अबलख घोडा Horse

अबलख घोडा

अबलख घोडा
www.24taas.com, मुंबई

अश्व अर्थात घोडा.... स्वत: छत्रपती शिवाजी महाराजही या अश्वलक्ष्मीचे पुजक होते असं म्हटलं जातं.. ज्याचा पागा बळकट त्यांचे राज्य बळकट असं महाराज म्हणत असत. अत्यंत देखण्या, रूबाबदार, इमानी, चपळ अशा जातिवंत जनावरावर कोण बरं प्रेम करणार नाही? आजचा काळ हा महागड्या वाहनांचा असला तरी या जातिवंत प्राण्याचं महत्व तसूभरही कमी झालं नाही...

अतिवेगवान कार्स आणि बाईकच्या युगाताही घोडा हा प्राणी आपलं स्थान टिकवून आहे...एकीकडं शहरीकरण होत असतांनाही घोडे पाळणा-यांची संख्या काही कमी झाली नाही...आज रोज नवनव्या कार्स आणि बाईक्सची मॉ़डेल्स बाजारात येत असून त्यांची जोरदार जाहिरातही केली जाते..पण आजच्या जाहिरातीच्या युगातही कोणतीच जाहिरात न करता घोड्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते...विशेष म्हणजे घोड्यांची किंमतही काही कमी झाली नाही...



३० लाख रुपये किंमतीचा घोडा !


कारण घोड्याचा आपला एक वेगळाच रुबाब असतो...त्याची वेगळीच ऐट असते...रस्त्याने जाणा-या एकदा महागड्या कारकडं लोक दुर्लक्ष करतील पण समोरून एखादा ऐटबाज घोडा आल्यास त्याच्याकडं सहजासहजी कोणी दुर्लक्ष करणार नाही..कारण हा प्राणीच तेवढा देखणा आहे...




एकदा घोडा खरेदी केला की तो तुमच्या आयुष्याचा एक भाग बनून जातो...कारण हा प्राणी जेव्हडा देखणा आहे तेव्हडाच तो इमानी आणि मालकाच्या आज्ञेनंच पालन करणारा आहे. म्हणूनच प्राचीन काळापासून घोड्याने माणसाच्या जीवनात वेगळ स्थान निर्माण केलं आहे. राजेरजवाड्याच्या काळात घोड्याला अनन्यसाधारण महत्व होतं...प्रवासापासून ते युद्ध पर्यंत सगळ्यासाठी घोड्याचा वापर केला जात होता...वेगवान प्राणी म्हणून घोड्याकडं बघितलं जातं होतं...आज काळ बदलला असली तरी त्याचा बेफाम वेग रेसकोर्सच्या मैदानावर अनुभवायला मिळतो...

पूर्वीच्या तुलनेत घोडे पाळणा-यांची संख्या भलेही कमी झाली असली तरी त्याच्या विषयीचं आकर्षण जराही कमी झालं नाही...म्हणूनच आजही घोडे बाजारात घोडा खरेदी करण्यासाठी शौकीन आवर्जून हजेरी लावतात...विशेष अश्वप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे..


घोडा आणि एश्वर्य यांचं पूर्वापार नातं आजही टिकून आहे गरजेसाठी घोडा खरेदी करून उपजीविका करणारे आहेत. तसेच शौक आणि शुभलक्ष्मी म्हणुन घोडे बाळगणारे शैकीन आजही आहेत. घोड्याच्या लिदीचा वास एकदा का नाकात गेला की तो कधीच सुटत नाही असं अश्वप्रेमी सांगतात. त्याची प्रचिती घोड्याच्या बाजारात आल्याशिवाय राहात नाही..

आयटी उद्योगपती कैलास बोयेतकर, राजकारणी विजय कुलकर्णी आणि सराफ व्यापारी अशोक कुलथे या तिघांचा व्यवसाय वेगवेगळा असला तरी हे तिघेही आपला नेहमीचं काम सोडून सोलापूरच्या आकलूजमध्ये आले होते .हे तिघेही इथं आले ते आपल्या अश्वप्रेमामुळे. अकलूजमध्ये दरवर्षी घोड्यांचा बाजार भरतो. यंदाही या बाजारात जवळपास दोन हजार घोडे विक्रीसाठी आले आहेत. घोड्यांचा बाजार म्हटलं की घोड्यांचे शौकिन तिथं येणारच. घोड्यांचा छंद एकदा जडला की तो सहजा सहजी सुटत नाही. बाजारात विक्रीसाठी आलेले रुबाबदार घोडे बघितल्यानंतर अश्वप्रेमींना त्याचा मोह टाळता येत नाही...






अकलूजच्या घोडे बाजारात विक्रीसाठी आलेल्या घोड्यांची संख्या आणि तिथं खरेदीदार पहाता आजही लोकांमध्ये घोड्यांविषयी प्रचंड आकर्षण असून त्यामुळेच कारपेक्षाही घोडा महाग असल्याचं पहायला मिळतंय...


घोडा आणि माणसाची सोबत तशी फार प्रचीन आहे.. त्यामुळेच आपल्या या लाडक्या प्रण्याची खदेरी करतांना अश्वप्रेमी बारकाईन पाहणी करतात... घोड्याची पारख असण हे पूर्वीच्या काळी मोठ अनुभवाच आणि मानाचं लक्षण समजलं जाई आणि आजही त्यात खंड नाहीच... घोड्याचे लक्षण पाहूनच तो खरेदी केला जातो...

घोडा हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येतो एक अत्यंत देखणा आणि रुबाबदार प्राणी... हा प्राणी जेव्हा माणसाळला तेव्हापासून ते आजतागायत माणसाने त्याला अंतर दिलं नाही... काळ बदलला तरी घोड्याचं महत्व कायम राहिलं आहे...बाईक्स आणि कार्सच्या युगातही घोड्याची किंमत लाखाच्या घरात आहे..यावरुन घोड्याच महत्व आधोरिखीत होतंय...


आज जगभरात घोड्याच्या अनेक जाती असून मंगोलीया सारख्या देशात आजही अश्वसंकृती टिकून आहे. भारतातही घोड्याच्या विविध जाती आढळतात...सिंधी घोडा, मारवाडी घोडा, काठियावाडी घोडा, पंजाबी घोडा, भीमथडी घोडा....या घोड्यांच्या जाती महाराष्ट्रात आढळतात. पण त्य़ापैकी काहीच जातीच्या घोड्यांना अश्वप्रेमींकडून मागणी असते...

घोड्याच्या जातीबरोबरच त्याचं वय, उंची, रंग ,डोळे, भवरे यालाही मोठं महत्व असतं. घोड्याला ७२ खोडी असल्याचा अश्वप्रेमींमध्ये समज आहे...त्यामुळे अश्वप्रेमी घोडा खरेदी करतांना काही गोष्टी कटाक्षाने पाहून घेतात...

घोडा खरेदी करतांना त्याचा वापर कशासाठी केला जाणार आहे याचा विचार केला जातो..छंद म्हणून खरेदी करणारे अश्वप्रेमी घोड्याचा रुबाब पाहून घेतात. तर लग्नकार्यात वरातीसाठी किंवा मिरवणूकीसाठी वापरल्या जाणारे घोडे हे नृत्यात प्रशिक्षित असतात....


पंचकल्याणी घोडा दारात असणं मोठ मानाच लक्षण समजल जाई. मात्र पूर्वी देखणा आणि शुभलक्षणी घोडा बाळगणं जसं मानाचं होतं आताही ते आहेच. मात्र असा घोडा किंवा घोडी बाळगणं आताच्या काळाच तेव्हडं सोपं राहिलं नाही..

अलिशान कारपेक्षाही घोडीची किंमत जास्त आहे. घोडीची किंमत तब्बल ३० लाख रुपये सांगण्यात आली आहे. घोडीसाठी आवश्यक असलेले सर्वगुण या घो़डीत असल्यामुळे तिची किंमत एव्हडी ठेवण्यात आल्याचा दावा घोडीच्या मालकाने केलाय...

घोड्याचे चारही पाय ढोपरा खाली पांढरे शुभ्र असतात...तसेच त्याचे डोळे निळसर असतात...अशा डोळ्यांना जयमंगल असं म्हटलं जातं..हा घोडा पंचकल्याणी मानला जातो..त्यामुळेच त्याची किंमत तीस लाखाच्या घरात आहे....या घोड्यांच्या गुणावर त्याची किंमत निश्चित होते..काही दुर्मिळ रंगामुळेही घोड्याची किंमत लाखांच्या घरात असल्याचं अश्वप्रेमींनी सांगितलंय...

उत्तर प्रदेशातील घोडे व्यापारी मोहमद खलील सत्तर घोडे विक्रीसाठी घेऊन आला आहे..त्याने आपल्या घोड्याची किंमत वीस लाख रुपये सांगितलीय. सिंधी, मारवाडी, पंजाबी जातीच्या घोड्यांना बाजारात जास्त किंमत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय..

अकलूजच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या घोड्यांची किंमत ५० हजारापासून ते तीस लाखांपर्यंत आहेत..देशभरातून विक्रीसाठी इथं घोडे आणण्यात आले असून खरेदीदारांनीही मोठी गर्दी केली आहे... घोड्याचा रुबाबा डोळ्यात भरणारा असल्यामुळे अश्वप्रेमी वाट्टेल ती किंमत देवून घोड्याची खरेदी करत आहेत...

अश्वप्रेमींमध्ये घोडाविषयी आजही अनेक कल्पना आहेत...आणि त्यानुसारच ते घोडे खरेदी करत असात....पण असं असलं तरी घोड्याची क्रेझ मात्र कमी झाली नाही..कार्तिकी एकादशीच्या अकलूजच्या बाजारात घोड्यांची मोठी खरेदी विक्री होते चोख पारदर्शी व्यवहारामुळे हा बाजार देशात प्रसिध्द असला तरी इथ होणा-या घोड्यांच्या आगळ्या स्पर्धांमुळे हा बाजार आकर्षण ठरलाय.

अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतच्या आवारात भरलेला हा घोड्यांचा बाजार सर्वांच आकर्षण ठरला आहे..देशाच्या विविध राज्यातून इथं घोडे विक्रीसाठी आले आहेत..दरवर्षी कार्तिक एकादशीला हा बाजार भरतो...गेल्य़ा चार वर्षांपासून इथं बाजाराचं आयोजन केलं जातं असून इथं बाजाराबरोबरच घोड्याच्या वेगात चावण्याच्या शर्यतहींच आयोजनही केलं जातं..



जलदगतीने चालण्याच्या स्पर्धेसोबतच नृत्याची स्पर्धा घेतली जाते...डफाच्या तालावर घोड्याला नृत्यकरतांना पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो...ठिकठिकाणाहून आलेले घोड्यांचे विक्रेते इथं आपल्या घोड्याचं नृत्य सादर करतात...


या बाजारात गरजेनुसार लोक घोड्याची खरेदी करण्यासाठी येतात.. मिरवणूक आणि वरातीत नृत्य करणारे घोडे इथं विक्रीसाठी आले आहेत...घोडे खरेदी विक्रीचा व्यवहार पारदर्शक व्हावा म्हणून बाजार समितीकडून काळजी घेतली जाते..


या बाजारात जवळपास दोन हजार घोडे विक्रीसाठी दाखल झाले होते त्यापैकी सुरुवातीच्या काही दिवसात अर्ध्याहून अधिक घोड्यांची विक्री झाली आहे...यावरुन घोडा आजही माणसाला तेव्हडाच प्रिय असल्याचं स्पष्ट होतंय..

First Published: Friday, November 30, 2012, 23:35


comments powered by Disqus