गुडबाय २०१२- स्पोर्ट्स बार Goodbye 2012- Sports bar

गुडबाय २०१२- स्पोर्ट्स बार

गुडबाय २०१२- स्पोर्ट्स बार
www.24taas.com, मुंबई

2012चं क्रीडा क्षेत्राचा वेध घेताना सर्वात अगोदर लक्षात येतं ऑलिम्पिक... 2012मध्ये क्रिकेटमध्ये भारताची सुमार कामगिरी झाली असली तरी ऑलिम्पिकमध्ये भारतानं मोठी झेप घेतली.... भारतानं ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी करताना 6 मेडल्सची कमाई केली...

ऑलिम्पिक... खेळांचा महाकुंभ... जगभरातील देशांना आपली सत्ता आणि ताकद दाखवण्याची चार वर्षातून मिळणारी एक संधी .2012मध्ये 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान लंडनमध्ये जगातील सर्व दिग्गज प्लेअर्स आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मैदानात दिसले...एकविसाव्या शतकात जगासमोर महासत्ता बनून उभ्या ठकलेल्या भारतानेही ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीत लक्षणीय प्रगती केली लंडन ऑलिम्पिकपूर्वीच्या कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये एखाद्या मेडलची कमाई जरी झाली तरी ते विशेष मानलं जातं. मात्र, लंडनमध्ये भारतीय योद्धांनी जगाला आपली ताकद दाखवली.भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात रेकॉर्ड तोड सहा मेडल्सची कमाई केलीय.

मेडलचा श्रीगणेशा केला शूटर गगन नारंगने. 10 मीटर एअर रायफल प्रकारात गगनने ब्राँझ मेडलची कमाई केली आणि भारताचं खातं उघडल. त्यानं 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतालं लंडनमधील पहिलं मेडल मिळवून दिलं. नारंगनंतर आर्मी मॅन विजय कुमारनंही मेडलचा वेध घेतला. त्यानं 25 मीटर रॅपीड फायर पिस्तुल प्रकारात कमाल करत सिल्व्हर मेडलवर आपलं नाव कोरलं.

शूटर्सनंतर भारताला सर्वाधिक अपेक्षा होत्या त्या फुलराणी सायना नेहवालकडून... सायना नेहवालनं चीनी ड्रॅगनच्या मक्तेदारीला जोरदार टक्कर दिली. लंडनमध्ये ब्राँझची कमाई करत सायनाने आपल्या बरोबरच कोट्यावधी भारतीयांचही स्वप्न पूर्ण केलं.

सायनाच्या मेडलनंतर भारत बीजिंगपेक्षा सरस कामगिरी करणार हे निश्चित झालं होतं. कारण मेरी कोमनं बॉक्सिंगची सेमी फायनल गाठली होती. ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंग पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय महिलांच्या मनगटाची ताकद मेरीनं जगाला करुन दिली. मेरीनं भारताला अजून एका ब्राँझ मेडलची कमाई करुन दिली.

कुस्तीमध्ये भारतानं दोन मेडल मिळवले..60 किलो फ्रिस्टाईलमध्ये योगेश्वर दत्तने जबरदस्त कामगिरी करताना भारतला अजून एक ब्राँझ मेडल मिळवून दिलं.तर लढवय्या सुशीलकुमारनं भारताला दुसरं सिल्व्हर मिळवताना भारताला सहावं मेडल मिळवून दिलं. भारताचं लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करणारा आणि दोन्हीही ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मेडलची कमाई करणारा सुशील कुमार पहिला आणि एकमेव भारतीय ठरला.

लंडन ऑलिम्पिक गाजवलं ते जमैकनं स्प्रिंटर उसेन बोल्टनं....पुन्हा एकदा पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान मानव होण्याचा पराक्रम त्यानं केलाच शिवाय 200 मीटर शर्यत जिंकताना त्यानंतर 4 इनटू 100 मीटर रिले नव्या विक्रमासह गोल्ड मेडल पटकावताना त्यानं लंडन ऑलिम्पिक गोल्डन हॅट्ट्रिक साधली.

मायकल फेल्प्सनं करिअरच्या तिस-या ऑलिम्पिकमध्ये मेडल्सची घौडदैड कायम राखली.लंडनमध्ये 4 गोल्ड आणि 2 सिल्व्ह मेडल्सची कमाई करताना ऑलिम्पिकमध्ये तब्बल 22 मेडल्सची पटकावण्याचा अजेय विश्वविक्रम केला..यात 18 गोल्ड 2 सिल्व्हर आणि 2 ब्राँझचा समावेश आहे....

ऑलिम्पिकच्या इतिहासात लंडन ऑलिम्पिक हे भारतासाठी सर्वात यशस्वी आणि प्रेरकही ठरलं. बीजिंगच्या तुलनेत मेडलचा आकडा दुप्पट असला तरी भारताच्या लोकसंख्याच्या तुलनेत हे यश फारच मर्यादीत आहे. अगदी 1 लाख लोकसंख्या असलेला जगाच्या नकाशावर टिंबसारख्या दिसणा-या ग्रेनेडासारखा देशानं गोल्ड मिळवलं तर 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला मात्र गोल्डशिवाय परतावं लागलं..एकीकेड अमेरिका, चीन, रशिया, ग्रेट ब्रिटनं या विकसीत देशांनी मेडल्सचा वर्षाव केला तर महासत्ता होण्यासाठीचा दावा करणाऱ्या भारताचं सुवर्णस्वप्न मात्र अपूर्णच राहिलं. गेल्या ऑलिम्पिकच्या तुलनेत लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीयांनी आपल्या कामगिरीत नक्कीच सुधारणा केलीय. मात्र, आपल्याला अजून बरिच मेहनत करावी लागणार आहे.

भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये तिरंगा डौलानं फडकावला.. मात्र वर्षाअखेरीस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीनं आयओएवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे भारताची नाचक्की झालीच....तर चेसमध्ये विश्वनाथ आनंद आणि आर्चरीमध्ये दिपिका कुमारीनं वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम केला...

1. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीच्या नियमांचं उल्लंघव केल्यामुळे भारतीय ऑलिंपिक असोसिएशनवर निलंबनाची कारवाई याचवर्षी ओढवली. जोपर्यंत आयओसीच्या नियमांनुसार आयओए निवडणूक घेणार नाही तोपर्यंत निलंबनाची कारवाई कायम जागतिक स्तरावर चांगलीच नाचक्की झाली.

2. विश्वनाथन आनंदने 2012 मध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशीपचं अजिंक्यपद पटकावलं आणि आपण 64 घरांचा राजा असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं. इस्त्राईलच्या बोरीस गेलफंडवर मात करत वर्ल्ड चेस चॅम्पियनशीपवर आपलं नाव कोरलं. आनंदनं पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली.

3. दीपिका कुमारीने वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये बाजी मारत वुमेन्स रिकर्व्ह आर्चरीमध्ये नंब वन स्थान पटकावलं. दीपिका कुमारीनं अव्वल स्थानावर विराजमान होत इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये तिला आपली छाप सोडता आली नाही मात्र, आर्चरीच्या दुनियेत आपली वेगळी ओळख निर्माण केली अस म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही.

लिओनेल मेसीचा रेकॉर्डब्रेक गोल धडाका, लान्स ऑर्मस्ट्राँगचा अस्त, जोकोविचचा नव्यानं उदय, सेरेनाचं कमबॅक, बोल्टचं वर्चस्व, मायकल फेल्प्सचा अलविदा, एफवनच्या दुनियेत पुन्हा बेबी शुमी अर्थातच व्हेटलचा जलवा आणि स्पेनचं सलग दुस-यांदा युरो कपचं विजेतेपद हे सार काही घडलं 2012 या वर्षात.

1. उसेन बोल्टने पुन्हा एकदा आपणच जगातील सर्वाधिक वेगवान धावपटू असल्याचं सिद्ध केलं. उसेन लायटनिंग बोल्टनं लंडन ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरमध्ये 9.63 सेकंदाच्या नव्या ऑलिम्पिक रेकॉर्डसह गोल्ड मेडलची कमाई केली. तर 200 मीटरमध्येही त्यानं पुन्हा एकदा गोल्ड मेडलवर आपाला हक्क प्रस्थापित केला. याचबरोबर 4 बाय100 मीटर रिलेमध्येही गोल्ड मेडलची कमाई बोल्टनं केली. ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरमध्ये कार्ल लुईसनंतर सलग दुस-यांदा गोल्ड मेडल मिळवण्याची किमया बोल्टने केली. त्याचप्रमाणे या सीझनमध्ये सर्वोत्तम ऍथलिटचा पुरस्कारही बोल्टनेच पटकावला.

2. बार्सिलोना आणि अर्जेन्टीनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेसीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. मेसीने एका वर्षात सर्वाधिक गोल करण्याचा जर्मनीच्या गेर्ड म्युलर यांचा विक्रम मोडित काढला आहे. म्युलर यांनी 1972-73 साली 85 गोल करत इतिहास रचला होता. मेसीने आपल्या भन्नाट खेळानं हा रेकॉर्ड करत आपल्या नावावर नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. फुटबॉलमध्य़े सध्या त्याचाच जलवा आहे. 2012 फुटबॉल सीझन ख-याअर्थानं मेसीचा सीझन ठरला असं म्हटलं तर काहीच वावग ठरणार नाही.

3. पोलंड आणि युक्रेनमध्ये आयोजित केलेल्या युरो 2012चे विजेतेपद स्पनने पटकावले. इटलीला 4-0ने असं पराभूत करत स्पनने युरो कपवर नाव कोरले. युरो कपचे सलग दुस-यांदा आणि सलग तीन महत्त्वाच्या टूर्नामेंटमध्ये विजयी पटकावण्याचा मान मिळवणारी स्पेन ही पहिली टीम ठरली. एकूण 16 देशांनी सहभाग घेतलेल्या या टूर्नामेंटला सर्वाधिक 14 लाखांहून अधिक फुटबॉलप्रेमींनी विक्रमी हजेरी लावली.

4 . लान्स आर्मस्ट्राँगसाठी 2012 हे वर्ष कटू ठरले. डोपिंगमध्ये पॉझिटीव्ह आढळल्यामुळे इंटरनॅशनल सायकलिंग युनियनने आर्मस्ट्राँगवर आजीवन बंदी तर लादलीच याचबरोबर त्याची सर्वच्या सर्व विजेतेपदही काढून घेतली. टूर दी फ्रान्सचे सलग सातवेळा विजेतेपद पटकावलेल्या आर्मस्ट्राँगला सातही विजेतेपद परत करावी लागली. याशिवाय 2000 मधील ब्राँझ मेडल आणि इतर अवॉर्डसही त्याला परत करावे लागले. लढवय्या म्हणून ओळखल्या जाणा-या आर्मस्ट्राँगवर अशी नामुष्की ओढवली की त्याचं सार करियरच संपुष्टात आल.

5. सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचनं सलग दुस-या वर्षी आपल अव्वल स्थान कायम राखलय. यावर्षी त्यानं रॉजर फेडरर आणि राफाएल नादाल या दिग्गज टेनिसपटूंना धूळ चारत अव्वल स्थान काबिज केल. जोकोविचनं 2012 सीझनची सुरूवात ऑस्ट्रेलिया ओपनचं विजेतेपद पटकावून केली. विशेष म्हणजे राफाएल नादालला पराभूत करत जोकोविचने हे विजेतेपद पटकावल. तर फ्रेंच ओपनमध्ये त्यानं रॉजर फेडररला पराभूत करत आपल्या करिअरमधील चारही ग्रँडस्लॅमला गवसणी घातली.

6. फ्लाईंग फिश या बिरूदावलीने ओळखला जाणारा अमेरिकेचा स्टार स्विमर माइकल फेल्प्सने यावर्षी स्विमिंगला अलविदा केला. मात्र, तत्पूर्वी त्याने लंडन ऑलिम्पिकमध्ये चार गोल्ड आणि दोन सिल्व्हर मेडल्सची कमाई केली. यावर्षी त्याने सर्वाधिक ऑलिम्पिक मेडल्स जिंकण्याचा रेकॉर्डही प्रस्थापित केला. त्याने करियरमध्ये 18 गोल्डसहित एकूण 22 मेडल्सची कमाई केली आहे.

2011 मध्ये टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकत जगज्जेतेपदाचा मान पटकावला. मात्र, धोनीची टीम ज्या वेगाने वर्ल्ड चॅम्पियन झाली त्याच वेगाने 2012 मध्ये टेस्ट, वन-डे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय टीमला सपाटून मार खावा लागला. 2012 क्रिकेटच्या सीझनमध्ये टीम इंडिया शिखरावरून थेट पायथ्याशी आली.

2011 क्रिकेट सीझन भारतीय टीमने चांगलाच गाजवला. मात्र, 2012 चा क्रिकेट सीझन टीम इंडियासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला. 2012 ची टीम इंडियाची सुरुवात झाली ती पराभवानेच. ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीमला मानहानिकाराक सीरिज पराभवाला सामोर जाव लागलं. वर्षाच्या अखेरपर्यंत टीम इंडियाची पराभवाची मालिका कायम होती.

2012 भारतीय टीमला तब्बल नऊ टेस्ट मॅचेसमध्ये 5 पराभवालासमोरं जावं लागलं. फक्त 3 टेस्टमध्ये टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश आलं. 16 वन-डेत 9 विजय आणि सहा पराभवांना सामोर जाव लागलं. एक वन-डे टाय झालीत. तर इंग्लंडविरुद्धच्या सीरिजपर्यंत झालेल्या बारा टी-20 मॅचेसमध्ये टीम इंडियानं 7 मॅचमध्ये बाजी मारली. तर पाच मॅचेसमध्ये भारताला पराभव सहन करावा लागला.

2012 च्या क्रिकेट सीझमध्ये लंकेवरुद्धची सीरिज विजय सोडला तर टीम इंडियाला एकही मेजर टुर्नामेंट्स जिंकता आली नाही. त्याचप्रमाणे टेस्टमध्येही भारतीय टीमने निराशाच केली. एकीकडे 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय जगतावर भारतानं क्रिकेटविश्वार राज्य केलं होतं. मात्र 2012 सीझनमध्ये टीम इंडियाला आपली वर्ल्ड चॅम्पियन ही बिरुदावली कायम राखता आली नाही.

राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, रिकी पॉन्टिंग,मार्क बाऊचर, ऍन्ड्र्यु स्ट्रॉस आणि ब्रेट ली या क्रिकेटपटूंनी 2012मध्ये क्रिकेटला अलविदा केला.मात्र वर्षाअखेरीस मास्टर-ब्लास्टरनं सचिननं वनडेतून घेतलेली एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली...

महासेंच्युरीनंतर नऊ महिन्यातच वनडेतून सचिननं घेतलेली निवृत्ती हीच 2012मधील क्रिकेट जगतातील सर्वात मोठी घटना.. क्रिकेटमध्ये 2012 हे वर्ष ख-या अर्थानं रिटायरमेंटचच वर्ष ठरलं... वर्षाअखेरीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वनडे निवृत्ती घेतली...त्यापूर्वी माजी ऑस्ट्रेलियन कॅप्टन रीकी पॉन्टिंग , व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड .. ऍन्ड्र्यु स्ट्रॉस या दिग्गज प्लेअर्सनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केलं....याशिवाय मार्क बाऊचर आणि ब्रेट लीसारख्या अव्वल प्लेअर्सहीनी यावर्षीच क्रिकेटला अलविदा केलं....मात्र 2012मध्ये सर्वाधिक चर्चा राहिली ती सचिनच्या निवृत्तीची...यावर्षाच्या सुरुवातीला सचिनच्या महासेंच्युरीची प्रतिक्षा कधी संपणार याची तर त्यानंतर आऊट ऑफ फॉर्म असलेला सचिन कधी निवृत्ती होणार या चर्चांना क्रिकेटविश्वात ऊत आला होता...मास्टर-ब्लास्टरनं महासेंच्युरीची प्रतिक्षा मार्चमध्येच संपवली ...

अनेक विक्रमांचा आणि सेंच्युरींचा मालक असलेल्या सचिनने सेंच्युरींची सेंच्युरी झळकावली आणि हा क्षण इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. ढाक्याच्या स्टेडियमवर बांग्लादेशविरूद्धच्या वन-डे मॅचमध्ये सचिनने सेंच्युरींची सेंच्युरी झळकावून तमाम देशवासियांची मान अभिमानाने उंचावली.... त्यानंतर मात्र सचिनच्या बॅटमधून रन्सचा ओघ थांबला... त्यामुळे सचिनच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला. तब्बल 23 वर्ष आंतराराष्ट्रीय वनडे क्रिकेट गाजवणा-या सचिनची एक्झिट क्रिकेट चाहत्यांना चटका लावणारी...

First Published: Wednesday, December 26, 2012, 23:35


comments powered by Disqus