हिरोईन ४२० Heroine 420

हिरोईन ४२०

हिरोईन ४२०
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आलीकडचं तिने टॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि काही काळातच ती यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचली. तिला दक्षिणेतल्या चित्रपचटात चांगल्या भूमिका मिळू लागल्या....पण आता ती पोलीस कोठडीत जावून पोहचलीय...पण नेमकं असं काय घडलं अभिनेत्री लीनाच्या बाबतीत ज्यामुळे तिला थेट पोलीस कोठडीत जावं लागलं ते....

लाईट्स...कॅमेरा...एक्शन...च्या दुनियेतील एक सुंदर चेहेरा...या चेह-यावर जीव ओवाळून टाकणा-यांची संख्या काही कमी नाही...रुपेरी पडद्यावर तिची एन्ट्री होताच थिअटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो...

ग्लॅमरच्या दुनियेत मोठी प्रसिद्धी मिळवलीय..पण आता या सुंदर चेह-यावरचा मेकअप उतरला असून तिचा खरा चेहरा जगासमोर आलाय..एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केली फसवणूक ...फसवणूक प्रकरणी अभिनेत्री गजाआड...

ज्या सुंदर चेह-याविषयी सिनेरसिकांमध्ये नेहमीच चर्चा होत असे ,त्या अभिनेत्रीचं नाव आता गुन्हेगारांच्या यादीत नोंदलं गेलंय..दक्षिण भारतातील सिनेसृष्टीत काम करणारी ही अभिनेत्री लवकरच बॉलीवूडमध्ये जॉन इब्राहमसोबत एका हिंदी सिनेमात झळकणार होती...पण आता तिच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आलीय..तिला दिल्ली पोलिसानी अटक केलीय..

प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या लीना मॉरिया या अभिनेत्रीला फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय..ती दिल्लीतील एका फार्महाऊसवर लपून बसली होती..पण तिच्यावर लपण्य़ाची वेळ का आली हे आपण पहणार आहोत..मात्र त्यापूर्वी तिने गुन्हेगारीचा मार्ग का निवडला यावर नजर टाकणार आहोत..महागड्या कार्स खरेदी करण्याचा तिला छंद होता..

रॉल्स रॉयस जिची किंमत जवळपास 3 कोटी आहे...ऑस्टिन मॉर्टिन जिची किंमत जवळपास 1.50 कोटी

हमर जिची किंमत जवळपास 1.50 ते 2 कोटीच्या घरात आहे...

ऑडी Q7 जिची किंमत जवळपास 70 लाख रुपये आहे

अशा आलिशान 9 कार्स फसवणूक करुन लीनाने मिळवल्या होत्या..

२५ वर्षीय लीना या आलिशान कार्सचा ताफा घेऊन दिल्लीतल्या याच फार्महाऊसमध्ये लपून बसली होती..तिच्यासोबत तिचा मित्रही इथंच होता..पण पोलिसांची अनेक दिवसांपासून या फार्महाऊसवर नजर होती..कारण या अभिनेत्रीच्या अटकेनंतर फसवणूकीच्या गुन्हांची एक मालिकाच उघड होणार होती आणि त्यासाठी पोलिसांना ठोस पुराव्यांची गरज होती..

25 वर्षीय लीनाने मॉडेलिंग केलं तसेच काही मोठ्या चित्रपटातून भूमिकाही साकारल्या त्यामुळे तिला पैसा आणि प्रसिद्धी मिळाली..पण असं असतानाही लीना गुन्हेगारीकडं का वळली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...रुपेरी पडद्यावरची हिरोईन आणि तिचा मित्र या दोघांनी कशा पद्धतीने लोकांना गंडा घातला त्याची ही कहाणी..

लीनाने या ग्लॅमरच्या दुनियेत दोन वर्षापूर्वी पाऊल ठेवलं होतं..खरंतर हे विश्वचं वेगळं असून इथ येण्याची प्रत्येकालाच इच्छा असते..२५ वर्षीय लीनाने

हजबंड इन गोवा

कोबरा

रेड चिली

या चित्रपटातून काम केले तसेच

मद्रास कॅफे

या बॉलीवूडपटात महत्वाची भूमिका ती काम करतेय..

या ग्लॅंमरच्या दुनियेत काम करत असतांना तिच्या गरजा वाढल्या होत्या..ऐशोआरामात राहण्याची तिला सवय लागली होती..आणि त्यामुळेच तिने आपला मार्ग बदलला..तिनं असं काही स्क्रिप्ट निवडलं जिथ बेसुमार पैसाही आहे आणि बदनामीही... या फिल्मचा हिरो होता चंद्रेशखर आणि हिरोईन लीना..

लीनाचा ब्वॉयफ्रेंड चंद्रशेखर आपण IAS असल्याचं सांगत असे, मोठा प्रोजेक्ट मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने लोकांकडून कोट्यवधी उकळले. एका शहरात लोकांना गंडा घातल्यानंतर लीना आणि चंद्रशेखर हे दुस-या शहरात जात असतं..या दोघांनी एक बनावट फर्म सुरु करुन त्यानावे १९ कोटी रुपयांचं कर्जही घेतलं आणि त्यानंतर ते दोघे तेथून पसार झाले...

याप्रकरणी लीना आणि चंद्रशेखर विरुद्ध दोन तक्रारी दाखल झाल्या आणि त्यानंतर फर्मचा व्यवस्थापक ,त्याची पत्नी,त्यांना कर्ज मिळवून देण्यात मदत करणा-या बँक व्यवस्थापकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी लीनाला जेरबंद केलं

अब्जावधी रुपयांची फसवणूक केल्यानंतर हे दोघे दिल्लीत दाखल झाले होते..ते इथं नवीन सावज शोधत होते..त्यासाठी त्यांनी दिल्लीत भाड्याने एक फार्म हाऊस घेतला होता..फार्महाऊसचं भाडं महिन्याला चार लाख रुपये इतकं होतं...याच फार्म हाऊससमोर तिच्या त्या अलिशान कार्सचा ताफाही उभा होता..या कार्समधून ती लोकांना भेटण्यासाठी जात असे..त्यामुळेच समोरच्या व्यक्तीवर लीना आणि तिच्या मित्राचा प्रभाव पडत असे...एकदा का व्यक्ति त्यांच्या जाळ्यात अडकली की ती कंगाल झालीच म्हणून समजा..अशाच पद्धतीने या दोघांनी अनेकांना गंडा घातल्याचं पोलिसांनी सांगितलंय..

१९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या या हिरोईनने अनेकांना गंडा घातला असल्याचा पोलिसांना संशय आहे तसेच त्यांच्या या फसवणूकीचा आकडा अब्जावधीच्या घरात असल्याचं बोललं जातंय..

बॉलीवूड...एक स्वप्न नगरी....

जिथं ग्लॅमर आहे......प्रसिद्धी... आहे...

दक्षिण भारतातील सिनेसृष्टी टॉलीवूडमध्ये लीनाने दोन वर्षात चांगलाच जम बसवला होता.त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं होतं..

मद्रास कॅफे चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाय रोवण्याचा तिचा प्रयत्न होता , या चित्रपटात जॉन अब्राहम सोबत ती काम करत होती

दिल्लीतल्या फतेहपूर बेरी परिसरातील या फार्महाऊसमध्ये रहात असलेल्या लीनाला जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला..कारण लीना या फार्म हाऊसमध्ये आपल्या ब्व़ॉयफ्रेंडसोबत रहात होती..तसेच तिच्या सुरक्षेसाठी सहा बाऊंसर्सही होती...लीनाच्या अटकेनंतर तिच्याविषयी एकएक माहिती उघड होवू लागली..रॅम्प ते रिल पर्यंतचा तिचा प्रवास तसा फार जुना नाही नाही..पण मोठ्या अभिनेत्रींप्रमाणे राहण्याच्या हव्यासापायी तिने फसवणूकीचा मार्ग निवडला..पोलिसांनी लीनाला १९ कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी अटक केलीय..

लीना आणि तिचा ब्वॉयफ्रेंड यांनी बनावट कागदपत्र तयार करुन एका बँकेकडून १९ कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप आहे..हे कर्ज घेतांना लीनाचा ब्वॉयफ्रेंडने आपण आयएएस अधिकारी असल्याची बतावणी केली होती..कर्ज घेतल्यानंतर ते दोघे तेथून पसार झाले..पण रिल लाईफ आणि रियल लाईफ मध्ये फरक असतो हे लीना विसरली होती..

डझनभर महागड्या कार्स खरीद करुन वेगवेगळ्या राज्यात त्यांची नोंदणी केल्य़ाचा लीनावर आरोप असून कार खरेदी करण्यासाठी तिने बँकेकडून कर्ज घेतलं..तसेच त्यासाठी तिने बँकेच्या अधिका-यांशी हातमिळवणी केली होती..

पण या ग्लॅमरस चेह-यामागे दडलेल्या दगाबाज चेह-याने केवळ हाच कारनामा केलाय असं नाही तर लीना आणि तिचा ब्वॉयफ्रेंड गजाआड झाल्यानंतर त्यांचे एक-एक कारनामे उघड होवू लागले आहेत..त्यांच्या चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

फसवणूक करणा-या लीनाला पोलिसांनी दिल्लीतल्या फार्म हाऊस मधून अटक केली तसेच तिच्याकडं असलेल्या महागड्या कार्सही ताब्यात घेतल्या...तिच्या एका कारवर राज्यसभेचं स्टिकर आढळून आलं असून ते तिने कोठुन मिळवलं होतं याचा शोध पोलीस घेत आहेत..

सौंदर्याच्या जोरावीर लीनाने आवघ्या दोनवर्षात रुपेरी दुनियेत आपलं स्थान निर्माण केलं होतं...तिला चांगल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली तसेच बॉलीवूडमध्येही तिने एन्ट्री घेतली होती..पण हायफाय राहणीमानासाठी तिने वास्तवात जी भूमिका केली त्याची किंमत आला तिला मोजावी लागणार आहे...लीना आणि तिचा मित्र चंद्रशेखर या दोघांनी कोट्यवधीचा गंडा घातलाय..या दुकलीने आतापर्यंत कितीजणांची फसवणूक केलीय याचा तपास पोलिसांकडून केला जातोय..लीनाकडं आढळून आलेल्या एका कारवर राज्यसभेचं स्टिकर लावल्याचं आढळून आलंय..ते स्टिकर त्यांना कोणी दिलं याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय..लीनाला पोलिसांनी अटक केलीय. पण तिचा ब्वॉयफ्रेंड मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही..लीना आणि चंद्रशेखर हे दोघे लिव्हइन रिलेशनमध्ये राहात होतो..या दोघांनी या महागड्या कार्स कशासाठी खरेदी केल्या होत्याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे....केवळ ऐश करण्यासाठी त्यांनी या कार खरेदी केल्या होत्या की, या मागे त्यांचा आणखी काही वेगळ उद्देश होता याविषयी पोलीस तपास करत आहेत...

लीनाचा ब्वॉयफ्रेंड चंद्रशेखर हा आपण IAS असल्याचं सांगत असे, तसेच तो लोकांना प्रोजेक्ट मिळवून देण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढत असे...मोठा प्रोजेक्ट मिळेल या आशेनं लोक त्याच्यावर विश्वास ठेवून पैसे देत असतं...आणि त्याचाच या दोघांनी गैरफायदा घेतल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलंय...पण आता लीनाच्या अटकेमुळे या दोघांच्या कारनाम्याचा पर्दाफाश झाला आहे..

लीनाकडून पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली असून काही कागदपत्रही पोलिसांच्या हाती लागले आहेत..त्याच्या आधारे या दुकलीने कितीजणांना फसवलंय याची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय...आता लीनाच्या अटकेनंतर तिच्य़ाकडून फसवले गेलेले लोक तक्रार देण्यासाठी पुढे येतील असा पोलिसांचा अंदाज आहे...

पोलीस आता लीनाचा ब्वॉयफ्रेंड चंद्रशेखरचा शोध घेत आहेत..कारण या फसवणूकीच्या गुन्ह्यात तो लीना सोबत होता..चंद्रशेखर हा लखोबा लोखंडेपेक्षा काही कमी नाही..कधी नेत्याचा नातू तर कधी उद्योगपती तर कधी आयएएस अधिकारी म्हणून तो स्वताची ओळख करुन देत असे...पण खरा कोण आहे हा चंद्रशेखर त्यावर एक नजर..

बालाजी उर्फ शेखर रेड्डी उर्फ सुकेश चंद्रशेखर याचा शोध पोलीस घेत आहेत...फसवणूकीच्या अनेक प्रकरणात तो पोलिसांना हवा आहे...अभिनेत्री लीना आणि चंद्रशेख या दोघांनी अने्कांची फसवणूक केलीय..पोलिसांनी दिल्लीतून लीनाला अटक केलीय..पण तिचा मित्र चंद्रशेखर काही पोलिसांच्या हाती लागला नाही..जेव्हा पोलिसांनी लीनाला अटक केली त्यावेळी चंद्रशेखरही तिथच होता..मात्र तो तेथून पसार होण्यात यशस्वी झाल्याचं पोलीसांनी सांगितलंय...२०१०मध्ये या दोघांनी अशाच पद्धतीने पोलिसांना गुंगारा दिला होता...बनावट कागदपत्र तयार करुन लीना आणि चंद्रशेखर या दोघांनी तामिळनाडूतील एका बँकेची १९ कोटी रुपयांची फसवणूक केलीय...चंद्रशेखर याची पोलीस दप्तरी सुकेश चंद्रशेखर नावाने नोंद आहे...तो १९ वर्षाच्या असतांना पोलीस दप्तरी त्याच्या नावाची नोंद झाली..२००७मध्ये सात आलिशान कार्स त्याच्या पालकाकडून जप्त करण्यात आल्या होत्या..त्याप्रकरणी त्याच्या पालकांना अटक करण्यात आली होती...२०१०मध्ये चंद्रशेखर हा उच्चभ्रू समजल्या जाणा-या कोरोमंगल परिसरातील रहेजा अपार्टमेंटमध्ये राहात होता..त्यावेळी तो डीएमकेचे सर्वेसर्वा एम करुनानिधी यांचा आपण नातू असल्याचं सांगत असे... त्यानंतर त्याने आपली ओळख बदलली आपण पोल्ट्री फार्मचा मालक असल्याची बतावणी करु लागला.. त्याने सरकारकडून कंत्राटं मिळवली होती..आपण आयएएस अधिकारी असल्याचं सांगून त्याने ती कंत्राटं मिळावली होती..या प्रकरणात अटक करण्यात आलेली अभिनेत्री लीना हीने दंत महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे..चंद्रा लेआऊट परिसरात लीना आणि चंद्रशेखर या दोघांचं घर आहे..ते आपल्या महागड्या कारमधून फिरत असत...पण आता त्यांच्या या महागड्या कार्सचं रहस्य उलगडलं आहे..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 30, 2013, 23:50


comments powered by Disqus