाही ..यापूर्वीही अशा कितीतरी घटना घडल्या आहेत.. डी कंपनीच्या हस्तकांनी आपल्या विरोधकांना आर्थर रोडमध्ये बेदम मारहाण केली आहे.... मेहंदी हसन आणि अकरम खान यांना डी कंपनीच्या हस्तकांनी बेदम मारहाण केली होती...

तळोजा तुरुंगात अबू सालेमवर हल्ला झाल्यामुळे तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालंय..मात्र अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारांसाठी तुरुंग हे अत्यंत सुरक्षित ठिकाण बनलंय..सालेमवर २०१०मध्ये हल्ला झाल्यानंतर जेव्हा गृहराज्यमंत्र्यांनी तुरुंगाची पहाणी केली तेव्हा धक्कादायक माहिती उघड झाली होती...गँगस्टरला तुरुंगात पंचतारांकीत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचं उघड झालं होतं..

२०१०मध्ये गँगस्टर अबू सालेमवर हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी अर्थररोड तुरुंगाला भेट दिली होती..जेव्हा त्यांनी तुरुंगाचं निरिक्षण केलं तेव्हा ते चकीत झाले होते..कारण तुरुंगात डी कंपनीच्या गुंडासाठी पंचतारांकीत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या...सालेमला ज्या सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं त्या सेलमधील बाथरुमला मार्बल फ्लोरींग करण्यात आलं होतं..तिथं एक बेड होतं...टीफीन आणि मॉडेल्सचे फोटोही लावण्यात आले होते...दोन- तीन व्यक्तींना तब्बल दहा - बारा दिवस पुरतील इतकी फळं तिथ आढळून आली होती..

गरीबी आणि बेरोजगारीचा वापर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमकडून केला जात असून बेरोजगार तरुणांच्या मदतीने डी कंपनी कारवाया करत आहेत..डी कंपनीचे प्रमुख हस्तक भलेही तुरुंगाच्या चार भींतीआड कैद असले तरी त्यांच्या कारवाया मात्र थांबल्या नाहीत..ते तुरुंगातून टोळीचे सूत्र हलवतात..एखाद्या कटाची माहिती घेण्यासाठी हस्तक किरकोळ गुन्हा करुन तुरुंगात जातात आणि तेथून कटाची माहिती घेऊन ते जामीनावर बाहेर पडतात..तुरुंगा बाहेर आल्यानंतर ते तो कट तडीस नेतात..अशा पद्धतीने गुन्हेगारी टोळ्या कारवाया करत असतात.. खरं तर तुरुंगात जॅमर लावलेले असतात..पण या गुंड टोळ्यांपुढे जॅमर आणि सीसीटीव्ही निरर्थक असल्याचं वारंवार समोर आलंय..पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमीर कसाबसाठी अर्थररोड तुरुंगात सीसीटीव्ही लावण्यात आले होते..पण बाकीचे कैदी आजही त्या तिस-या डोळ्याच्या कक्षे बाहेर आहेत..

तुरुंगातील अंडरवर्ल्ड टोळ्यांच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी सरकारने तुरुंगात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय़ घेतलाय पण तुरुंग प्रशासनाला सीसीटीव्हीची सुरक्षा सतावतेय..कारण ठाण्याच्या तुरुंगात प्रायोगीक तत्वावर सीसीटीव्ही लावण्यात आले होते..पण कैद्यांनी ते फोडले..अंडरवर्ल्डच्या गुंडांकडून तुरुंग प्रशासनातील कर्मचा-यांना धमक्या दिल्या जातात..त्यामुळे तुरुंग कर्मचारी हतबल होता..आणि त्याचाच गैरफायदा अंडरवर्ल्ड टोळ्यांकडून घेतला जात आहे..


आजवरचा इतिहास पहाता अंडरवर्ल्ड टोळ्यांनी जणू तुरुंग वाटून घेतल्याचं पहायला मिळेल... मुंबईतील अर्थररोड तुरुंगात दाऊदच्या डी कंपनीचं वर्चस्व असल्याचं बोललं जातंय तर नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात डी कंपनीच्या विरोधकांचा बोलबाला असल्याची चर्चा आहे..

मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दाऊद इब्राहिम प्रमाणेच छोटा राजनचाही मोठा दबदबा आहे...दाऊद आणि राजन यांच्यालं वैर जगजाहीर आहे..अंडरवर्ल्डमध्ये छोटा राजन कॅप्टन नावाने ओळखला जातो..तळोजा तुरुंगात राजनचा उजवा हात डी.के.रावचा दबदबा असल्याचं बोललं जातंय.तसेच डॅडी अर्थात अरुण गवळीचीही बोलबाला आहे..

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाला दाऊदने धर्मचा रंग दिला...आणि तेथूनच डी कंपनीत फूटीला सुरुवात झाली..डी कंपनी,गवळी गँग,छोटा राजन यांच्यात संघर्ष पेटला..या अंडरवर्ल्ड टोळ्यांनी एक प्रकारे तुरुंगही वाटून घेतले आहेत.. ५७ एकरात उभारण्यात आलेल्या तळोजा तुरुंगात डी कंपनीला स्थान नसल्याचं २००८मध्ये उघड झालं होतं..

या तुरुंगात अरुण गवळीची रवानगी करण्यात आली होती...गवळी टोळीशी वैर घेणा-यांना त्याची किंमत चुकवावी लागलीय़..भायखळ्यातील दगडी चाळी राहणा-या गवळीने गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकलं आणि पुढे अंडरवर्ल्डमध्ये वेगळ स्थान निर्माण केलं...खून,खंडणी,अपहरणाचे आरोप गवळीवर झाले..पण साक्षी-पुराव्या अभावी त्यातून गवळीची सुटका झाली..पण जामसांडेकर खूनप्रकरणी अरुण गवळी चांगलाच अडकलाय..त्या प्रकरणात अरुण गवळी गजाआड असून सध्या तो तळोजा तुरुंगात आहे..

जेव्हा सालेमवर अर्थररोड तुरुंगात मुस्तफाने हल्ला केला तेव्हा सालेमने तळोजा तुरुंगात आश्रय घेतला...तळोजा तुरुंगात गवळी आणि सालेमचं वर्चस्व असल्याचं बोललं जातंय..

तळोजा तुरुंगात केवळ गवळी आणि सालेम हे दोघेच नाही तर डी कंपनीची विरोधक शरद मोहोळही इथच आहे..इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी सिद्दीकीच्या खूनाचा आरोप
आहे..तळोजा तुरुंगात दाऊद विरोधी गुंडांचा भरणा आहे..दाऊदचा वैरी छोटा राजनचे हस्तकही याच तुरुंगात आहेत..

भारताचा मोस्ट वॉण्टेड डॉन आज पाकिस्तानमध्ये आहे हे संपूर्ण जग जाणतं..भारत सोडून दाऊदला 20 वर्षं झालीत पण तरीही भारतात होणा-या प्रत्येक मोठ्या गुन्ह्याची लींक अखेर डी कंपनी पर्यंत जाऊनच का पोहोचते? पाकिस्तानमध्ये राहून भारतात त्याच्या कारवाया कोणत्या अड्ड्यांमार्फत होतात याचाच हा खुलासा...तुम्हाला थक्क करुन सोडल....

आयपीएलमधील फिक्सिंग प्रकरण आणि संजय दत्तच्या जेल जाण्यामागे एक कॉमन कनेक्शन आहे आणि ते म्हणजे अंडरवर्ल्ड..आणि हे आर्थर रोड जेल...होय आर्थर रोड तुरुंग... हे तेच तुरुंग आहे जे मायानगरी मुंबईच्या भायखळा आणि नागपाडापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.. नागपाडा हा तोच एरिया आहे ज्या एरियातून मुंबईचा एक साधा मुलगा गुन्हेगारीच्या जगात उतरला आणि आंतरराष्ट्रीय आंतकचा बादशाह दाऊद इब्राहिम कास्कर बनला....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 29, 2013, 00:00


comments powered by Disqus