Last Updated: Friday, November 9, 2012, 23:58
www.24taas.com, मुंबईदुसऱ्या महायुद्धात जर्मनीने घेतला तिचा धसका !
इंग्लंड आणि फ्रान्सवर केलेत तिने उपकार !
हेरगिरीच्या जगात ती ठरलीय अद्वितीय !
भारतीय वंशाच्या कन्येनं रचला इतिहास !
गुप्तहेर राजकुमारी
नूर कहानी मोठी रंजक आणि थरारक अशीच आहे...एक सुंदर राजकुमारी नाझी सैन्याला पाण्यात दिसत होती..तिचा शोध घेण्यासाठी नाझींन जंगजंग पछाडलं होतं...सगळी गुप्तचर यंत्रणा त्यांनी कामाला लावली होती.. दुस-या महायुद्धाच्या शेवटीच्या टप्प्यात डकाऊ छळछावणीत एक अत्यंत सुंदर राजकुमारी अक्षरश: हडांचा सापळा बनली होती..तिचे हात-पाय लोखंडी साखळदंडांत जखडण्यात आले होते..क़डेकोट पहा-यातून तिने दोन वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.. त्यामुळे जर्मन लोकांसाठी ती धोकादायक ठरली होती...तिच्या धाडसी स्वभावामुळेच जर्मन लोकांनी तिच्यावर जराही दया दाखवली नाही.. आणि सप्टेंबर १९४४ रोजी तिला डकाऊ छळछावणीत गोळी घालून ठार करण्यात आलं.... जर्मनीला जिची भीती वाटत होती....ब्रिटन आणि फ्रान्सवर जिचे उपकार आहेत ....त्या अत्यंत सुंदर भारतीय राजकुमारीचं नावं होतं नूर इनायत खान....भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देणा-या नूरने नाझींच्या क्रौर्या विरोधात ब्रिटिशांसाठी हेरगीरी केलीय.. शौर्य आणि चातुर्यामुळेच जॉर्ज क्रॉस हा ब्रिटनमधील सर्वोच्च नगरिक सन्मान तिला प्रदान करण्यात आलाय..दुस-या महाय़ुद्धात अतुलनिय कामगिरी करणा-या तीन महिलांपैकी नूर एक होती..केवळ ब्रिटनच नाही तर फ्रन्सनेही भारताच्या या शूर कन्येला क्रोक्स डी गोल्ड स्टार हा सन्मान दिलाय.. जर्मन छळछावणीत जेव्हा नूरला गोळी मारली गेली तेव्हा ती अवघ्या ३० वर्षाची होती..
पण एव्हड्य़ा कमी वयातही तिने खूप मोठी कामरिगी केलीय.. नूर १३ वर्षाची असतांना पित्याचं छत्र हरपलं..१९२७ला तिचे वडिल हजरत इनायत खान यांच भारतात निधन झालं..खरं तर ते आपले खापर पंजोबा टीपू सुल्तान यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हैसूरला आले होते.... होय..... नूर काही सामान्य भारतीय मुलगी नव्हती...तर १८ व्या शतकातील म्हैसूरचा बादशाह टीपू सुल्तानची वंशज होती....ऐकेकाळी टीपू सुल्तानने ब्रिटिशांना पळो की पळो करुन सोडलं होतं..दुस-या महायुद्धात नूरने जे शौर्य गाजवलंय त्याचा वारसा तिला टीपू सूल्तानकडूनच मिळाला होता.... आणि याच कारणामुळेच इंग्रजांसाठी हेरगिरी करुनही नूरने भारतातील इंग्रजांच्या सत्तेला खुलआमपणे विरोध केला होता.. जेव्हा नूरची ब्रिटनच्या हवाई दलात सहाय्यक म्हणून निवड झाली तेव्हा मुलाखती दरम्यान तिने जे काही सांगितलं ते ऐकून मुलाखत घेणारा अधिकारी चकीत झाला होता... `दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मी भारतात जाऊन ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी होईन`
नूरच्या या हिंमतीमुळेच तिला नाझींच्या ताब्यात असलेल्या फ्रान्समध्ये तिला हेरगिरी करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं..महायुद्धाला आज ६७ वर्ष उलटून गेल्यानंतर लंडनमध्ये नूरच्या स्मरणार्थ एक स्मारक बनवण्यात आलंय..ज्या ठिकाणी नूरने आपल्या आयुष्यतील सर्वाधिक काळ घालवला तिथं हे स्मारक उभारण्यात आलंय.. नूर - उन- निशा- इनायत खान... भारतीय वंशाच्या या राजकुमारीने जे शौर्य गाजवलंय ते इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलंय...जगातील धाडसी महिला गुप्तहेरांमध्ये तिच्या नावाचा समावेश आहे.. आपल्याला गुप्तहेर म्हणून काम करण्याची संधी मिळेल याची नूरनेही कल्पना केली नव्हती..पण नशिबानं तिला हेरगिरीच्या जगतात खेचून आणलं ... सकाळ होण्यापूर्वीच नाझींच्या ताब्यात असलेल्या फ्रान्समध्ये आरएएफचं एक विमान गुपचुपपणे उतरलं..त्या विमानात नूर इनायत खानही होती...पॅरिसमध्ये तिला वायरलेस ऑपरेटरची जबाबदारी सांभाळायची होती...

ही जबाबदारी म्हणजे फ्रान्समधील अत्यंत महत्वाचं आणि सर्वात धोकादायक पद ! त्यावेळी समजलं जात असे.. आणि ते शब्दश: खरं होतं...जेव्हा ब्रिटनटच्या नॅशनल आर्काईव्हने दुस-या महायुद्धातील गुप्तचर संस्थाच्या स्पेशल ऑपरेशन एक्झीक्यूटिव्ह अर्थात एसओईच्या गोपनिय फाईल्स उघड केल्या तेव्हा ही बाब समोर आली...नूरने केलेल्या कामगिरीतील किती धोकादायक होती याचा उलगडा त्या फाईलमधून झालायं..एप्रिल १९४२ मध्ये ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांच्यासाठी एसओईने एफ - सेक्शनमध्ये ३७ हेर महिलांची भरती केली होती..नूर त्यांच्यापैकी एक होती.. ती केवळ प्रशिक्षित वायरलेस ऑपरेटरच नव्हती तर तिचं लहानपण फ्रान्समध्ये गेलं होतं..तिला फ्रान्सची सखोल माहिती होती.. नूरचे पिता हे टीपू सुलतान यांचे वंशज होते..पण त्यांनी सुफी संगितासाठी आपलं आयुष्य वेचलं...हजरत इनायत खान यांनी एका नव्या परंपरेला जन्म घातला..सुफी संगित जगभरात पोहचवण्याच्या उद्देशातून त्यांनी १९१०मध्ये भारत सोडला..मृत्यूपूर्वी एक आधी ते पुन्हा भारतात परतले होते..
पण नूर आणि तिची आई फ्रान्समध्ये राहिल्य़ा... नूरचा जन्म रशियात झाला ..तिच्या आईचं नाव नोरा ओ बेकर असून ती अमेरिकेची नागरीक होती... नूरचे पिता हजरत इनायत खान हे रशियात सूफी संगिताच्या प्रसारासाठी गेले होते..१९२०मध्ये नूरचं कुटुंब फ्रान्सला रवाना झालं...तिथ नूरने चाईल्ड सायकोलॉजीचं शिक्षण घेतलं..पण तिला संगिताची आव़ड होती..पुढे नूर लहान मुलांसाठी कवीता आणि २० जाकत कथा नावाने बौद्ध कथांचं एक पुस्तक लिहिलं...त्या कथा आजही इंटरनेटवर पहायला मिळतात... नूरच्या आयुष्याने पुढे वेगळचं वळण घेतलं..... १० मे १९४० ला हिटलरच्य़ा नाझी सैन्यांने युरोपावर हल्ला चढवला होता...१४ जून ला पॅरिसवर ताबा मिळवला..नूरच्या कुटुंबाकडं ब्रिटीश पासपोर्ट होता..त्यामुळे ते समुद्रमार्गाने ब्रिटनला रवाना झाले..
त्याच काळात नूरने विमेन्स ऑक्जिलरी एअरफोर्स मध्ये कमीनश प्राप्त केलं होतं..तिला वायरलेस ऑपरेटरचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं..त्यानंतर दोन वर्षांनी इंटरसर्विसेस रिसर्च ब्युरोमध्ये तिला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं..ग्राफिक्स इन -एजंट इन फिल्ड आफ्टर ट्रेनिंग ग्राफिक्स आऊट - असं त्या अर्जामध्ये लिहिण्यात आलं होतं...या कामामध्ये तुझ्या जिवाताला धोका होवू शकतो याची तुला जाणीव आहे का ? असं जेव्हा तिला मुलाखतीत विचारण्यात आलं तेव्हा नूरनं उत्तर दिलं...होय.....त्यानंतर पुढचे तीन महिने नूरला विविध प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं.. हेरगिरीसाठी मोहिमेवर पाठवितांना नूरला एक बनावट नाव देण्यात आलं होतं...तिचं नाव होतं... जीन मेरी रिने... तर वायरलेस मेसेजसाठी तिला सांकेतीक नाव देण्यात आलं होतं नर्स....या मोहिमेत नूरचं सांकेतीक नाव होतं मॅडलिन... त्यानंतर बुश हाऊसमधून चालविण्यात येणा-या बीबीसीच्या फ्रेंच सर्व्हिसेसच्या रेडिओ नाटकांमधून एक संकेतीक संदेश प्रसारीत करण्यात आला तो संदेश होता... मॅडलिन येत आहे...... फ्रान्समध्ये मॅडलिनच्या स्वागताची तयारी जोरात होती..पण तिचं स्वागत करण्यासाठी अशी व्यक्ती पोहचली जे शत्रूंना फितूर झाली होती...
First Published: Friday, November 9, 2012, 23:58