गुगल बॉय विरुद्ध गुगल गर्ल... एक सामना! Google boy meets Google girl: Kautilya and Meghali together!

गुगल बॉय विरुद्ध गुगल गर्ल... एक सामना!

गुगल बॉय विरुद्ध गुगल गर्ल... एक सामना!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातल्या कोहंड गावचा सहा वर्षाचा कौटिल्य अद्वितिय बुद्धीमत्तेचा धनी आहे. याआधी पाहिला आहेत. आता तर अशीच क्षमता असलेली मेघाली आहे. यांच्यातील हुशारीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो.

कौटिल्य देश-परदेशातल्या भूगोल आणि सामान्य ज्ञानाविषयी इतकी भराभर माहिती देतो की ऐकणाराच थक्क होऊन जाईल. कौटिल्यप्रमाणे मेघालीही अशीच माहिती देते. तिची उत्तर तोंडपाठ आहेत. कोणत्याही प्रश्नाचे उचूक उत्तर देते.

कौटिल्य चिमुरड्याचं वय फक्त पाच वर्ष दहा महिने इतकं आहे. मात्र तुम्ही त्याला कोणताही प्रश्न विचारा त्याचं उत्तर तो लगेच देतो. कौटिल्यला जगातल्या अनेक देशांची माहिती अगदी तोंडपाठ आहे. तर मेघाली ही कौटिल्यपेत्रा एका वर्षांनी मोठी आहे. या दोघांच्या हुशारीनं त्याचं कुटुंबही हैराण आहे.

ओडिशामधील भुवनेश्वरमधील सात वर्षांची मेघाली मलबिका अद्वितिय बुद्धीमत्तेची धनी आहे. तिचे मित्र-मैत्रिणी तिला सुपर कॉम्प्युटर असंही बोलतात. तिच्या हुशारीने सर्वजण बोटात तोंड घालतात. ती भूगोलमध्ये माहीर आहे. जगातील सर्व देशांची नावे मेघालीच्या तोंडी आहेत.

या दोघांच्या बुद्धीमत्तेचा सामना झी न्यूजवर पाहायला मिळाला.

आता गुगल गर्ल्स




गुगल बॉय आणि गुगल गर्ल्स सामना




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 26, 2013, 10:07


comments powered by Disqus