Last Updated: Tuesday, June 25, 2013, 23:50
www.24taas.com, मुंबईउत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाने मोठ्या प्रमाणात विध्वंस केला..किती प्रमाणात मनुष्यहानी झाली याचा अंदाज लावणं सध्यातरी शक्य नाही..मात्र या महाप्रलयाने देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चारधाम तिर्थस्थळांचं मोठं नुकसान केलंय...शेकडोंचे प्राण गेले, मालमत्तेचं नुकसान झालं तसेच लाखो लोकांच्या श्रद्धेलाही धक्का लागलाय..निसर्गाने तांडव केलं असलं तरी लोकांचा इश्वरावरची श्रद्धा जराही कमी झाली नाही..पण सुरुवातीला आपण पहाणार आहोत चारधाम पैकी गंगोत्री आणि यमुनोत्रीची परिस्थिती..
उत्तराखंडमध्ये गेल्या रविवारी आलेल्या महाप्रलयाने सगळं काही उध्वस्त केलं.... महाप्रलयाच्या तडाख्यातून चारधामही सूटू शकलं नाही.. चारधामची यात्रा करण्यासाठी येणारे भाविक आपल्या यात्रेची सुरुवात यमुनोत्रीपासून करतात..आणि नंतर गंगोत्रीमध्ये गंगामातेचा आशीर्वाद घेत गंगेत स्नानकरतात..गंगेत स्नान केल्यास पापापासून मुक्ती मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे...पण यापुढे इथं चारधामयात्रेसाठी येणा-या भक्तांना काही काळ वाट पहावी लागणार आहे..कारण महाप्रलय येवून सात दिवस उलटले तरी आजही हजारो लोक या परिसरात अडकले आहेत..उत्तरकाशी ते गंगोत्री या दरम्यान असलेला राजमार्ग अद्यापही वाहतूकीसाठी खुला करण्यात आला नाही..हा राजमार्ग आठ ठिकाणी खचला आहे..तसेच यमुनोत्री राजमार्गही काही ठिकाणी खचला असल्यामुळे त्यावरही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे..त्यामुळे इथ अडकलेले लोक पायी बडकोटकडे जात आहेत..या परिसरात आजही अडीच हजार लोक ठिकठिकाणी अडकले आहेत....अडकलेल्या लोकांना येथून बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे..आजारी लोकांना जॉली ग्रँटमध्ये हलवण्यात येत आहे..महाप्रलयाला आठव़डा उलटून गेला तरी प्रशासनाला उत्तरकाशी ते गंगोत्री दरम्यान तसेच बडकोट ते यमुनोत्री दरम्यान अडककलेल्यांपर्यंत पोहचण्यात यश आलं नाही..भागिरथीहटीच्या हस्तीगावाचा जगाशी संपर्क तुटला आहे...इथ अडकलेल्या लोकांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल आहेत....मिळेल त्यावर गुजरान करण्याची वेळ अडकलेल्या लोकांवर आली आहे..पण असं असलं तरी लोकांची श्रद्धा जराही कमी झाली नाही..यंदा नाही तर पुढच्या वर्षी चारधाम यात्रा करण्याचा अनेकांचा मानस आहे..
चारधाममध्ये गंगोत्री हे दुसरं धाम म्हणून ओळखलं जातं..उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात भागिरथी नदीच्या काठावर गंगोत्री हिमालय पर्वतरांगांमध्ये ३१ हजार मीटर उंचीवर हे तिर्थस्थळ वसलं आहे..हिंदूसाठी अत्यंत पवित्र असलेली गंगा नदी याच ठिकाणी धरतीवर अवतिर्ण झालीय..केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक गंगेच्या दर्शनासाठी इथं येतात..
गंगेविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात तसेच पुराण आणि धर्मिक ग्रंथांमध्येही गंगेचा उल्लेख आढळतो...पर्वतांचा राजा हिमवान याची गंगा ही मुलगी असून जो गंगेत स्नान करतो तो पवित्र होतो अशी हिंदूंची श्रद्धा आहे...भगवान विष्णूच्या पायातून गंगा निघते त्यामुळे तिला विष्णूपती म्हटलं जातं..गंगोत्रीमध्येच पवित्र गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरते... राजा भागिरथाच्या कठोर तपस्येनंतर गंगा शंकराच्या जटातून निघाली आणि ती पृथ्वीवर प्रवाहीत झाली..गंगेच्या या पवित्र प्रवाहाला भागिरथी नावानेही ओळखलं जातं..या परिसरात एक मंदिर असून ते आठराव्या शतकात बांधण्यात आलं आहे..महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी याच गंगोत्री मध्ये देव यज्ञ केला होता....थंडीत हा संपूर्ण परिसर बर्फाच्छादीत असतो..त्यामुळेच दिवाळीनंतर गंगोत्रीधाम पुढच्या सहा महिन्यासाठी बंद ठेवण्यात येत.. मे महिन्यात ते पुन्हा उघडण्यात येत...या मंदिरात पुजा तसेच देखभालीचं काम सेनवाल कुटुंबाकडून केलं जातं..गंगोत्रीमध्ये १९ किलोमीटर अंतरावर गोमुख असून ते गंगेचं उगमस्थान मानलं जातं..सूर्यवंशी राजा भगिरथाच्या तपस्येमुळे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरीत झालेल्या गंगेच्या दर्शनासाठी आजही लाखो भाविक दरवर्षी इथं येत असतात..
उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला डोंगर खचले ,घरे आणि कुटुंब उध्वस्त झाले ..मात्र लोकांची श्रद्धा जराही कमी झाली नाही..महाप्रलयामुळे गंगोत्री आणि यमुनोत्रीची परिस्थीती अत्यंत गंभीर बनली आहे..पण आजही यमुना आणि गंगेचं दर्शन करण्याची अनेकांची इच्छा आहे. उत्तराखंडमधील यमुनानदीवर यमुनोत्री हे तिर्थस्थळ वसलं असून गढवाल परिसरात ते ४ हजार ४२१ मीटर उंचीवर आहे...खरं तर यमुनानदीचं उगमस्थान हे २० हजार ९५५ फूट उंचावर यमुनोत्री ग्लेशीयरमध्ये आहे...हे ग्लेशीयर हिलमालयातील बंदर पुछ कड्या जवळ आहे..यमुना नदीच्या तिरावर यमुनेचं मंदिर आहे..हे मंदीर टीहरी गढवालचा राजा प्रतापशाहने बांधलं आहे...यमुनेच्या मंदिरत असलेली मुर्ती ही काळ्यापाषानातून तयार करण्यात आली आहे...या मंदिराजवळच गरम पाण्याचे कुंड आहेत..त्याला सूर्य कुंड म्हटलं जातं..या सूर्य कुंडा जवळचं दिव्यशिला असून यमुना देवीच्या पूजेपूर्वी दिव्य शिलेची पुजा केली जाते.. या यमुनोत्री मंदिराचा पुजारी जवळच असलेल्या खरसाली गावचा रहिवासी आहे...या मंदिरात पुजा करण्याचा अधिकार त्यांच्याकडंच आहे..असित मुनीचा आश्रमही याच ठिकाणी असल्याचं सांगितलं जातं...याच नदीत रोज अंघोळ करुन ते पुजा करत असत...यमुना केवळ एक नदीच नाही तर ती एक देवी आहे.. हिंदूंच्या धर्म ग्रंथानुसार यमुना ही सूर्यदेवाची मुलगी असून यमदेव आणि शनिची बहिण आहे..यमुनेला भारतीय संस्क़ृतीत मोठ महत्व असून तिला मातेचा दर्जा देण्यात आला आहे.. प्राचीन भारतीय संस्क़ृतीची ती ओळख मानली जाते..
त्या महाप्रलयामुळे केदारनाथधाम पूर्णपणे उध्वस्त झालंय..मंदिराचं गाभारा गाळानं भरलाय..पण केदारनाथविषयी भक्तांच्या मनातील श्रद्धा जराही कमी झाली नाही..इतक्या मोठ्या विध्वंसानंतरही केदारनाथाची पुजाआर्चा सुरु आहे..
उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाच्या तडाख्यातून केवळ मणुष्यचं नाही देवाचं मंदिरही सुटलं नाही..त्या महाप्रलयामुळे बद्रीनाथ आणि केदारनाथ या तिर्थस्थळांचं मोठ नुकसान झालं आहे..त्यामुळेच यंदा चारधाम य़ात्रा होणार नसल्याचं सरकारने जाहीर केलंय..ही यात्र पुन्हा कधी सुरु होणार हे आताचं सांगणं कठीण आहे..कारण या तिर्थस्थळांकडं जाणारे सगळे रस्ते खचले आहेत..त्याच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु आहे..केदारनाध परिसरात मोठ्याप्रमाणात मणुष्यहानी झालीय...मंदिर परिसर पुर्णपणे उध्वस्त झाला आहे..मंदिर आणि गाभारा मात्र सुरक्षित आहे..या महाप्रलयानंतर मंदिरात पुन्हा पुजा सुरु झालीय..मात्र नेहमी भविकांचा राबता असलेलं केदारनाथ मंदिर आज त्या महाप्रलायाची कहाणी सांगतंय..गेल्या आठवड्याभरापासून तुम्ही केदारनाथमधील त्या भीषण घटनेविषयी पहात असाल..पण आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे..त्या महाप्रलयातून बचालेले लोक तसेच जवळच्या गावातील पुजा-यांनी पुन्हा केदारनाथची पुजाअर्चा सुरु केलीय..
देशभर पसरलेल्या शिवभक्तांना केदरनाथच्या दर्शनासाठी पुढचे दोन तीन वर्ष वाट पहावी लागण्याची शक्यता आहे..कारण त्या महाप्रलयाने सगळं काही उध्वस्त केलं आहे. आजही हजारो लोक या देवभूमीत अडकून पडले आहेत..हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे. केदारनाथमध्ये देवांचा देव महादेव विराजमान आहे..दरवर्षी लाखो भाविक इथं महादेवाच्या दर्शनासाठी येतात.
हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये जवळपास १५ हजार फूट उंचीवर भगवान शंकराचं ज्योतिर्लिंग असून त्यालाच केदारनाथधाम म्हटल जातं...मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर वसलं आहे..चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ हे तिस-या क्रमांकाचं मानलं जातं..भगवान शंकराच्या या मंदिरापर्यंत पोहचणं तसं कठीणच आहे....वाहनाने तिथ जाण्याची व्यवस्था नाही..शेवटाचा १४ किलोमीटरचा टप्पा हा पायी, पालखी किंवा घोड्यावरुन करावा लागतो.. केदारनाथ मधील भगवान शंकराचं हे शिवलिंग महाभारताच्या काळातील असल्याचं मानलं जातंय..त्यामुळे पुराणात केदारनाथचा उल्लेख आढळतो..खरं तर हा परिसर बारा महिने बर्फाच्छादीत असतो..थंडीत तर इथं बर्फाचं साम्राज्य असतं....पण दिवाळीनंतर भगवान शंकराची मूर्ती उकी मठात आणली जाते..महाभारतातील कौरव - पांडव यांच्यात झालेल्या युद्धानंतर पांडवांना आपल्या पापातून मुक्ती हावी होती त्यामुळे ते भगवान शंकराच्या दर्शनासाठी काशीला गेले...पण काशीत पोहोचल्यानंतर भोलेनाथ कैलास पर्वतात असल्याचं त्यांना समजलं..त्यामुळे पांडव हिमालयाच्या दिशेनं निघाले..पण भगवान शंकर त्यांना दर्शन देवू इच्छित नव्हते...त्यामुळेच भवगान शंकर केदारनाथमध्ये अंतरधान पावले होते..पण पांडांवही आपल्या निश्चयावर ठाम होते..भगवान शंकराचं दर्शन घेतल्याशिवाय ते मागे परतणार नव्हते..भगवान शंकर ज्या ठिकाणी लपले होते ते ठिकाण आज गुप्त काशी म्हणून ओळखलं जातं... या ठिकाणापासूनच पांडव पुढे निघाले आणि ते गौरी कुंडापर्यंत जाऊन पोहोचले..तोपर्यंत इथं त भगवान शंकराने बैलाचं रुप धारण केलं होतं..पण पांडवांनी त्यांना ओळखलं होतं..त्यावेळी भीमाने आपलं विशाल रुप धारण केलं..त्यामुळे तिथ असलेले सगळे प्राणी तिथून निघून गेले मात्र बैलाचं रुपधारण केलेले भगवान शंकर तेथून हालले नाहीत..त्यामुळे भीमाने त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी भोलेनाथ अंतरधान पावले मात्र भीमाच्या हातात शेपूट आलं त्याने बैलाला खेचण्याचा प्रयत्न केला पण भगवान शंकर अंतरधान पावले ..त्यावेळी शंकराचं मुख नेपाळमध्ये निघालं तर केदारनाथमध्ये त्यांची पाठ राहिली...याच ठिकाणी पांडवांना भगवान शंकराने दर्शन दिलं होतं...तसेच ते शिळेच्या रुपात इथं विराजमान झाले..भगवान शंकराचं इथं येवून दर्शन घेणा-यांना पापापासून मुक्ती मिळते अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे..महादेव इथं शिळेच्या रुपात असून त्यावर गावरान तुपाचा लेप लावला जातो..
चारधाम यात्रेतील आखेरचं धाम म्हणजे बद्रीनाथ..बद्रीनाथची यात्रेमुळे केवळ पापातून मुक्तीचं मिळते असं नाही तर जन्म-मृत्यूच्या फे-यातूनही सुटका होते....बद्रीनाथला बद्रीनारायण मंदिर म्हणूनही ओळखलं जातं..अलकनंदा नदीच्या काठावर हे मंदिर वसलं आहे..हे मंदिर भगवान विष्णूचं एक रुप मानलं जातं...भगवान विष्णू योग ध्यान मुद्रेत तपस्या करत असतांना मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली..त्यामुळे भगवान विष्णू पूर्णपणे बर्फात बुडाले होते..त्यांची ती अवस्था पाहून लक्ष्मी मातेला दया आली आणि तिने भगवान विष्णू शेजारी जावून एका वृक्षाचं रुप धारण केलं...त्यामुळे भगवान विष्णूची बर्फापासून सुटका झाली..तसेच उन-पावसापासून ही भगवान विष्णूचा बचाव झाला..अनेक वर्षांनी तपस्या संपल्यानंतर जेव्ह भगवान विष्णूंनी बघीतलं तेव्हा लक्ष्मीमाता त्यांना पूर्णपणे बर्फाने झाकलेल्या अवस्थेत दिसली..लक्ष्मीमातेची हीभक्तीपाहून भगावन विष्णू प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की आजपासून इथ माझ्याबरोबरच लक्ष्मीचीही पुजा केली जाईल..बद्रीच्या रुपाने लक्ष्मीने भगावन विष्णूचा बर्फापासून बचाव केला होता..त्यामुळेच भगावन विष्णूला इथं बद्रीनाथ म्हटलं जातं....ज्या ठिकाणी भगवान बद्रीच्या रुपाने तप केला गेला त्या ठिकाणी आजही गरम पाण्याचे कुंड असून ते तुप्त कुंड नावाने ओळखले जातात..मोसम कोणताही असला तरी त्या कुंडातील पाणी गरम असतं.
बद्रिनाथमधील मंदिर अत्यंत आकर्षक आहे..गढवालच्या राजाने इथ मूर्तीची स्थापना केली होती.. अनेक वेळा या मंदिराची डागडुजी करण्यात आलीय..१७व्या शतकात गढवालच्या राजाने या मंदिराचा विस्तार केला..१८०३मध्ये आलेल्या मोठ्या भूकंपात मंदिराचं नुकसान झालं होतं..त्यावेळी जयपूरच्या राजाने त्याचा जिर्णोद्धार केला होता..या मंदिराची उंची ५० फूट आहे..महाभारतातही बद्रिनाथचा उल्लेख आढळतो...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 25, 2013, 23:50